Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSME म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम कसा होतो?

msme day

MSME DAY 2022 : 6 एप्रिल 2017 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाच्या 74 व्या बैठकीत 27 जून हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) दिवस म्हणून पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

MSME DAY 2022 : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (Micro, Small & Medium Enterprises-MSME) विभाग हा गेल्या 15-16 वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात सक्रिय आणि गतिमान विभाग मानला जातो. मोठमोठ्या उद्योगांच्या तुलनेत कमी भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात एमएसएमई (MSME) या विभागाचा महत्त्वाचा वाटा आहे. यामुळे ग्रामीण आणि मागास भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्याचे काम केले आहे. गेल्या 15 वर्षात या MSMEच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम झाले आहे. या क्षेत्राचा देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोठा वाटा आहे.


कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील उद्योगांवर अवलंबून असते. देशाच्या जीडीपी (GDP) मध्ये लहान-मोठ्या उद्योगांचे योगदान अधिक असते. केंद्र सरकारने 2006 मध्ये एमएसएमई योजना सुरू केली. एमएसएमई म्हणजे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (Micro, Small & Medium Enterprises-MSME). यात लहानमोठ्या वस्तूंचे उत्पादन करणारे, वस्तूंवर प्रक्रिया, त्यांची साठवण करणाऱ्या लहानलहान उद्योगांचा समावेश होतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत MSME चे योगदान

भारतीय अर्थव्यवस्थेत MSMEचा भरीव योगदान आहे. देशाच्या एकूण जीडीपीपैकी 29 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा हा एमएसएमईचा आहे. देशातील 50 टक्के निर्यात मालामध्ये एमएसएमईचा वाटा आहे. उत्पादन क्षेत्रातील जवळजवळ एक तृतियांश भाग हा एमएसएमईवर अवलंबून आहे. या क्षेत्रात जवळपास 11 कोटी लोक काम करत असून लवकरच हा आकडा 15 कोटींपर्यंत जाईल.

एमएसएमईचा फायदा काय आहे?

एमएसएमई, म्हणजे सूक्ष्ण, लघु आणि मध्यम प्रकारचा उद्योग सुरू करण्यासाठी कमी भांडवल लागतं आणि यातून चांगला नफा मिळवता येतो. तसेच याचा ग्रोथ रेट ही चांगला आहे. यातून अनेक लहान-मोठे प्रोडक्ट तयार केले जातात. बऱ्याचवेळा मोठमोठ्या कंपन्या अनेक महत्त्वाचे पार्ट एमएसएमई उद्योगांमधून करून घेत असतात. यामुळे देशातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

एमएसएमईला कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो?

या क्षेत्राला सर्वाधिक आर्थिक पुरवठ्याची गरज आहे. पुरेशा प्रमाणात आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे या क्षेत्राची वाताहात होत आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांची वानवा दिसून येते. या क्षेत्राला ऑर्गनाईज् करण्याची नितांत गरज आहे.

‘एमएसएमई’करीता कोणत्या सरकारी योजना आहेत?

भारतीय अर्थव्यवस्थेतील या क्षेत्राचे योगदान पाहता, केंद्र सरकारने आरबीआय (RBI) च्या मदतीने MSME उद्योजकांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत. यातील काही योजना खालील प्रमाणे आहेत.


या योजनांच्या साहाय्याने या क्षेत्रात तुम्ही ही तुमच्या व्यवसायाला गती देऊ शकता आणि भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी हातभार लावू शकता.