• 05 Jun, 2023 19:00

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Floating Rate म्हणजे काय? तो कॅल्क्युलेट कसा होतो, त्याचा फायदा काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती

What is Floating Interest Rate

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Floating Interest Rate हा घरासाठी कर्ज घेतल्यानंतर बँकेकडून कर्ज देताना आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचा प्रकार आहे. साधारणत: बँक होम लोन देताना Fixed आणि Floating Interest रेटने कर्ज उपलब्ध करून देते. त्यातील फ्लोटिंग इंटरेस्ट रेटबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

Floating Rate: सध्याची स्थिती पाहिली तर कोणलाही घर विकत घेण्यासाठी कर्ज काढावे लागते. एकदा का कर्ज काढले की, मग आपला संबंध कर्जाचा व्याजदार (Interest Rate) काय? कोणती बँक कमी इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज देते. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट चांगला की फिक्सड् इंटरेस्ट रेट, याबद्दल आपण माहिती घ्यायला सुरूवात करतो. पण अजूनही बऱ्याच जणांना याबद्दल माहिती नसते. तर आज आपण कर्जावर दिल्या जाणाऱ्या फिक्स आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट (स्थिर आणि बदलता व्याजदर) मधील फ्लोटिंग म्हणजेच बदलता व्याजदर म्हणजे काय? तो आकारला जातो आणि त्याचे काही फायदे-तोटे आहेत का? याबद्दल जाणून घेणार आहोत.

स्थिर व्याजदर (Floating Interest Rate) हा घरासाठी कर्ज घेतल्यानंतर बँकेकडून कर्ज देताना आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचा प्रकार आहे. साधारणत: बँक होम लोन देताना Fixed आणि Floating Interest रेटने कर्ज उपलब्ध करून देते.

Floating Rate म्हणजे काय?

फ्लोटिंग इंटरेस्ट रेट हा घरावरील कर्जासाठी आकारला जाणारा बँकेचा व्याज आकारण्याचा प्रकार आहे. फ्लोटिंग रेट हा मार्केटमधील परिस्थितीनुसार किंवा आरबीआयने रेपो रेटमध्ये केलेल्या बदलानुसार बदलत असतो. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ किंवा कपात केली की, कर्ज देणाऱ्या बँकासुद्धा फ्लोटिंग रेटमध्ये वाढ किंवा कपात करतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील मुख्य बँक असून ती बँकेशी संबंधित नियम ठरवत असते. त्यानुसार आरबीआयकडून कर्जासाठी किंवा मुदत ठेवी, आवर्ती ठेव योजना, बचत खात्यावरील व्याजदर यांचे एक बेसिक दर ठरवले जातात. हा दर किमान असतो. या दराच्या खाली जाऊन बँकाना  कोणतीही ऑफर ग्राहकांना देता येत नाही. त्याला बेंचमार्क म्हणतात.या बेंचमार्कच्या आधारावर प्रत्येक बँका आपले फिक्स आणि फ्लोटिंग रेटचे व्याज ठरवत असतात.

फ्लोटिंग रेट कसा ठरतो?

बँका फ्लोटिंग रेट ठरवताना काही निकष आणि नियमांचे पालन करून तो जाहीर करत असतात. यामध्ये कोणत्या घटकांना प्राधान्य दिले जाते ते आपण समजून घेणार आहोत.

  • रेपो दर (Repo Rate)
  • सरकारचे पतधोरण (Government's Monetary Policy)
  • महागाई दर (Inflation Rate)
  • वित्तीय तूट (Fiscal Deficit)

जागतिक आणि परदेशातील व्याजदर (Global and Foreign Interest)

या घटकांचा आढावा घेऊन आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी कमिटी (आरबीआय पतधोरण समिती) एक बेंचमार्क सेट करून व्याजदर जाहिर करत असते. त्या व्याजदरावर आधारित बँका आपले दर ग्राहकांसाठी जाहीर करतात.

फ्लोटिंग इंटरेस्ट रेटचे फायदे (Benefits of Floating Interest Rate)

स्थिर व्याजदरापेक्षा बदलत्या व्याजाचा दर हा कमी असतो. हप्त्याचे प्रमाण कमी असते. बदलत्या व्याजदरामुळे भविष्यात कमी EMI होऊ शकतो. काहीवेळेस 
स्थिर व्याजदरापेक्षा बदलत्या व्याजदराचा रेट जास्त असला तरी तो कायम राहणारा नसतो. तो रेपो रेटनुसार बदलत असतो. त्यामुळे भविष्यात याचा कर्जदाराला फायदा होऊ शकतो. होमलोन हे साधारणत: दीर्घकाळासाठी म्हणजे किमान 25 ते 30 वर्षांसाठी घेतले जाते. अशावेळी फ्लोटिंग इंटरेस्ट रेट घेतल्यास तुमच्या कर्जफेडीची मुदत आणि ईएमआयची रक्कम कमी होऊ शकते.

फ्लोटिंग इंटरेस्ट रेटचे तोटे (Disadvantage of Floating Interest Rate)

फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमुळे वाढत्या महागाईच्या काळात ईएमआयमध्ये सतत वाढ होण्याच्या शक्यता असते. यामुळे कर्जदाराला घराचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागते. Floating Interest Rate मुळे एकतर ईएमआयमध्ये बदल होतो किंवा कर्ज फेडण्याचा कालावधी वाढतो. यामध्ये कर्जदाराला ईएमआय वाढवण्याशिवाय किंवा कर्जाचा कालावधी वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

अशाप्रकारे फ्लोटिंग इंटरेस्ट रेटचे फायदे तोटे आहेत; तसेच फिक्स इंटरेस्ट रेटचे सुद्धा आहेत. त्यामुळे होमलोन घेताना Fixed की Floating Interest Rate यापैकी एकाची निवड करताना दोघांमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे.