Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Banking म्हणजे काय? ही सेवा कोणाला मिळते?

Home Banking

Home banking ही सेवा ग्राहकांना आपल्या वैयक्तिक आर्थिक गोष्टी सोयीस्करपणे मॅनेज करण्याची सेवा देते. ही सेवा ग्राहकाला वेबपोर्टल, मोबाईल अॅप किंवा इतर पर्यायांद्वारे विविध आर्थिक transaction करण्याची अनुमती देते.

Home banking म्हणजे प्रत्यक्षात बॅंकेत न जाता घरूनच banking transaction किंवा बॅंकेशी संबंधित इतर सुविधांचा लाभ घेण्याची ही एक पद्धत आहे. Home banking म्हणजे सर्वसाधारणपणे Mobile Banking, Online Banking, Telephone Banking किंवा mail banking सारखाच एक प्रकार आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत बॅंकेचा प्रतिनिधी ग्राहकाच्या घरी येऊन त्याला संबंधित बॅंक सेवा देतो. यात प्रामुख्याने नवीन खाते उघडणे, कागदपत्रे जमा करणे, KYC प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी सेवांचा लाभ दिला जातो. होम बॅंकिंगची सेवा देताना बॅंक पैशांचे व्यवहार प्रामुख्याने टाळते. यासाठी ऑनलाईन सेवा वापरण्याचा सल्ला बॅंकेकडून दिला जातो. प्रत्येक बॅंकेच्या वेगवेगळ्या नियमानुसार Home Banking ची सेवा बॅकेद्वारे ग्राहकांना दिली जाते.

Home banking ही सेवा ग्राहकांना आपल्या वैयक्तिक आर्थिक गोष्टी सोयीस्करपणे मॅनेज करण्याची सेवा देते. ही सेवा ग्राहकाला वेबपोर्टल, मोबाईल अॅप किंवा इतर पर्यायांद्वारे विविध आर्थिक transaction करण्याची अनुमती देते. या प्रकारच्या on the go banking मुळे आपल्याला आपल्या घरातून, ऑफिसमधून किंवा आपल्याकडे सुरक्षित फोन किंवा इंटरनेट कनेक्शन असल्यास कोठूनही इंटरनेट बँकिंग करण्याची संधी मिळते. याव्यतिरिक्त, home banking द्वारे ग्राहकाला आपल्या सर्व bank account ची माहिती थेट मिळते. जेणेकरून ग्राहक आपल्या खात्याद्वारे प्राधान्याने व्यवहार करू शकतो. Home banking व्यवहारात सामान्यत: बॅंकेच्या वेळेचा प्रश्न येत नाही. कारण प्रत्यक्ष व्यवहार हे पूर्णपणे ऑनलाईन होत असल्यामुळे त्यात वेळेचा अडसर येत नाही. ऑनलाईन सेवा 24/7 वापरता येते.

Home banking चा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे Bank account असणे आवश्यक आहे. Home banking च्या "Anytime, Anyplace” स्वरूपामुळे, आपण आपल्या आर्थिक गरजा कधीही आणि कशाही पूर्ण करू शकतो. बहुतेक Home Banking सेवा online  किंवा banking mobile app द्वारे दिल्या जातात. यामध्ये खालील सेवांचा लाभ घेता येतो

  • बॅंक खात्यातील balance तपासणे.
  • आपल्या deposits आणि payments पाहणे.
  • खात्यातील balance एका certain level पेक्षा खाली असेल तर alerts set करणे.
  • खात्यांमध्ये पैसे transfer करणे.
  • ऑनलाइन किंवा मोबाइल अॅपद्वारे बिल भरणे.

होम बँकिंगचे प्रकार (Types of Home Banking)

ऑनलाईन बॅंकिंग (Online Banking)

Online Banking आपल्याला घराच्या आरामातून आपले bank account हाताळण्याची क्षमता देते. जोपर्यंत आपल्याकडे आपले bank account आहे आणि इंटरनेटचा वापर सुरक्षित आहे तोपर्यंत आपण कोणत्याही वेळी कोठेही दूरस्थपणे व्यवहार पूर्ण करू शकतो.

मोबाईल बॅंकिंग (Mobile Banking)

Mobile Banking मध्ये आपल्या Bank Account ची माहिती मिळविण्यासाठी आपला मोबाइल फोन वापरणे समाविष्ट आहे. आपण आपल्या बँकेचे web page, text messaging किंवा त्याचे app डाऊनलोड करून माहिती access करू शकता.

मेल बॅंकिंग (Mail Banking)

Mail banking ही एक सेवा आहे जी आपल्याला थेट आपल्या bank किंवा credit union ला deposits, payments आणि giving information प्रदान करते. आपल्या व्यवहाराची पावती मेलद्वारे प्राप्त करण्याचा पर्याय देखील आपल्याकडे आहे.

होम बँकिंगचे फायदे आणि तोटे (Advantages and Disadvantages of Home Banking)

फायदे

  • रियल टाइम मनी मैनेजमेंट 
  • विनामूल्य आणि जलद सेवा

तोटे

• इंटरनेट नसेल तर सेवा पूर्णत: ठप्प
• ऑनलाईन फसवणूक होण्याचा धोका