Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सामान्य शेअर्स (Ordinary shares) किती महत्त्वाचे आहेत, हे फायदे जरूर वाचा

सामान्य शेअर्स (Ordinary shares) किती महत्त्वाचे आहेत, हे फायदे जरूर वाचा

Image Source : www.unbiased.co.uk

सामान्य शेअर्सद्वारे (Common Shares) गुंतवणूक करण्यात सर्वात जास्त धोका असतो त्याचबरोबर सर्वाधिक आर्थिक नफा देण्याची क्षमता देखील सामान्य शेअर्समध्येच असते.

सामान्य शेअर्स (Ordinary Shares) हे कॉमन शेअर्स (Common Shares) म्हणून ही ओळखले जातात. सामान्य किंवा कॉमन शेअर्स हे असे शेअर्स आहेत, जे सर्वसामान्य गुंतवणूकदारा किंवा भागधारकांना कंपनीच्या बैठकीत मतदान करण्याच्या अधिकाराबरोबरच कंपनीला झालेल्या नफ्यातील वाटा लाभांश म्हणून देतात.

सामान्य शेअर्स हे शेअर्सच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहेत. गुंतवणुकदाराच्या मालकीच्या सामान्य समभागांची संख्या त्याच्या/तिच्या कंपनीत असलेल्या मालकीच्या टक्केवारीच्या प्रमाणात असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीने स्टॉक मार्केटमध्ये तिचे सर्व 50 शेअर जारी केले आणि त्यापैकी 30 शेअर्स तुमच्या मालकीचे असतील. तर तुमच्याकडे कंपनीची 60 टक्के मालकी असेल.

शेअर्सचे प्रकार

ऑर्डीनरी शेअर्स ( Ordinary shares)
नॉन-व्होटिंग ऑर्डीनरी शेअर्स ( Non-voting ordinary shares)
प्रेफरन्स शेअर्स ( Preference shares)
क्युम्यु लेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स ( Cumulative preference shares)
रिडिमेबल शेअर्स ( Redeemable shares)
डीव्हीआर शेअर्स (DVR Shares)

सामान्य शेअर्सचे बरेच फायदे आहेत. सामान्य शेअर्स धारकांना भागधारकांशी संबंधित विविध बाबींवर कंपनीच्या मीटिंगमध्ये मत देण्याचा अधिकार तर असतोच, पण त्याचबरोबर कंपनीच्या उत्पन्नातील लाभांशावर दावा करू शकतात. सामान्य शेअर्सला अंत नसतो. म्हणजे कंपनी जोपर्यंत स्वतःला डिलीस्ट करून घेत नाही किंवा दुसरी कंपनी तिला ताब्यात घेत नाही, तोपर्यंत कंपनीमधील मालकी अबाधित असते. साधारणत: कंपनीसाठी भांडवल उभे करण्यासाठी सामान्य किंवा कॉमन शेअर्स बाजारात आणले जातात. कंपनीला भविष्यात आणखी सामान्य शेअर्स आणायची इच्छा असली तरी, कंपनीला अगोदर जुन्या गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय द्यावा लागतो. 

सामान्य भागधारकांना सहसा असुरक्षित कर्जदार म्हणून संबोधले जाते. लाभांशच्या वाट्यात यांचा क्रमांक सर्वांत शेवटी असतो. जर कंपनी बंद झाली तर सामान्य शेअर्स होल्डरला सर्वात शेवटी पैसे दिले जातात. सामान्य भागधारकांना लाभांशाची हमी नसते. सामान्य शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात जास्त धोका असतो, पण त्याचबरोबर सर्वाधिक नफा देण्याची क्षमता देखील याच शेअर्समध्ये असते.