जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग (Intra-Day Trading) करता, तेव्हा तुम्ही त्याच दिवसात शेअर मार्केट उघडणे आणि बंद होण्याच्या दरम्यान शेअर्स खरेदी आणि विक्री करता. कारण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कमी किमतीत शेअर्स खरेदी करून जास्त किमतीला विकून नफा कमावण्याचा नियम आहे. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्हाला शेअरची किंमत कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागते जेणेकरून तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता. याशिवाय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा आणखी एक मार्ग आहे. ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी कालावधीसाठी शेअर खरेदी करता आणि नंतर तो शेअर अगदी कमी नफा किंवा तोट्यात विकू शकता, त्याला शेअर मार्केटच्या भाषेत Scalping असे संबोधले जाते. आज आपण Scalping Trading म्हणजे काय? याबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
Scalping Trading म्हणजे काय?
स्कॅल्पिंग ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग (Short Term Trading) असेही म्हणतात. स्कॅल्पिंग ट्रेडिंग ही अशी ट्रेडिंग आहे; ज्यामध्ये तुम्ही तुमचे शेअर्स खरेदी करून ते दिवसभर होल्डवर ठेवू शकत नाही. स्कॅल्पिंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही शेअर्स सकाळी 9:15 वाजता खरेदी करू शकता. त्यानंतर जेव्हा शेअरची किंमत वाढते. तेव्हा तुम्ही त्याची विक्री तुमच्या नफा मार्जिनने करू शकता. याच पद्धतीला स्कॅल्पिंग ट्रेडिंग असे म्हणतात. Scalping Trading हा एक अतिशय कमी कालावधीत म्हणजेच अल्पकालावीधत केला जाणारा व्यवहार आहे. यात संबंधित व्यक्तीला 5 ते 10 मिनिटांच्या आत निर्णय घेऊन योग्य शेअर्सची खरेदी करणे आवश्यक असते. यामध्ये ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन (Breakout & Breakdown) आणि त्यानंतर बिड आणि आस्कला या पर्यायांचा वापर करून योग्य शेअरची खरेदी करता येते.
कसे कमवाल स्कॅल्पिंगमधून पैसे? (How to earn money from Scalping?)
इतर कोणत्याही मार्गाने पैसे मिळवण्यापेक्षा स्कॅल्पिंगद्वारे पैसे कमविणे हे सर्वात कठीण काम आहे. कारण यामध्ये तुम्हाला योग्य वेळेची संयमाने वाट पहावी लागते. ज्यावेळी एखादा शेअर्स तुम्हाला हव्या त्या किमतीवर पोहोचेल त्यावेळी तो ट्रेड करावा लागतो. यातून योग्य प्रकारे पैसा कमावण्यासाठी तुम्हाला अधिक कौशल्य आणि शिस्तीने विक्री आणि खेरदी करणे आवश्यक असते. मात्र, यात नफा कमी होत असल्याने अधिक ट्रेडिंग करणे गरजेचे असते. यामध्ये जर समजा एखादी डिल चुकीची ठरली तर, त्यातून त्वरीत बाहेर पडावे. कारण असे न केल्यास इतर ट्रेडमध्ये झालेला नफादेखील कमी होण्याची दाट शक्यता असते.
कोणताही स्टॉक एका सरळ रेषेत वर किंवा खाली जात नाही. प्रत्येक स्टॉक त्याच्या ट्रेंडमध्ये असतो. अनेकदा यात करेक्शन येते. हीच स्कॅल्परसाठई ट्रेडिंगची योग्य वेळ असते. ज्यातून तुम्हाला ट्रेडिंग करून पैसे कमवता येऊ शकतात. या व्यतिरिक्त जेव्हा एखादा स्टॉक त्याच्या रेंज, सपोर्ट, रेझिस्टन्सच्या जवळ असतो आणि नंतर ब्रेकआउट होतो. त्यावेळी यामध्ये चांगला बदल अपेक्षित असतो. त्यामुळे असे झाल्यास त्या शेअर्समध्ये तुम्ही पैसे गुंतवून चांगले पैसे कमवू शकता.
स्कॅल्पिंग ट्रेडिंगचे फायदे (Benefits of Scalping Trading)
स्कॅल्पिंग ट्रेडिंग अनेक फायदे आहेत. जसे की, याच्या मदतीने तुम्ही खूप कमी वेळात तुमचे पैसे वाढवू शकता. यात तुम्हाला बाजाराती ओव्हर नाईटचा धोका नाहीये. यात तुम्हाला अधिक ट्रेड करणे आवश्यक असते. जेणेकरून शेअर बाजारातील बारकावे सहज समजण्यास मदत होते. स्कॅल्पिंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या मार्केटमध्ये पैसे कमवू शकता.