तुमच्यापैकी अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतच असतील. खिशात पैसे नसले तरीही आपण शॉपिंग करु शकतो आणि नंतर इएमआयने किंवा ठराविक काळानंतर क्रेडिट कार्डचे पैसे पुन्हा भरतो. अल्प कालावधीसाठी आर्थिक गरज भागवण्यासाठी 'Buy Now, Pay Later' हा पर्यायही तुमच्याकडे उपलब्ध आहे. या सुविधेद्वारे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर बील हप्त्याने भरू शकता. मात्र, ही सुविधा सगळीकडेच उपलब्ध नाही. काही ठराविक शॉपिंग दुकाने, ऑनलाइन मर्चंट आणि फिनटेक कंपन्यांही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. क्रेटिड कार्डला हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.
BNPL पेमेंट कसे काम करते?
BNPL सुविधेद्वारे तुम्ही शॉपिंग करत असाल तर तुम्हाला शिखातून पैसे द्यायची गरज नाही. तुमच्या वतीने जी कंपनी तुम्हाला BNPL सुविधा उपलब्ध करुन देत आहेत, ते तुमचे बील भरतील. कदाचित तुम्हाला एकून रमकेच्या थोडी रक्कम शॉपिंग करतेवेळी भरावी लागू शकते. त्यानंतर ठराविक काळानंतर तुम्ही सर्व रक्कम एकदाच किंवा हप्त्याने सुविधा देणाऱ्या कंपनीला देऊ शकता. जर तुम्ही वेळेत पैसे माघारी दिले नाही तर तुम्हाला अतिरिक्त व्याज किंवा दंडही भरावा लागू शकतो. तुमच्या क्रेडिट स्कोरवरही याचा परिणाम होऊ शकतो.
BNPL सुविधेचे फायदे काय?
तत्काळ पैशाची उपलब्धता परवडणाऱ्या दरात. सुरक्षित आर्थिक व्यवहार. परतफेड कालावधी निवडू शकता. नो कॉस्ट इएमआय. सोपी आणि पारदर्शी प्रक्रिया. Eligibility criteria for Buy
BNPL सुविधेसाठी पात्रता काय?
भारताचा नागरिक असावा. टायर १ किंवा टायर २ शहरात राहणारा असावा. कमीतकमी १८ ते जास्तीत जास्त ५५ वर्षापर्यंत वय. ग्राहक नोकरदार असावा. बँक खाते असावे तसेच केवायसीसाठीची आवश्यक कागदपत्रे असावीत. पे लेटर सुविधा पुरवणाऱ्या कंपनीनुसार पात्रतेत बदल होऊ शकतात.
क्रेडिट कार्ड आणि बाय नाऊ पे लेटर सुविधेत फरक काय ?
क्रेडिट कार्ड | बाय नाऊ पे लेटर |
हिडन( गुप्त ) चार्ज असू शकतात | पारदर्शक, लो कॉस्ट प्राइसिंग मॉडेल |
भूतकाळातील आर्थिक व्यवहारांची माहिती आवश्यक | क्रेडिट हिस्ट्रीची गरज नाही |
व्याजरहित काळ ठराविक मर्यादेत असतो. | व्याजरहित काळ ४८ महिन्यांपर्यंत असू शकतो. |
किमान रक्कम(मिनिमम ड्यू ) भरण्याची सुविधा | ठराविक तारखेला EMI भरावा लागतो. |
कॅशबॅक, रिवॉर्ड्स पॉइंट मिळू शकतात. | यामध्ये इतर फायदे मिळत नाहीत. |