MACT Compensation: अमरावती जिल्ह्यात राजुरा बाजारच्या रहिवाशी असलेल्या मंदाताईंच्या यजमानांचं 2008 मध्ये रस्ते अपघातात निधन झालं. तेव्हापासून वाहन चालकाविरोधात त्या कोर्टात खटला चालवत होत्या. हा खटलाच मूळात 11 वर्षं चालला. आणि निकाल 2019 मध्ये लागला.
रस्ते अपघाताचे खटले मोटार अॅक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्युनल अर्थात, MACT कडे चालवले जातात. मंदाताईंची दोन्ही मुलं तेव्हा लहान होती. तेव्हा MACT ने मंदाताईंच्या पतीच्या निधनासाठी वाहनचालकाला जबाबदार धरून त्याला 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. पण, ही रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी वापरायची असल्यामुळे मुलं जाणती होईपर्यंत ही रक्कम FD म्हणजे मुदतठेवीत गुंतवण्याचे निर्देशही MACT ने दिले.
अशा मुदत ठेवींना कोर्ट ऑर्डरने केलेली FD असंही म्हणतात. ही मुदतठेव MACT आपल्या अखत्यारीत दोषी व्यक्तीकडून करून घेते. आणि ठरावीक रक्कमेचा बाँडपेपर तेवढा मृत व्यक्तीच्या घरच्यांना दिला जातो. आणि ठरावीक कालावधीनंतर या बाँडवरून मुदतठेवीची रक्कम कुटुंबीयांना घेता येते.
पण, मंदाताईंना ही काहीच माहिती नव्हती. MACT ने करून दिलेला बाँडपेपरही त्यांनी घरी नेला नव्हता. पण, कोर्टाने FD केलेली होती.
MACT या नावाने FD करण्यात आली. तेव्हा बँकेची काम त्यांच्या घरात कोणालाच समजत नव्हती.
3 वर्षानंतर त्यांच्या मुलांनी चौकशी केली असता समजले की, ती FD कोर्टाच्या आदेशाने झालेली आहे त्यामुळे तुम्हाला त्यावर काहीही करता येणार नाही. जो पर्यंत कोर्टकडून आदेश येणार नाही. तो पर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल.
तेव्हा मंदा ताईंच्या कुटुंबीयांना माहित झाले की, कोर्ट ऑर्डर नुसार सुद्धा FD केली जाते. तर माहित करून घेऊया या FD चे नियम काय?
Table of contents [Show]
कोर्ट ऑर्डरने झालेली FD काय असते?
न्यायालयात केस चालवून मिळालेल्या रकमेची FD कोर्ट ऑर्डरने केली जाते. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी ती रक्कम दिली जाते. त्या कुटुंबात जर लहान मुले असतील तर त्यांचे अकाऊंट मायनरमध्ये काढून त्यात FD केली जाते. मुलांचे वय 18 होईपर्यंत त्या अकाऊंटचे हँडल नॉमिनीकडे दिल्या जाते. त्या अकाऊंटमधील 1 रुपया सुद्धा कोर्ट ऑर्डर शिवाय तुम्हाला काढता येत नाही.
कोर्ट ऑर्डरने झालेली FD चे नियम
जशी FD कोर्ट ऑर्डरने झाली तशीच ती पूर्ण झाल्यानंतर कोर्ट ऑर्डरनेच तोडावी लागते.
ती FD तुम्ही पूर्ण होण्याआधी तोडू शकत नाही.
त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्या वकिलाकडे जमा असते.
आपल्या नॉर्मल FD सारखी त्याची माहिती बँक सहज देत नाही.
त्याची संपूर्ण प्रोसेस ही कोर्टाच्या आदेशाने होत असते.
MACT काय आहे?
Motor Accident Claims Tribunal (MACT) ची स्थापना मोटार वाहन कायदा, 1988 द्वारे रस्ता अपघातग्रस्तांच्या सुरक्षेचे नियमन ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. राज्य सरकारने मोटार वाहन अपघातांच्या नुकसानभरपाईच्या दाव्यांचा निर्णय घेण्यासाठी दावा न्यायाधिकरण तयार केले आहे. मोटार वाहनांद्वारे अपघातग्रस्तांना विनाविलंब उपचार मिळणे हा त्याचा उद्देश आहे. MACT न्यायालये मोटार अपघातांमुळे उद्भवलेल्या जीवित/मालमत्ता किंवा दुखापतीच्या प्रकरणांशी संबंधित दाव्यांना सामोरे जातात.
कोर्ट FD पूर्ण झाल्यानंतरची प्रोसेस
समजा.. तुमची FD जर पाच वर्षासाठी असेल आणि ती मे महिन्यात पूर्ण होत असेल तर ते पूर्ण झाल्यानंतर तुमच्या वकिलाच्या हाताने त्याची प्रोसेस पूर्ण करून घ्यावी लागते. कोर्ट ऑर्डर लेटर घेऊन ते बँकमध्ये संबमिट करून या FD ची प्रोसेस पूर्ण केली जाते. कोर्ट ऑर्डरशिवाय तुम्ही ती FD तोडू शकत नाही.
एफडीच्या मॅच्युरिटीचे सध्याचे नियम
जर एखाद्या ग्राहकाने एफडीच्या मुदतीनंतर अकाऊंट मधील रक्कम जशीच्या तशी ठेवली तर अशा परिस्थितीत त्याला एफडीवर पूर्ण व्याज दिले जात नाही. हे व्याज बचत बँक खात्यात जमा केलेल्या व्याजाइतके असेल. त्यामुळे FD च्या मुदतीनंतर त्यावर लवकरात लवकर प्रोसेस करणे आवश्यक आहे.