शेअर मार्केटमध्ये ज्याप्रमाणे कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. त्यानुसार मार्केटमधील कमोडिटी प्रकारात ज्याची खरेदी विक्री केली जाते, त्याला कमोडिटी ट्रेडिंग म्हटले जाते आणि जिथे ही खरेदी-विक्री होते त्याला मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्स म्हटले जाते. कमोडिटी मार्केटमधील ट्रेडिंग ही नियमित शेअर मार्केटमधील शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा थोडी वेगळी असते.
Table of contents [Show]
कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास काय आहे?
कमोडिटी ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर भारतात 1875 मध्ये बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशन या कमोडिटी ट्रेडिंग सेंटरच्या स्थापनेपासून कमोडिटी ट्रेडिंगची सुरूवात झाली होती. कमोडिटीची इतिहास हा शेअर्सच्या ट्रेडिंगपेक्षा जुना आहे. कारण खूप पूर्वीपासून वस्तुंची देवाण-घेवाण आणि खरेदी-विक्रीची पद्धत अस्तित्वात होती. ढोबळमानाने कमोडिटीचे 3 ते 4 प्रकारात वर्गीकरण केले जाते. यामध्ये मौल्यवाध धातू, बेस मेटल, एनर्जी (ऊर्जा) आणि मसाल्याचे पदार्थ तसेच शेतीमाल यांचा समावेश होतो.
मौल्यवान धातूमध्ये सोने, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातुंचा समावेश होतो. बेस मेटलमध्ये तांबे, शिसे, अल्युमिनिअम, जस्त यांचा समावेश होतो. एनर्जी (ऊर्जा)मध्ये क्रूड ऑईल (कच्चे ऑईल), नैसर्गिक गॅस, गॅसोलाईन यांचा तर मसाल्यांमध्ये मसाल्याचे पदार्थ आणि शेतीमालामध्ये धान्यांचा समावेश होते.
कमोडिटी मार्केटचा व्यवहार कोठे होतो?
कमोडिटी मार्केटचा मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (Multi Exchange of India Limited-MCX) या व्यतिरिक्त नॅशनल कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज (National Commodity and Derivative Exchange-NCDEX) आणि इंडियन कमोडिटी एक्सचेंज (ICEX) इथे व्यवहार चालतो. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange-NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) इथेही व्यवहार चालतात.
कमोडिटी आणि शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये काय फरक आहे?
शेअर मार्केट आणि कमोडिटी ट्रेडिंगमध्ये काही मूलभूत फरक दिसून येतात. जसे की, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना एखाद्या कंपनीचा शेअर गुंतवणूकदार एका दिवसात किंवा अनेक वर्षांनंतरही विकू शकतो. पण कमोडिटी मार्केटमध्ये एखादा ट्रेड हा फक्त 2-3 महिन्यांसाठी केला जाऊ शकतो.
कमोडिट ट्रेडिंगचे नियमन कोण करते?
सिक्युरिटी अण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities & Exchange Board of India-SEBI) भारतातील सर्व प्रकारच्या ट्रेडिंगचे नियमन करते. पण सेबीने कमोडिटी मार्केटवर थेट देखरेख ठेवण्यासाठी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट रेग्युलेशन डिपार्टमेंट (CDMRD) या संस्थेची नियुक्ती केली आहे. ही संस्था थेट कमोडिटी ट्रेडिंगवर देखरेख ठेवते आणि ही संस्था सेबीला रिपोर्ट करते.