Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan For CA : चार्टर्ड अकाउंटंटसाठी व्यावसायिक कर्ज; बजाज फिनसर्व्हकडून 40.5 लाखापर्यंतच्या कर्जाची योजना

Loan For CA : चार्टर्ड अकाउंटंटसाठी व्यावसायिक कर्ज; बजाज फिनसर्व्हकडून 40.5 लाखापर्यंतच्या कर्जाची योजना

बजाज फिनसर्व्हची उपकंपनी असलेल्या बजाज मार्केट्सने खास चार्टर्ड अकाउंटंटसाठी परवडणारे व्यावसायिक कर्ज उपलब्ध केले आहे. बजाज मार्केट्सकडून चार्टर्ड अकाउंटंटना 40.5 लाखापर्यंतचे व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी फायनान्स कंपनीकडून वार्षिक 14% व्याजदर आकारला जातो.

तुमच्याकडे एखादे कौशल्य असेल तर तुम्ही नोकरी करण्याऐवजी स्वत:चा उद्योग -व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता. त्याप्रमाणेच चार्टर्ड अकाउंटंट (CA) यांचे देखील स्वत:चा व्यावसायिक सराव सुरू करण्याचे स्वप्न असते. मात्र, करिअरच्या सुरुवातीला भांडवलाचा अडथळा ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर बजाज फिनसर्व्हची उपकंपनी बजाज मार्केटने आता चार्टर्ड अकाउंटंटसाठी व्यवसाय कर्ज योजना सुरू केली आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. नेमकी काय आहे ही योजना त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

40.5 लाखापर्यंतचे व्यावसायिक कर्ज 

सीए (CA) अथवा चार्टर्ड अकाउंटंट (chartered accountant) यांना जर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांचे स्वत:चे कार्यालय गरजेचे आहे. मग एकतर ते भाड्याने घेणे आवश्यक आहे किंवा विकत घ्यावे लागेल. मात्र कित्येकदा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी भांडवलाची कमतरता भासते, अशावेळी व्यावसायिक कर्ज घेणे हे हा एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मार्केटमध्ये अनेक वित्तसंस्था व्यावसायिक कर्ज देतात. त्याचप्रमाणे बजाज फिनसर्व्हची उपकंपनी असलेल्या बजाज मार्केट्सने खास चार्टर्ड अकाउंटंटसाठी परवडणारे व्यावसायिक कर्ज उपलब्ध केले आहे. बजाज मार्केट्सकडून चार्टर्ड अकाउंटंटना 40.5 लाखापर्यंतचे व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी कंपनीकडून वार्षिक 14% व्याजदर आकारला जातो.

कर्जासाठी पात्रता आणि वैशिष्ट्ये-

चार्टर्ड अकाउंटंट यांना दिल्या जाणाऱ्या व्यावसायिक कर्जासाठी पात्रतेचे निकष जुजबी ठेवण्यात आले आहेत. कर्जास पात्र होण्यासाठी अर्जदाराकडे प्रॅक्टीस करण्याचा वैध परवाना असावा. तसेच या क्षेत्रातील कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. बजाजकडून हे कर्ज ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करण्यात येते. याशिवाय या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा 12 ते 84 महिन्यांपर्यंतचा लवचिक ठेवण्यात आला आहे. पात्रता तपासण्यासाठी आणि काही मिनिटांत अर्ज करण्यासाठी, सर्व CA ला बजाज मार्केट्सच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा अॅप डाउनलोड करावे लागेल.

निधीच्या वापरावर कोणतेही निर्बंध नाहीत

बजाजकडून मंजूर करण्यात आलेल्या व्यावसायिक कर्जाचा उपयोग चार्टर्ड अकाउंटंट त्यांच्या व्यवसायाशी निगडीत कोणत्याही कारणासाठी करू शकतात. या कर्जाच्या रकमेच्या माध्यमातून ते चांगले सॉफ्टवेअर वापरू शकतात. नवीन ऑफिस सेट करू शकतात, याशिवाय त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांमध्ये तज्ज्ञांचा समावेश करू शकतात. ते या व्यावसायिक कर्जाचा खेळते भांडवल तयार करण्यासाठीदेखील वापर करू शकतात.