Release Deed: वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांचा अधिकार असतो, वडिलांना दोन मुलं असतील तर ती संपत्ती समान वाटून दिली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? जर दोन पैकी एकाला ती संपत्ती नको असेल तर 'हक्कसोड पत्र' तयार करून द्यावं लागते. तेव्हाच ती संपत्ती हस्तांतरित करून दुसऱ्याच्या नावावर करता येऊ शकते. हक्कसोड पत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Table of contents [Show]
हक्कसोड पत्र म्हणजे काय? What is Release Deed?
हक्कसोड पत्र हा एक कायदेशीर दस्तऐवज(Legal document)आहे. ज्याद्वारे कायदेशीर वारस त्याच्या सह-वारसाच्या नावे मालमत्तेचा हक्क देतो. त्याचप्रमाणे, मालमत्तेतील त्यांचे कायदेशीर हक्क सोडण्यासाठी आई-वडील, मुलगा, मुलगी, भाऊ आणि बहीण यांसारख्या जवळच्या नातेवाईकांमध्ये हे करार केले जाऊ शकतात. करार करण्यासाठी महत्वाच्या बाबी,
- मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असावी किंवा मालमत्तेत त्याचा वाटा असावा.
- वारसा हक्काने मिळालेलीच संपत्ती सोडायची असल्यास हा करार करावा लागते.
- येथे आपल्या सह-मालकाच्या बाजूने हक्क सोडावा करावा लागतो.
- कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या नावे मालमत्ता करू शकत नाही.
हक्कसोड पत्र नोंदणी करणे आवश्यक (Release Deed must Registered)
- नोंदणी कायदा (Registration Act) 1908 नुसार हक्कसोड पत्र नोंदणी करणे आवश्यक आहे.
- त्यासाठी तुम्हाला वकील नियुक्त करावा लागेल.
- सर्व प्रथम, संपूर्ण डिटेल्ससह स्टॅम्प पेपरवर (Stamp paper) ठरल्यानुसार मसुदा तयार करा.
- फॉरमॅट तयार झाल्यानंतर, ते तुमच्या जिल्ह्याच्या सब-रजिस्ट्रारकडे नोंदणीसाठी सबमिट करा.
- मालमत्ता असलेल्या जिल्ह्याच्या निबंधकांशी (District Registrar) संपर्क साधा आणि शुल्क (Registration fee) भरून नोंदणी करा.
- नोंदणीसाठी तुम्हाला दोन साक्षीदारांची (The Witness)आवश्यकता असेल.
- यासोबतच ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड (Identity Card, Passport Size Photo, Aadhaar Card) इत्यादि आवश्यक कागदपत्रे आवश्यक असतील.
- रजिस्ट्रारसमोर 2 साक्षीदारांसह स्वाक्षरी करावी लागेल.
हक्कसोड पत्रासाठी येणारा अंदाजित खर्च (Estimated cost)
स्टॅम्प पेपर | 100 |
टायपिंग | 100 |
नोंदणी शुल्क | 100-250 |
विविध खर्च | 500 |
एकूण | 800-1000 |
हक्कसोड पत्राचे फायदे (Benefits Released Deed)
- हक्कसोड पत्र करण्याचे अनेक फायदे आहेत.
- हे कायदेशीर दस्तऐवज आहे. हे करून तुम्ही मालमत्तेची मालकी सहजपणे सोडू शकता.
- एकदा एखादे डीड केले आणि नोंदणीकृत केले की ते परत केले जाऊ शकत नाही.
- हे काम कोणत्याही त्रासाशिवाय आणि कमी खर्चात सहजपणे केले जाते.
हक्कसोड पत्राची नोंदणी करणे आवश्यक आहे का? (Is it necessary to register Release Deed?)
त्याची नोंदणी करणे कायदेशीररित्या आवश्यक आहे आणि नोंदणीकृत नसलेल्या डीडला कायदेशीर वैधता नाही. रिलिंक्विशमेंट डीड करून, तुम्ही मोबदल्याच्या बदल्यात काही पैसे देखील घेऊ शकता, म्हणजे तुमच्या मालमत्तेचे हस्तांतरण, (Transfer of property)तर तुम्ही देणगीच्या डीडमध्ये असे करू शकत नाही.