Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hybrid Fund Investment: हायब्रीड फंडातील गुंतवणुकीची बाराखडी; डेट, इक्विटीपेक्षा यात वेगळं काय? कसा वाढेल पैसा

hybrid mutual fund

Image Source : www.timesofindia.indiatimes.com

Hybrid Fund Investment: पारंपरिक डेट म्युच्युअल फंड योजनांमधून सुरक्षितता तर मिळते मात्र, दीर्घकाळ गुंंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाईला हरवू शकत नाही. तसेच इक्विटी योजनांमधील गुंतवणूक तुम्हाला जास्त परतावा मिळवून देऊ शकते. मात्र, त्यासोबत येणारी जोखीम तुमचं दिवाळं काढू शकते. वरील दोन्हीही पर्यायांकडे सरधोपटपणे न जाता काही मध्यममार्ग आहे का? तर नक्कीच आहे.

Hybrid Fund Investment: पारंपरिक डेट म्युच्युअल फंड योजनांमधून सुरक्षितता तर मिळते मात्र, दीर्घकाळ गुंंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाईला हरवू शकत नाही. महागाई वेगाने वाढत असल्याने मिळालेला परतावा कमी असण्याची शक्यता जास्त. अनेक वर्ष गुंतवणूक करूनही तुम्हाला संपत्ती निर्माण करता येणार नाही. तसेच इक्विटी योजनांमधील गुंतवणूक तुम्हाला जास्त परतावा मिळवून देऊ शकते. मात्र, त्यासोबत येणारी जोखीम तुमचं दिवाळंही काढू शकते.

गुंतवणुकीचा मध्यममार्ग  

वरील दोन्हीही पर्यायांकडे सरधोपटपणे न जाता काही मध्यममार्ग आहे का? तर नक्कीच आहे. हायब्रीड फंड योजनेतील गुंतवणूक दीर्घकाळात फायद्याची ठरू शकते. या योजनेद्वारे तुम्हाला एकापेक्षा जास्त अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक करता येईल. म्हणजेच डेट, इक्विटी, गोल्ड अशा ठिकाणी गुंतवणूक असेल. एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक असेल तर जोखीम वाढते. मात्र, इथे अनेक ठिकाणी गुंतवणूक विभागली गेल्याने जोखीम कमी होते.

हायब्रीड फंडात 5 लाख कोटी गुंतवणूक 

ज्यावेळी अर्थव्यवस्था, भांडवली बाजार डळमळीत झालेला असतो तेव्हा सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. मात्र अशी परिस्थिती कायमच राहत नाही. बाजारातील तेजी-मंदीचा खेळ कायम चालू असतो. त्यामुळे हायब्रीड फंड हा एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे. हायब्रीड फंडांद्वारे तुमची जोखीम कमी होते. भारतामध्ये सध्या हायब्रीड फंड्समध्ये 5 लाख कोटी गुंतवणूक आहे. तसेच मागील दशकात या फंडांनी वाढही नोंदवली आहे. 

हायब्रीड फंड योजनांचे 6 प्रकार? 

कन्झर्वेटीव्ह हायब्रीड (Conservative Hybrid) 

कन्झर्वेटीव्ह हायब्रीड फंड योजनांद्वारे डेट आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक केली जाते. यात तुलनेने कमी जोखीम असते. यामधील 75 ते 90 टक्के गुंतवणूक डेट मार्केटमध्ये केली जाते. तर 10 ते 25% गुंतवणूक इक्विटीमध्ये केली जाते. डेटमध्ये गुंतवणूक जास्त असल्याने जोखीम कमी होते. 

अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंड (Aggressive Hybrid Fund)

या फंडाद्वारे 65 ते 80 टक्के गुंतवणूक इक्विटी मार्केटमध्ये केली जाते. तर समतोल साधण्यासाठी 20 ते 35 टक्के गुंतवणूक डेट आणि मनी मार्केटमध्ये केली जाते.    

डायनामिक अॅसेट अॅलोकेशन फंड (Dynamic Asset Allocation Fund) 

डायनामिक अॅसेट अॅलोकेशन फंड सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाजारातील बदलत्या स्थिती नुसार जो योग्य पर्याय वाटेल त्यात गुंतवणूक करतात. इक्विटी, रोखे आणि डेरिव्हेटिव्हजमध्ये ही गुंतवणूक असू शकते. भांडवली बाजारातील स्थितीनुसार 100% इक्विटीमध्ये किंवा 100% डेट फंडातही गुंतवणूक फंड मॅनेजर करू शकतो. यात वेळोवेळी बदल केला जातो. 

मल्टी अॅसेट अॅलोकेशन फंड (Multi Asset Allocation Fund)

मल्टी अॅसेट फंड इक्विटी, डेट, गोल्ड, इटीएफ सह इतरही पर्यायांमध्ये पैसे गुंतवतात. मात्र, एका वेळी कोणत्याही तीन पर्यायांमध्ये कमीत कमी 10% गुंतवणूक ठेवावी लागते. बाजारातील परिस्थितीनुसार यात कमी जास्त करता येऊ शकते. 

आर्ब्रिट्राज फंड (Arbitrage Fund)  

आर्ब्रिट्राज फंड हा भांडवली बाजारातील व्यवहारातून पैसे कमावतो. मुख्यत: मनी मार्केट आणि फ्युचर्स मार्केटमधील रोख्यांची खरेदी-विक्री करून पैसे कमावले जातात. मनी मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी करून फ्युचर मार्केटमध्ये विक्री केले जातात. 65% व्यवहार इक्विटी मार्केटमध्ये केले जातात. तर उर्वरित व्यवहार डेट पर्यायांमध्ये केले जातात. 

इक्विटी सेव्हिंग फंड (Equity Savings Fund)

इक्विटी सेव्हिंग फंड योजनेद्वारे डेट, आर्बिट्राज आणि इक्विटी पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. 

नवख्या गुंतवणुकदारांसाठी ठरू शकतो योग्य पर्याय 

पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हायब्रीड फंड चांगले ठरू शकतात. बाजाराची सखोल माहिती नसल्याने कमी जोखीम घेतलेले कधीही चांगले. इक्विटी आणि डेटचा समतोल साधत दीर्घकाळात गुंतवणूकदाराला बाजाराचा अंदाज चांगल्या प्रकारे येईल.

हायब्रीड फंड योजनांना इक्विटी फंड योजनांसारखेच समजले जाते. गुंतवणूकदाराच्या जोखमीनुसार विविध पर्याय उपलब्ध असल्याने या योजनांमधील गुंतवणूक वाढत आहे. गुंतवणुकीतील विविधतेमुळे जोखीमही कमी होते. वैयक्तिक गुंतवणुकदाराची जोखीम क्षमता विचारात घेऊन विविध अॅसेट क्लासमध्ये गुंतवणूक केली जाते.