Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Salary Protection Insurance म्हणजे काय?

Salary Protection Insurance

Salary Protection Insurance: “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” म्हणजे “Plan for the Best and Prepare for the Worst” स्वरूपाचा पर्याय आहे. नियमित उत्पन्न घेणाऱ्या प्रत्येकाने त्याचा “बॅक-अप” म्हणून “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” घेणे आवश्यक आहे.

“Salary is something which comes like tortoise and goes like rabbit” अर्थात कासवाच्या गतीने येणारी आणि सशाच्या वेगाने नाहीसे होणारी गोष्ट म्हणजे “सॅलरी (मासिक वेतन / पगार)”. पण एक दिवस अचानक सॅलरी आलीच नाही तर!!! आणि त्याहीपेक्षा विचित्र म्हणजे एक दिवस सॅलरी आणणारी ही "ब्रेड-विनर" व्यक्तीच नाही राहिली तर!!!!

विदारक परिस्थितीत कुटुंबाचा आर्थिक आधार!

सद्यस्थितीमध्ये महागाईने सॅलरी पुरत नाही हे मान्य. परंतु जीवनाची एकमेव निश्चितता म्हणजे मृत्यू. संपूर्ण कुटुंबाचा आधार असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू फक्त सॅलरी (पगार) थांबवत नाही, तर अनेक प्रश्न मागे ठेवून जातो. अगदी अलिकडेच Covid-19 ने अनेक घरांतील कर्त्या-कमावत्या व्यक्तींचा बळी घेतला. इन्शुरन्स-पॉलिसीचे लाईफ कव्हर नसल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक अवस्था बिकट झाली. "सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स" अशा दुर्दैवी परिस्थितीमध्ये कुटुंबाचा आर्थिक आधार बनू शकतो.

सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स – टर्म इन्शुरन्स पॉलिसी

"सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स" (Salary Protection Insurance), ही एक “टर्म इन्शुरन्स पॉलिसी” आहे. या पॉलिसीला “Income Protection Insurance” म्हणून देखील ओळखले जाते. पॉलिसी टर्ममध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मासिक आर्थिक आधार देणे आणि त्यांची जीवनशैली कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे, हे या पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. या पॉलिसी अंतर्गत, पॉलिसी टर्म समाप्त होईपर्यंत नियमित पेआउट म्हणजे मासिक उत्पन्न किंवा एकरकमी पेमेंटसह नियमित उत्पन्न (Lumpsum + Monthly Income) दिले जाते. याचसोबत काही प्लॅन्समध्ये दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वाढत जाणारे मासिक उत्पन्न देण्याचा देखील पर्याय उपलब्ध असतो.


नो मॅच्युरिटी बेनिफिट्स! 

अशा प्रकारच्या पॉलिसीची निवड करताना पॉलिसी-इच्छुकाने (Proposer) आपल्या कुटुंबाच्या आजच्या आणि भविष्यातील शक्य असू शकणाऱ्या गरजांचा विचार करून मासिक उत्पन्न, पॉलिसीचा कालावधी (Policy Term), प्रीमियम भरण्याचा कालावधी (Premium Payment Term- PPT) आणि “डेथ बेनिफिट” रकमेचा पर्याय निवडणे योग्य ठरेल. यासोबत हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की, अशा पॉलिसीमध्ये कोणतेही “मॅच्युरिटी बेनिफिट्स” नाहीत. पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत नॉमिनीला केवळ खात्रीशीर मृत्यू लाभ (Guaranteed Death Benefits) म्हणून आर्थिक आधार मिळतो. अर्थात असे मिळणारे मासिक उत्पन्न हे पॉलिसीधारकाच्या तेव्हाच्या मासिक उत्पन्नापेक्षा (Take-Home Amount) पेक्षा कमी किंवा समान असू शकते.

नियमित वाढत जाणाऱ्या मासिक उत्पन्नाचा विशेष पर्याय

या पॉलिसीच्या अंतर्गत, नियमित उत्पन्न देणाऱ्या किंवा एक-रकमी पेआऊट देणाऱ्या प्लॅन्स व्यतिरिक्त नियमित वाढत जाणाऱ्या मासिक उत्पन्नाचा विशेष पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे पॉलिसीधारकाने निवडलेल्या मासिक उत्पन्नामध्ये प्रतिवर्ष ठराविक टक्के वाढ होत जाते. उदाहरणार्थ कुटुंबाला मिळणाऱ्या मासिक उत्पन्नावर इन्शुरन्स कंपनीने 5% इतकी वार्षिक चक्रवाढ वाढ देण्याचे ठरविले, तर प्रत्येक पॉलिसी वर्षात, कुटुंबाला मिळणारे मासिक रक्कम मागील वर्षाच्या मासिक उत्पन्नाच्या 105% इतके असेल.

आर्थिक गरजांचे रक्षण करणारा प्लॅन

अर्थात हे समजून घेतले पाहिजे की “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” हा देखील एक टर्म प्लॅनच आहे. पॉलिसीधारकाचे पॉलिसी-कालावधीमध्ये दुर्दैवी निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांचे रक्षण करणारा हा प्लॅन असून याद्वारे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मासिक उत्पन्न मिळू शकेल.

नियमित उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याचा “बॅक-अप” म्हणून अशी “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” घेणे आवश्यक आहे. सुदैवाने त्याला पॉलिसी-टर्म मध्ये काही झाले नाही आणि त्याला आर्थिक लाभ जरी मिळाले नाहीत, तरीही त्याने त्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या निर्धास्तपणे पूर्ण केलेल्या असतील. थोडक्यात, “सॅलरी प्रोटेक्शन इन्शुरन्स” म्हणजे “Plan for the Best and Prepare for the Worst” स्वरूपाचा पर्याय आहे.