Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gift Vouchers: गिफ्ट वाउचर वापरा अन् करा ऑनलाइन शॉपिंग, Amazon-Flipkart असा करता येईल वापर

Gift Vouchers

Image Source : https://www.herzindagi.com/

सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ई-कॉमर्स गिफ्ट वाउचर देत असतात. तुमच्याकडे देखील गिफ्ट वाउचर असल्याच याचा वापर करून शॉपिंग करता येईल.

सध्या देशात सणासुदींना सुरूवात झाली आहे. गणपती, दसरा, दिवाळी असे अनेक महत्त्वाचे सण लागोपाठ येत आहेत. अनेकजण या काळात भरपूर शॉपिंग करतात. सध्या ऑनलाइन पद्धतीने कपडे, बूट, स्मार्टफोन्स सारख्या वस्तूंची खरेदी करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ऑनलाइन शॉपिंग करण्यामागचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे वस्तूंवर मिळणारी भरघोस सूट. यासोबतच तुमच्याकडे जर गिफ्ट वाउचर असल्यास तुम्ही वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता.

सणासुदीच्या काळात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ई-कॉमर्स गिफ्ट वाउचर देत असतात. या गिफ्ट वाउचरच्या मदतीने आपल्या आवडीच्या वस्तूंची शॉपिंग करणे सोपे जाते व वस्तू कमी किंमतीत मिळाल्याने फायदा देखील होतो. तुम्ही या गिफ्ट वाउचरच्या मदतीने ई-कॉमर्स वेबसाइट्स Flipkart, Amazon, Meesho, Myntra वरून शॉपिंग करू शकता. तुम्हाला देखील मित्र-मैत्रिणी अथवा कंपनीने गिफ्ट वाउचर दिले असल्यास याच्या मदतीने कशाप्रकारे शॉपिंग करू शकता, याविषयी जाणून घ्या.

गिफ्ट वाउचर नक्की काय असते?

वाढदिवस अथवा सणासुदीच्या निमित्ताने आपण मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना भेटवस्तू देत असतो. मात्र अनेकदा नक्की काय भेटवस्तू द्यावी हे आपल्याला समजत नाही. अशावेळी ई-कॉमर्स गिफ्ट वाउचर हा चांगला पर्याय ठरतो. गिफ्ट कार्ड अथवा वाउचरला तुम्ही एकप्रकारचे ऑनलाईन गिफ्ट म्हणू शकता. हे वाउचर ठराविक किंमतीचे असते व यावर एक विशिष्ट कोड असतो. या गिफ्ट वाउचरचा वापर करून तुम्ही ठराविक स्टोर किंवा ऑनलाइन वेबसाइटवरून त्या किंमतीची वस्तू खरेदी करू शकता.

समजा, तुम्हाला 5000 हजार रुपये किंमतीचे गिफ्ट वाउचर भेट म्हणून मिळाले आहे. तुम्ही या गिफ्ट वाउचरचा वापर करून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, मिंत्रा सारख्या वेबसाइटवरून शॉपिंग करू शकता. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात गिफ्ट वाउचर देत असतात.

गिफ्ट वाउचरचा वापर करताना या गोष्टी ठेवा लक्षात

एखादी विशिष्ट वस्तू भेट देण्याऐवजी तुम्ही इतरांना गिफ्ट वाउचर भेटवस्तू म्हणून देऊ शकता. गिफ्ट वाउचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचा वापर करून कोणतीही आवडीची वस्तू खरेदी करू शकता.

मात्र, गिफ्ट वाउचरचा वापर करण्याआधी त्यासंदर्भातील नियम व अटी, वापरण्याची मुदत, कोणत्या वेबसाइट/स्टोरसाठी उपलब्ध आहे, ते जाणून घ्या. तसेच, वाउचरला एकदा रिडीम केल्यास त्याचा पुन्हा वापर करता येत नाही.

गिफ्ट वाउचरचा कसा कराल वापर?

  • अनेक गिफ्ट वाउचरचा वापर ठराविक स्टोर अथवा वेबसाइटवरून शॉपिंग करतानाच करता येतो. इतर ठिकाणी हे गिफ्ट वाउचर उपयोगी येत नाहीत.
  • गिफ्ट वाउचरद्वारे खरेदी करण्यासाठी सर्वात प्रथम Amazon, Flipkart, Myntra, Paytm सारख्या वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर खरेदी करायची असलेल्या वस्तूचा कार्टमध्ये समावेश करा.
  • आता checkout या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, कॅश ऑन डिलिव्हरी, यूपीआय आणि गिफ्ट वाउचर सारखे पर्याय दिसतील.
  • आता गिफ्ट वाउचर/कार्ड पर्यायावर जाऊन तेथे वाउचरवरील यूनिक कोड टाका.
  •  त्यानंतर Apply किंवा Redeem असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  •  आता वस्तूंची किंमत कमी झालेली दिसेल. अशाप्रकारे तुम्ही गिफ्ट वाउचर वापरून वस्तू खरेदी करू शकता.