• 24 Sep, 2023 05:09

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund SIP: SIP मध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय? मग जाणून घ्या फायदे

Mutual Fund SIP: SIP मध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय? मग जाणून घ्या फायदे

आता पैसे बचत करण्याच्या गोष्टींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सुद्धा आपला मोर्चा इतर ठिकाणी वळवला आहे. गुंतवणुकदार सध्याच्या घडीला लोकप्रिय असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यात SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकांच्या सोयीचा असल्याने जास्त प्रसिद्ध होत आहे.

मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण, त्यात SIP जास्त लोकप्रिय आहे. तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायचे ठरवल्यास आणि तुम्हाला मोठा फंड बनवायचा असल्यास, तुमच्यासाठी SIP बेस्ट पर्याय आहे. कारण, SIP मध्ये महिन्याला तुम्हाला तुमच्या बजेटनुसार रक्कम टाकता येते. तसेही मोठा फंड बनवण्यासाठी, दीर्घ काळ गुंतवणूक करावी लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला त्या गुंतवणुकीवर जास्त रिटर्न मिळायला मदत होईल. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला SIP चे फायदे माहिती असणे आवश्यक आहे.

SIP म्हणजे काय?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) नावावरूनच या प्लॅनचा दृष्टीकोन लक्षात येतो. या प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडमध्ये ठराविक रक्कम नियमित गुंतवल्या जाते. जसे की महिन्यातून एकदा किंवा तिमाहीत एकदा म्हणजेच एक ठोक रक्कम न भरता, या प्लॅनमध्ये गुंतवणूक करता येते. यालाच SIP म्हणतात. तुम्ही जर दीर्घ काळासाठी गुंतवणूक करत असल्यास, तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो. 

तसेच, या प्लॅनमध्ये रिकरिंग डिपाॅझिटसारखीच गुंतवणूक करता येते, म्हणजे तुम्ही SIP मध्ये महिन्याला गुंतवणूक करू शकता. बॅंकेला तसे निर्देशित केल्यास, तुमच्या खात्यातून तुम्ही ठरवलेली एक रक्कम आपोआप कट होते. त्यामुळेच हा प्लॅन लोकप्रिय झाला आहे. तसेच, काही फंडचे रिटर्नचे आकडे पाहिल्यास, ते थक्क करणारे आहेत. त्यामुळेच लोकांचा SIP वरचा विश्वास आणि गुंतवणुकही वाढली आहे. तुम्ही SIP मध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये ही रक्कम जास्त ही असू शकते.

SIP द्वारे गुंतवणूक करण्याचे फायदे

तुम्हाला हवी तेवढी रक्कम गुंतवण्याचा तुमच्याजवळ पर्याय उपलब्ध राहणार आहे. तसेच, तुम्हाला SIP मध्ये कमीतकमी गुंतवावी लागणारी रक्कम दाखवण्यात येईल. तुमच्या बजेटनुसार किती रक्कम गुंतवयाची हे तुम्ही ठरवू शकता.

तसेच, तुमच्याजवळ पैशांचा सोर्स नसल्यास, तुम्ही SIP रद्द ही करू शकता. लाॅक इन कालावधी असलेल्या फंडात तुम्ही गुंतवणूक केली असली तरी तो संपण्याआधी तुम्ही गुंतवणूक थांबवू शकता. तुम्ही कोणत्याही कारणासाठी गुंतवणूक करणे थांबवू शकता. त्यात तुम्हाला मिळालेला रिटर्न तुमच्या खात्यात जमा होईल. 

तुम्हाला वाटल्यास तुम्ही SIP मध्ये वाढही करू शकता. SIP मध्ये गुंतवणुकीचा अजून एक फायदा आहे. तो म्हणजे तुम्ही SIP ची रक्कम अ‍ॅडजस्ट करू शकता. म्हणजेच तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करत आहात. तो फंड चांगली कामगिरी करत असल्यास, तुम्ही त्याचा महिना वाढवू शकता आणि तुम्हाला पैसे काढून दुसऱ्या फंडमध्ये गुंतवायचे असल्यास, तेही सहज करू शकता. त्यामुळे तुमच्या पैशाला कुठे गुंतवायचे हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून राहणार आहे.