Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Types of Bonds: बॉण्ड्स म्हणजे काय? बॉण्ड्सचे किती प्रकार असतात?

Types of Bond

Image Source : www.romania-insider.com

Types of Bonds: बॉण्ड या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ सांगायाचा झाला तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील कराराला बॉण्ड म्हणतात. या बॉण्डच्या बदल्यात कंपन्या गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याजदर आणि गुंतवणुकीची सुरक्षितता देतात.

बॉण्ड या शब्दाचा सोप्या भाषेत अर्थ सांगायाचा झाला तर गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील कराराला बॉण्ड म्हणतात. अनेकवेळा सरकारी आणि खाजगी कंपन्यांना निधीची गरज पडते. त्यावेळी या कंपन्या बॉण्ड वितरित करून गुंतवणूकदारांच्या माध्यामातून निधी गोळा करतात. या बॉण्डच्या बदल्यात कंपन्या गुंतवणूकदाराला त्या बदल्यात ठराविक कालावधीसाठी आकर्षक व्याज आणि गुंतवणुकीची सुरक्षितता देतात. त्यामुळे बॉण्ड ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

बॉण्ड्सचे वेगवेगळे प्रकार

कंपन्यांकडून इश्यू केल्या जाणाऱ्या बॉण्डचा एक ठराविक कालावधी असतो. ही मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदाराला व्याजासह रक्कम परत केली जाते. ही प्रक्रिया प्रत्यक्ष कंपन्या स्वत: पार पाडत नाही. यासाठी काही एजंट्स काम करतात. ते कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम पाहतात. बॉण्ड्समधील गुंतवणूक फिक्सड् गुंतवणूक मानली जाते. ज्याप्रमाणे मुदत ठेवींमध्ये एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. अगदी त्यानुसार बॉण्ड्समध्ये गुंतवणूक केली जाते. बॉण्ड्सचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील काही निवडक बॉण्ड्सची आपण माहिती घेणार आहोत.

बॉण्ड्स कोण वितरित करतं?

जे बॉण्ड्स सरकार स्वत: वेगवेगळ्या माध्यमातून वितरित करतं, त्याला सरकारी बॉण्ड्स (Governent Bonds) म्हणतात. त्याच पद्धतीने काही कॉर्पोरेट कंपन्यासुद्धा बॉण्ड्स वितरित करतात, त्याला कॉर्पोरेट बॉण्ड म्हटले जाते. सरकारी बॉण्ड हे सरकारच्या माध्यमातून फिक्सड् इंटरेस्ट रेटने वितरित केले जातात. सरकारी बॉण्ड्समध्ये ट्रेसरी बिल्स, म्युनिसिपल बॉण्ड्स, झिरो कूपन बॉण्ड्स आदींचा समावेश होतो. सरकारप्रमाणेच खाजगी कंपन्यादेखील पैसे उभारण्यासाठी बॉण्ड इश्यू करतात.

शेअर्स आणि बॉण्ड्समध्ये काय फरक (Difference between Shares & Bonds)

शेअर मार्केटच्या माध्यमातून जे गुंतवणूकदार इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. त्यांना शेअर्सच्या माध्यमातून कंपनीमध्ये हिस्सा मिळतो. ते एकप्रकारे कंपनीचे मालक असतात. पण बॉण्ड्समध्ये तशी सुविधा नसते. बॉण्डद्वारे गुंतवणूकदार फक्त गुंतवणूक करतात. जसे की, कंपनीला निधीची गरज असल्याने कंपनी गुंतवणूकदारांकडून कर्जस्वरुपात पैसे गोळा करते आणि त्याबदल्यात गुंतवणूकदाराला व्याज देते. हे व्याज करारामध्ये ठरल्यानुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असू शकते. बॉण्डचा कालावधी संपला की, कंपनी आणि गुंतवणूकदार यांच्यातील व्यवहार संपतो.  

बॉण्डसचे विविध प्रकार (Types of Bond)

ट्रेडिशनल बॉण्ड (Traditional Bond)

अशाप्रकारच्या बॉण्ड्समध्ये गुंतवणूक केलेली संपूर्ण रक्कम मुदत संपल्यानंतर एकाचवेळी काढता येते, त्याला ट्रेडिशनल बॉण्ड म्हटले जाते.

कॅलेबल बॉण्ड (Callable Bond)

बॉण्ड इश्यू करणारी कंपनी बॉण्डच्या मुदतीचा कालावधी जवळ आला तरी, आपल्या अधिकार वापरून त्यातून बाहेर पडण्याची सूचना करू शकते. त्याला कॅलेबल बॉण्ड म्हणतात. अशाप्रकारच्या बॉण्डमध्ये हाय डेब्ट बॉण्डचे लो डेब्ट बॉण्डमध्ये रुपांतर होऊ शकते.

फिक्स रेट बॉण्ड (Fixed Rate Bond)

ज्या बॉण्ड्समध्ये गुंतवणुकीवरील व्याजदर स्थिर असतो, त्याला फिक्स रेट बॉण्ड म्हटले जाते.

फ्लोटिंग रेट बॉण्ड (Floating Rate Bond)

फिक्स रेट प्रमाणेच ज्या बॉण्ड्समध्ये व्याजदर फ्लोटिंग असतो. त्याला फ्लोटिंग रेट बॉण्ड म्हटले जाते.

पुटेबल बॉण्ड (Puttable Bond)

पुटेबल बॉण्डमध्ये गुंतवणूकदार जेव्हा त्याला पैशांची गरज असते. तेव्हा मुदतीपूर्वी बॉण्ड विकून पैसे मिळवतो, त्याला पुटेबल बॉण्ड म्हणतात.

मॉर्गेज बॉण्ड (Mortgage Bond)

जे बॉण्ड्सला रिअल इस्टेटमधील कंपन्यांचा सपोर्ट असतो किंवा अशाप्रकारच्या कंपन्यांकडून जे बॉण्ड वितरित केले जातात. त्यांना मॉर्गेज बॉण्ड म्हणतात.

झिरो कूपन बॉण्ड  (Zero Coupon Bond)

झिरो कूपन बॉण्ड्सवर कोणताही परतावा मिळत नाही. पण हे बॉण्ड डिस्काउंटमध्ये खरेदी करता येतात. त्याचा कालावधी पूर्ण झाला की, कंपनी मूळ किमतीनुसार पैसे देते.

क्लायमेट बॉण्ड (Climate Bond)

क्लायमेट बॉण्ड हे सरकारद्वारे वितरित केले जातात. या बॉण्डच्या मागे निधी उभा करणे या उद्देशाबरोबरच हवामानाशी संबंधित बदलांचा सामना करण्यासाठी सरकार प्राधान्य देते.