Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Saving: बचत म्हणजे काय? बचत महत्त्वाची का आहे?

What is Saving

What is Saving: पैशांची बचत म्हणजे फक्त साठवणूक किंवा संपत्ती निर्माण करणे नाही. बचत म्हणजे भविष्यातील तरतूद, आर्थिक सुरक्षितता. बचतीच्या आधारे भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. बचतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्याचबरोबर भविष्यातील अनेक प्रकारच्या चिंता कमी होण्यास मदत मिळते.

What is Saving: साधारणपणे बचत काय असते हे आपण जाणतो. लहान मुलांना आपण पैसे आणि बचतीचे महत्त्व समजून सांगताना पिगी बँकेचे उदाहरण देतो. हे पैशांची बचत करण्याचे उत्तम उदाहरण आहे. पण या पिगी बँकेतून फक्त पैसे साठतात. त्यात जेवढी साठवणूक केली जाईल, तेवढी त्यात वाढ होईल. पण वाढत्या महागाईबरोबर त्यात वाढ होत आहे का? किंवा मुद्दल रकमेमध्ये वाढ होत आहे का? नाही ना, मग याला बचत म्हणायचे का? बचत म्हणजे नेमके काय? बचत आणि गुंतवणूक यामध्ये काय फरक आहे? आणि बचत कोठे आणि कशी केली पाहिजे? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. तर आज आपण याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.

बचतीच्या संदर्भातील या प्रश्नांची उत्तरे तर आपण जाणून घेणार आहोतच. पण त्याचबरोबर बचतीमुळे आपण आर्थिक अडचणींवर कशी मात करू शकतो. त्याचबरोबर गरजेच्यावेळी बचतीचा कसा उपयोग होतो, हे देखील समजून घेणार आहोत.

बचत म्हणजे काय?

पैशांची बचत म्हणजे फक्त साठवणूक किंवा संपत्ती निर्माण करणे नाही. बचत म्हणजे भविष्यातील तरतूद, आर्थिक सुरक्षितता. बचतीच्या आधारे भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. बचतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्याचबरोबर भविष्यातील अनेक प्रकारच्या चिंता कमी होण्यास मदत मिळते. एकूणच बचतीमुळे आपत्कालीन परिस्थितीवर मात करता येते. मोठी खरेदी करता येते किंवा निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैसे वापरता येतात.

बचतीचा नियमित फंडा

आपल्यापैकी अनेकांना बचतीचे वेगवेगळे उपाय माहिती आहेत. म्हणजे काय केले की बचत होऊ शकते. पण बचत म्हणजे नेमके सांगायचे झाले तर, प्रत्येक महिन्याला जे काही उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातून महिन्याचा खर्च वजा करून जी रक्कम शेवटी उरते. त्याला सर्वसाधारणपणे बचत म्हटले जाते. आता ही शिल्लक राहिलेली रक्कम घरात किंवा बँकेत ठेवली जाते किंवा इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवली जाते किंवा रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी जमा केली जाते.

बचतीचे महत्त्व 

जेव्हा एखादी आर्थिक समस्या येते. तेव्हा त्या समस्येवर उपाय म्हणजे फक्त पैसा हाच असतो. त्यामुळे जास्तीत जास्त आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर पैशांची बचत करणे गरजेचे आहे. सेव्हिंगस् (बचत) म्हणजे तुमच्यावर आलेल्या संकटातून मार्ग काढण्याची छत्री. सेव्हिंगची ही छत्री जोपर्यंत तुमच्या डोक्यावर असेल, तोपर्यंत तुम्ही निश्चितपणे आयुष्य जगू शकाल. इतके बचतीचे महत्त्व आहे.

Difference between Saving & Investment

बचत आणि गुंतवणूक यामध्ये फरक काय?

बऱ्याचवेळा अनेकांचा बचत आणि गुंतवणूक यामध्ये गोंधळ उडतो. जसे पूर्वी लोकांना आयुर्विमा (इन्शुरन्स) किंवा प्लॅन म्हटले की फक्त एलआयसी (LIC) माहित होते. त्याचप्रमाणे बचत आणि गुंतवणूक या एकमेकांना पूरक आणि चांगल्या आर्थिक स्थैर्यासाठी गरजेच्या आहेत; पण त्यांच्यात किचिंत फरकदेखील आहे. बचत म्हणजे एकूण जमा रकमेतून खर्च करून उरलेली शिल्लक रक्कम. जी खर्चासाठी वापरली जात नाही आणि गुंतवणूक म्हणजे खर्चातून बाजुला काढलेली शिल्लक रक्कम शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, बॉण्ड्स, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणे. जेणेकरून गुंतवणूक केलेल्या निधीतून भविष्यात जास्त परतावा मिळू शकतो.

बचत कोठे आणि कशी केली पाहिजे?

मार्केटमध्ये बचतीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक पर्यायाची वेगवेगळी उद्दिष्ट्ये आहेत. तसेच त्यावर मिळणाऱ्या परताव्याचा दरदेखील वेगवेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार बचत केली पाहिजे. बचतीच्या विविध पर्यायांमध्ये बचत खाते (Saving Account), भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employee Provident Fund), पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) आदी पर्याय उपलब्ध आहेत.