Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Power SIP : पॉवर एसआयपी म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

Power SIP :  पॉवर एसआयपी म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारास शेअर बाजाराच्या चढ-उतारांची चिंता करण्याची गरज नसते. मात्र, गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये पॉवर एसआयपी (Power SIP) हा आणखी एक प्रकार आता जास्त चर्चेत आला आहे. नेमके काय आहे पॉवर एसआयपी त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही मागील काही महिन्यांत वाढली आहे. यासाठी ठराविक रक्कम दर महिन्याला आपण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)च्या माध्यमातून गुंतवतो.  दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआपी (SIP) हा एक चांगला मार्ग आहे. कारण एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारास शेअर बाजाराच्या चढ उतारांची चिंता करण्याची गरज नसते. मात्र, गुंतवणुकीच्या या पर्यायामध्ये पॉवर एसआयपी (Power SIP) हा आणखी एक प्रकार आता जास्त चर्चेत आला आहे. नेमके काय आहे पॉवर एसआयपी त्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

काय आहे पॉवर एसआयपी?

पॉवर एसआयपी हा एक गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. यामध्ये शेअर मार्केटच्या म्यूलानुसार तुमची गुंतवणूक निश्चित केली जाते. सर्वसामान्य एसआयपीमध्ये एक फिक्स रक्कम महिन्याला गुंतवली जाते. मात्र, त्यावेळी शेअर बाजाराचे मुल्य विचारात घेतले जात नाही. मात्र पॉवर एसआयपीमध्ये बाजाराचे मु्ल्य विचारात घेतले जाते. त्यानुसार तुमची गुंतवणूक डेट म्युच्युअल फंड अथवा इक्विटी यामध्ये केली जाते.

डेट आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक

पॉवर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असताना बाजार मुल्यानुसार प्रमाण निश्चित केले जाते. ज्यावेळी शेअर्सच्या किंमती वधारल्या जातात त्यावेळी तुमची इक्विटीमधील गुंतवणूक कमी केली जाते आण ती डेट म्युच्युअल फंडात (debt Mutual fund) वाढवली जाते. मात्र, ज्यावेळी शेअर्सच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होते. त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी जास्त शेअर्स खरेदी करण्याची संधी असते. अशा वेळी इक्विटीमधील गुंतवणूक अधिक वाढवली जाते. यामुळे तुम्हाला भविष्यात मिळणारा फायदा जास्त होतो. यालाच पॉवर एसआयपी म्हणून ओळखले जाते.

बाजार मूल्यानुसार बदलते गुंतवणूक

पॉवर एसआपीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जी रक्कम गुंतवणूक करत आहात. त्यावेळी ती डेट म्युच्युअल फंड किंवा इक्विटी यांचे बाजारमु्ल्य विचारात घेऊन दोन्ही कडे कमी जास्त प्रमाणात गुंतवली जाते. समजा तुम्ही महिन्याला 2000 रुपये पॉवर एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहात. एखाद्यावेळी शेअर्सच्या किंमती वधारलेल्या असतील तर तुम्हाला कमी युनिट प्राप्त होतात. अशावेळी पॉवर एसआयपीमध्ये तुमची रक्कम ही इव्किटीसाठी  40 ते 50 टक्के वापरली जाते, तर 50 ते 60 टक्के रक्कम ही डेट म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. या उलट शेअर्स मुल्य कमी असेल तर भविष्यात जास्त परतावा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जाते. प्रसंगी डेटमधील गुंतवणूक इक्विटीसाठी वापरून जास्त शेअर्सची खरेदी केली जाते.

मिळू शकतो जास्त परतावा

थोडक्यात पॉवर एसआयपीमध्ये बाजाराचे मु्ल्य विचारात घेऊन गुंतवणूक केली जाते. ज्यामुळे गुंतणूकदारास जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. ज्यावेळी जास्त शेअर्स खरेदी करायचे असतात. त्यावेळी गुंतवणूकदारास अधिकचा हप्ता देण्याची गरज पडत नाही. कारण, अशा परिस्थतिती तुमची डेट म्युच्युअल फंडातील रक्कम इव्कीटीच्या गुंतवणुकीसाठी वापरी जाते.