नॉन-व्होटिंग शेअर्स हे अगदी नावाप्रमाणेच नॉन-व्होटिंग शेअर्स असतात. म्हणजे या शेअर्स धारकांना मतदानाचा हक्क नसतो. म्हणजे शेअर्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील नॉन-व्होटिंग शेअर्सला मदतानाचा अधिकार नसतो. काही वर्षांपूर्वी, सार्वजनिक कंपनी कायदा (Public Company Act) अंतर्गत सर्व प्रकारच्या शेअर्सना समान अधिकार होता. म्हणजे सर्व शेअर्सधारकांना मतदान करण्याचा अधिकार होता. पण कंपनी कायदा 2000 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्या सुधारणा कायद्यात प्रथमच सार्वजनिक मर्यादित कंपन्यांसाठी (Public Limited Company) नॉन-व्होटिंग राईट इक्विटी कॅपिटल (Non-Voting Right Equity Capital) ही संकल्पना सार्वजनिकरीत्या मांडण्यात आली. त्यानंतर नॉन-व्होटिंग शेअर्सचा वापर जॉईंट व्हेनचर आणि फॉरेन कोलॅब्रेशन यांच्यातील वेगवेगळ्या व्यवहारांच्या स्ट्रक्चरचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे केला जाऊ लागला.
Table of contents [Show]
नॉन-व्होटिंग शेअर्स का जारी केले जातात? Whys Non-Voting Shares Isses?
जेव्हा कंपनीचे संस्थापक किंवा संचालकांना मार्केटमधून नवीन भांडवल उभारयचे असते. पण त्याचवेळी त्यांना कंपनीवरील स्वत:चे नियंत्रण कमी करायचे नसते. त्यांना त्यांचा कंपनीवरील हक्क अबाधित ठेवायचा असतो. तेव्हा ते नॉन-व्होटिंग शेअर्स जारी करतात. बऱ्याचदा कंपन्या मूळ भागधारकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यातील बराचसा साठा स्वत:कडे ठेवतात आणि ज्या शेअर्स प्रकाराला पुरेसे अधिकार नाहीत. विशेषत: नॉन-व्होटिंग सारख्या शेअर्सना मतदान करण्याचे अधिकार नाहीत. असे शेअर्स बऱ्यापैकी जारी केले जातात.
नॉन-व्होटिंग शेअर्सबद्दल महत्त्वाचे! (Important about Non-Voting Shares!)
- नॉन-व्होटिंग शेअर होल्डरला कंपनीच्या मिटिंगमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो.
- पण नॉन-व्होटिंग शेअर होल्डरला कंपनीच्या भांडवलातील काही भागाचा हक्क असतो.
- त्याला कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाग घेता येत नाही.
- नॉन-व्होटिंग शेअर्स बहुतेक कर्मचाऱ्यांना किंवा मुख्य भागधारकांच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जातात.
- शेअर्सचा हा वर्ग मुख्य भागधारकांना भागधारकांची संख्या वाढवताना कंपनीवर नियंत्रण ठेवू देतो.
कंपनी कोणकोणते शेअर्स जारी करू शकते?
कंपनी प्रामुख्याने शेअर्सचे मुख्य प्रकार म्हणजे सामान्य शेअर्स (Ordinary Shares), प्रेफरन्स शेअर्स (Preference Shares) आणि नॉनव्होटिंग शेअर्स (Non-Voting Shares) जारी करू शकते. सामान्य किंवा ऑर्डनरी शेअर्स हे शेअर्स सर्वात बेसिक वर्गातील शेअर्स मानले जातात. या शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांना किंवा भागधारकांना कंपनीची मिटिंग अटेंड करण्याचा, त्यात मतदान करण्याचा आणि लाभांश मिळवण्याचा अधिकार मिळतो. जेव्हा लाभांश देण्याची आणि वितरण करण्याची वेळ येते, तेव्हा प्राधान्य ऑर्डनरी शेअर्सधारकांना दिले जाते. त्यानंतर नॉन-व्होटिंग शेअर्सधारकांचा विचार केला जातो.
शेअर्सचे मुख्य प्रकार (Types of Shares)
ऑर्डीनरी शेअर्स (Ordinary shares)
नॉन-व्होटिंग शेअर्स (Non-voting shares)
प्रेफरन्स शेअर्स (Preference shares)
कुमुलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स (Cumulative preference shares)
रिडिमेबल शेअर्स (Redeemable shares)
डीव्हीआर शेअर्स | DVR Shares
सर्वच देशात यासंबंधीचे कायदे!
भारतात कंपनी कायद्यात (Company Act) सार्वजनिक कंपनीला समभाग जारी करताना नॉन व्होटिंग स्टॉकसाठी विशेष सवलती देण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. ब्रिटन, जर्मनी आणि रशियासह अनेक देशांमध्ये नॉनव्होटिंग स्टॉकविरूद्ध कायदे किंवा धोरणे आखण्यात आली आहे. अमेरिकेत सर्वच कंपन्या नॉन व्होटिंग स्टॉकची ऑफर देत नाही. परंतु, अनेक कंपन्या ऑफर देतात. त्यात लाभांश आणि इतर फायदे देण्यात येतात.