Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्टेटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) म्हणजे काय?

Statement of Additional Information

म्युच्युअल फंड योजनेसाठी स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) म्हणजेच अतिरिक्त माहितीचे विवरण देणं आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना किंवा भागधारकांना ते वितरित करताना त्यासाठी पैसे आकारले जात नाही. पण अशाप्रकारची माहिती कोणी मागत असेल तर त्यांना ती देणं आवश्यक आहे.

Statement of Additional Information-SAI यालाच मराठीत अतिरिक्त माहिती निवेदन असं म्हटलं जातं.  हे म्युच्युअल फंडच्या (Mutual Fund) छापील माहितीपत्रकासोबत (Prospectus) दिलेला एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये म्युच्युअल फंडाविषयीची अतिरिक्त माहिती असते. तसेच या फंडाच्या कार्यपद्धतीची माहिती यात दिलेली असते. असंच स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (Scheme Information Document-SID) हे फंड ऑफर डॉक्युमेंटमधील अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंड स्कीमची संपूर्ण माहिती असते.

स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI)

साधारणत: गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाविषयी माहिती घेत असतो, तेव्हा त्याला तीन महत्त्वाची कागदपत्रे सापडतात. त्यातील एक महत्त्वाचा दस्ताऐवज म्हणजे स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI). इतर दोन दस्तऐवजांमध्ये प्रॉस्पेक्टस आणि प्रॉस्पेक्टसमधील माहिती सारांशाने दिलेली असते.

म्युच्युअल फंड हाऊस कंपन्यांना त्यांच्या नोंदणी क्रमांकासह भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळा (Securities and Exchange Board of India-SEBI)कडे अनेक फॉर्म दाखल करावे लागतात. म्युच्युअल फंडच्या नोंदणीसह त्याच्या माहितीचे प्रॉस्पेक्टस आवश्यक असते. तसेच त्यासोबत संक्षिप्त माहितीपत्रक (Summary Prospectus) असू शकतो. ज्याद्वारे गुंतवणूकदाराला थोडक्यात माहिती मिळू शकते. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांना गुंतवणूकदारांना फंड्स खरेदी करताना फंडाचे प्रॉस्पेक्टस देणं गरजेचं आहे.

म्युच्युअल फंड योजनेसाठी स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) म्हणजेच अतिरिक्त माहितीचे विवरण देणं आवश्यक आहे. गुंतवणूकदारांना किंवा भागधारकांना ते वितरित करताना त्यासाठी पैसे आकारले जात नाही. पण अशाप्रकारची माहिती कोणी मागत असेल तर त्यांना ती देणं आवश्यक आहे.

स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन (SAI) द्वारे म्युच्युअल फंड कंपनी संबंधित फंडाविषयीचा अधिक तपशील देते. जी माहिती प्रॉस्पेक्टसमध्ये दिली जात नाही किंवा त्याबाबत अधिक चर्चा केली जात नाही. स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशनद्वारे दिलेली माहिती ही सेबीद्वारे तपासलेली असते. त्याचबरोबर यामध्ये कंपनीचे व्यवस्थापन आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापकांची अधिक सखोल माहिती दिलेली असते. त्यात संबंधित म्युच्युअल फंडाच्या आर्थिक स्टेटमेंटची माहितीही दिलेली असते.

SAI डॉक्युमेंटमध्ये देण्यात येणारी माहिती नियमितपणे अपडेट केले जाते. त्यात अनेकदा फंडाची आर्थिक वाटचाल दिलेली असते. तसेच फंडाशी संबंधित अधिकारी, संचालक आणि एकूणच फंडाच्या गुंतवणुकीची दिशा दर्शविणाऱ्या तज्ज्ञांची माहिती दिलेली असते.

म्युच्युअल फंडाचे महत्त्वाचे दस्तऐवज

जेव्हा एखदा गुंतवणूकदार वेबसाईटवर फंडाबद्दलची अधिक माहिती घेत असतो. तेव्हा त्याच्यासाठी स्टेंटमेंट ऑफ अॅडिशनल इन्फॉर्मेशन आणि प्रॉस्पेक्टस (Statement of Additional Information-SAI and Prospectus) हे दोन दस्तऐवज म्युच्युअल फंडमधील माहितीचे प्राथमिक स्त्रोत असतात. प्रॉस्पेक्टस आणि SAI या दोन डॉक्युमेंट व्यतिरिक्त म्युच्युअल फंड कंपन्यांनी फंडाच्या आर्थिक विवरणासह सहा महिन्यांचा, वर्षाचा अहवाल आणि पोर्टफोलिओसह तीन महिन्यांचा अहवाल सादर करणं आवश्यक आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे देण्यात येणारी सर्व माहिती ही सेबीच्या निगराणीखालून आलेली असते. तसेच सेबीच्या नियमांमध्ये नमूद केल्याप्रमाणे फंडाचे विविध तपशील उपलब्ध करून देणं कंपन्यांना भाग आहे. या अशाप्रकारच्या डॉक्युमेंट्समुळे गुंतवणूकदाराला गुंतवणूक करताना मदत होते.