Term Deposit Scheme : श्रीराम फायनान्स लिमिटेडने (NBFC) गुंतवणूकदारांना 9.15 टक्के व्याजदर ऑफर केला आहे. हे व्याजदर 5 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहे. श्रीराम समूहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
कंपनीचे संपूर्ण भारतात नेटवर्क
भारतातील सर्वात मोठ्या रिटेलपैकी एक म्हणजे श्रीराम फायनान्स लिमिटेड ही बिगर वित्तीय अर्थ संस्था (NBFC) 43 वर्षे जुनी आहे, जी श्रीराम ग्रुपची उपकंपनी आहे. 57,382 कर्मचारी आणि 2,875 शाखांचे नेटवर्क असलेली ही संस्था संपूर्ण भारतभर अस्तित्वात आहे. जवळजवळ 6 कोटींच्या वर संख्या असलेले ग्राहक श्रीराम फायनान्स लिमिटेडचा आधारस्तंभ आहे.
काय आहे व्याजदर
श्रीराम फायनान्सच्या नवीन विशेष उन्नती ज्युबली मुदत ठेव योजनेवर गुंतवणूकदारांना 50 महिन्यांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची संधी दिली जात आहे. या योजनेत महिला ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक 9.15 टक्के वार्षिक व्याजदर दिला जात आहे. कंपनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 8.50 टक्के व्याज, महिला ठेवीदारांना 8.61 टक्के, विद्यमान ठेवींच्या नूतनीकरणावर 8.77 टक्के, महिला ठेवींच्या नूतनीकरणावर 8.88 टक्के, ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.04 टक्के, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.15 टक्के, 9.31 टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांच्या नूतनीकरणावर 9.31 टक्के आणि महिला ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या नूतनीकरणावर 9.42 टक्के व्याज देत आहे.
या एफडी योजनांचे फायदे
उन्नती ज्युबली मुदत ठेव योजनेत महिला गुंतवणूकदारांना वार्षिक 0.10 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. आणि ज्येष्ठ नागरिक महिलांना वार्षिक 0.60 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. या सुविधा ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.