Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID) म्हणजे काय?

Scheme Information Document

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (Scheme Information Document-SID) हे फंड ऑफर डॉक्युमेंटमधील अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंड स्कीमची संपूर्ण माहिती असते.

म्युच्युअल फंड (Mutual Fund)मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फंड ऑफर डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. फंड ऑफर डॉक्युमेंटमध्ये त्या स्कीमशी संबंधित इत्यंभूत माहिती दिलेली असते. त्या माहितीच्या आधारे फंडमधील गुंतवणुकीचे विविध टप्पे, कंपनीचा उद्देश, कंपनीच्या  भविष्यातील योजना अशी सर्व माहिती त्यात दिलेली असते. जेणेकरून गुंतवणूकदार या माहितीच्या आधारे त्यात निर्धास्तपणे गुंतवणूक करू शकतो. गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, त्यांना शाश्वत करण्यासाठी आणि गुंतवणूक प्रक्रियेत पारदर्शकपणा आणण्यासाठी अशा प्रकारच्या डॉक्युमेंटची नितांत गरज असते. 

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट म्हणजे काय? What is SID?

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (Scheme Information Document-SID) हे फंड ऑफर डॉक्युमेंटमधील अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंड स्कीमची संपूर्ण माहिती असते. जसे की, यात गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी किती रक्कम भरावी लागते, एक्सिट आणि एंट्री लोड किती असेल, एसआयपीची माहिती, फंड मॅनेजर आणि त्यांचा अनुभव, यातील जोखीम, योजनेचा उद्देश इत्यादी माहिती यात दिलेली आहे. ही अशी स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळी असू शकतात. पण त्यातील प्राथमिक माहितीचं स्वरूप समान असतं. आपण स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमधील वेगवेगळे प्रकारसुद्धा पाहणार आहोत. 

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID) कुठे मिळते?

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट हे म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाईटवर किंवा गुंतवणुकीविषयी माहिती देणाऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून मिळू शकते. हे डॉक्युमेंट किमान 100 पानांचं असतं. त्यामुळे यात दिल्या जाणाऱ्या माहितीचा तुम्हाला अंदाज येऊ शकेल. 

फंडमधील जोखीम (Riskometer)

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटचं अनुक्रमणिका असलेलं पहिलं पान सोडलं तर त्यानंतर येणाऱ्या पानावर फंडमधील जोखमीबरोबर फंड कंपनीबद्दलची माहिती दिलेली असते. या डॉक्युमेंटद्वारे गुंतवणूकदाराला सूचित केलं जातं की, या फंडमध्ये किती जोखीम आहे. इक्विटी फंडमध्ये इतर फंडच्या तुलनेत अधिक जोखीम असते.

असेट मॅनेजमेंट कंपनी (AMC)

यामध्ये म्युच्युअल फंडचे नाव, असेट मॅनेजमेंट कंपनीचे नाव, ट्रस्टी कंपनीचे नाव, कंपन्यांचा पत्ता आणि वेबसाईटची माहिती दिलेली असते. अशाप्रकारची माहिती सविस्तरपणे एसएआय (स्टेटमेंट ऑफ अडिशनल इन्फॉर्मेशन)मध्ये दिलेली असते.

एकूण स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंडबरोबरच त्या फंड हाऊसविषयीची संपूर्ण माहिती त्यात असते. गुंतवणूकदारांच्या दृष्टिने ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते.