Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MF Exit Load: म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरील एक्झिट लोड म्हणजे काय? पैसे काढून घेताना किती शुल्क लागू होते

mutual fund change

जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड योजनेतून कालावधी पूर्ण होण्याआधीच बाहेर पडता तेव्हा फंड हाऊस एक्झिट लोड शुल्क आकारते. योजना परिपक्व (मॅच्युरिटी) होण्याआधीच गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेऊ नयेत हा हेतू यामागे आहे. दरम्यान, सर्व म्युच्युअल फंड योजनांवर एक्झिट लोड आकारला जात नाही. हा एक्झिट लोड कसा आकारला जातो, ते उदाहरणासह पाहूया.

MF Exit Load: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाजारात अनेक योजना उपलब्ध आहेत. (How Mutual fund charge exit load) गुंतवणूक करताना तसेच पैसे योजनेतून काढून घेताना अॅसेट मॅनेजमेंट कंपनी विविध शुल्क आकारते. त्यानंतर राहिलेली रक्कम गुंतवणूकदाराला दिली जाते. तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून हे शुल्क कापून घेतले जाते.

एक्सपेन्स रेशो, एंट्री फी, एक्झिट लोड असे विविध शुल्क फंड हाऊस कापून घेतात. त्यातून फंड हाऊस व्यवस्थापन आणि इतर खर्च भागवते. (How MF calculate exit load) अपफ्रँट कमिशनही कट केले जाते. जर तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर किंवा फंड हाऊसच्या सल्लागाराकडून योजना खरेदी केली असेल तर हे कमिशन अपफ्रँट कमिशन म्हणून घेतले जाते. सेबीने अपफ्रँट कमिशन बाबतचे नियम बदलले असून फंड कंपन्या हे शुल्क आता घेऊ शकत नाहीत. मात्र, इतर अनेक प्रकारचे शुल्क आहेत. 

एक्झिट लोड म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड योजनेतून कालावधी पूर्ण होण्याआधीच बाहेर पडता तेव्हा फंड हाऊस एक्झिट लोड शुल्क आकारते. कालवधी पूर्ण होण्याआधी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेऊ नयेत हा हेतू यामागे आहे. दरम्यान, सर्व म्युच्युअल फंड योजनांवर एक्झिट लोड आकारला जात नाही. ओपन एंडेड योजनांमधील गुंतवणूक काढून घेताना सहसा एक्झिट लोड शुल्क आकारले जाते.

जेव्हा तुम्ही म्युच्युअलफंड खरेदी करता तेव्हा त्यात विविध शुल्क आणि त्याची टक्केवारी दिलेली असते. त्यामुळे एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याआधी हे ऑफर डॉक्युमेंट बारकाईने वाचायला हवे. 

एक्झिट लोड कसा कॅलक्युलेट केला जातो?

एसआयपीद्वारे गुंतवणूकदार एक ठराविक रक्कम योजनेत गुंतवत असतो. (How MF calculate exit load) त्याचे युनिट्स गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा होत असतात.

उदाहरणार्थ: समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये 50 हजार रुपये गुंतवणूक केली आहे. यावर एक्झिट लोड 1% आणि नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) 100 रुपये आहे, असे समजू. या 50 हजार रुपयांचे तुम्हाला 500 युनिट्स मिळतील. मात्र, जेव्हा म्युच्युअल फंडाची NAV 110 रुपये झाल्यानंतर तुम्ही गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतला तर खालील प्रकारे शुल्क कपात केली जाईल.

110x500= तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य योजनेतून बाहेर पडताना 55000 रुपये असेल. त्यामुळे 110 NAV वर 1% शुल्क कापून घेतले जाईल.

(110 रुपयांवर 1%)x 500 युनिट्स = 550 रुपये. 

त्यामुळे जर तुम्ही कालावधी पूर्ण होण्याच्या आधी गुंतवणूक काढून घेत असाल तर 550 रुपये फंड हाऊस कापून घेईल. आणि तुमच्या खात्यात फक्त 54,450 रुपये येतील. इतर शुल्क असतील तर ते कट करून उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात येईल. 

एक्झिट लोड कोणत्या योजनांवर सर्वाधिक?

प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेनुसार एक्झिट लोड बदलू शकतो. (How Mutual fund charge exit load) इक्विटी संबंधीत म्युच्युअल फंड योजनांवर सर्वात कमी एक्झिट लोड शुल्क आकारले जाते. 0% ते 1% पर्यंत शुल्क आकारले जाते. तर निश्चित परतावा देणाऱ्या डेट फंड योजनांवर 0.5 ते 2% पर्यंत शुल्क कपात होते. हायब्रीड फंडमध्ये इक्विटी आणि डेट अशा दोन्ही प्रकारची गुंतवणूक असते. त्यामुळे गुंतवणुकीनुसार एक्झिट लोडमध्ये बदल होतो.