What is NABARD bank and its Functions: नाबार्ड (NABARD) या शब्दाचा फुलफार्म ‘नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट’ (National Bank for Agriculture and Rural Development) असा आहे. या बॅंकेची स्थापना 2 जुलै 1982 रोजी करण्यात आली आहे. भारताच्या ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी नाबार्ड व ग्रामीण विकास कायदा, 1981 च्या तत्वांनुसार नाबार्डची स्थापना केली गेली. थोडक्यात पूर्वी शेती व्यवसायासाठी व ग्रामीण भागासाठी भारतीय रिझर्व्हं बॅंक काम करत होती, आता ही कामे नाबार्ड बॅंक करत आहे. जसे की, शेतीसाठी स्वातंत्र्य बॅंक असाव्या या उद्देशाने अधिक कृषी व ग्रामीण विकास राष्ट्रीय बॅंका स्थापन करण्यात आल्या आहेत, त्याला नाबार्ड बॅंक असे म्हटले गेले. या बॅंकेचे कार्य पाहुयात.
Table of contents [Show]
कर्ज पुरवठा करणे (Providing Loans)
नाबार्ड बॅंक ही अल्पमुदत, मध्यम व दीर्घमुदतीसाठी कर्जपुरवठा करते. ती यामध्ये राज्य सहकारी बॅंका, क्षेत्रीय ग्रामीण बॅंका, भूविकास बॅंका इत्यादी बॅंकाना कर्जपुरवठा करण्याचे कार्य करते.
आर्थिक साहाय्य (Financial Help)
नाबार्डकडे अनेक बॅंका आहेत, जे शेती क्षेत्राचा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा, या हेतूने ग्राहक बॅंका व संस्थांना कर्जाचा पुरवठा करते. या बॅंका ग्रामीण भागातील प्रकल्प जसे की, हस्तकला उद्योग, फूड उद्योग, लघु उद्योग, कुटीरउद्योग व इतर ग्रामीण अर्थव्यवस्थाना आर्थिक साहाय्य करण्याच्या हेतूने पतनियोजन करते.
सर्व वित्त संस्थावर लक्ष ठेवणे (Monitoring All Financial Institutions)
नाबार्डव्दारे देण्यात येणारा आर्थिक पुरवठा योग्य ठिकाणी वापरला जातो की, नाही यावर बारकाईने लक्ष देण्याचे काम नाबार्ड करते. अर्थात एका परीक्षणाची जबाबदारी पार पाडते. जसे की, ग्रामीण प्रकल्पांमध्ये समावेश असणाऱ्या ग्राहक बॅंका, संस्था, पत व पतपुरवठा नसलेल्या संस्थांवर बारकाईने लक्ष ठेवते.
विकासात्मक कार्य (Developmental Work)
शेती क्षेत्राचा विकास करणे व ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी नाबार्ड बॅंकेकडे असते. या गोष्टीचे पालन करण्यासाठी नाबार्ड अनेक विकास उपक्रम हाती घेते. सोबतच स्थानिक बॅंकांना घेऊन विकासाचा आराखडा तयार करण्यास मदत करते. त्यांच्या या भूमिकेचा व कार्याचा प्रभाव हा कृषी क्षेत्राची प्रगती व ग्रामीण विकासावर मोठया प्रमाणात होतो.