Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची Best Strategy काय? कोणत्या वयात करावी गुंतवणुकीला सुरुवात? जाणून घ्या

mutual fund investment strategy

Image Source : https://unsplash.com/

अनेकजण आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. कमी वयात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरू केल्यास भविष्यात याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

Table of contents [Show]

माझे वय 24 वर्ष आहे. एम.ए. झाले असून, गेली ३ वर्ष नोकरी करत आहे. मी माझी बचत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा विचार करतोय. माझ्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये Investment करण्याची बेस्ट स्ट्रॅटेजी काय असावी? या वयात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल का?

महामनीचे उत्तर

तुम्ही खूप कमी वयामध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला हे नक्कीच कौतुकास्पद आहे. गेल्याकाही वर्षात बाजारातील मंदी, करोना व्हायरस महामारी, महागाई-बेरोजगारी यामुळे अनेकांना आर्थिक गुंतवणुकीचे महत्त्व पटू लागले आहे. भविष्यातील योजनांसाठी, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी, आर्थिक स्थैर्य, उत्पन्नाचा आणखी एक अतिरिक्त स्त्रोत म्हणून... अशा विविध कारणांसाठी अनेकजण आर्थिक गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.            

काही वर्षांपुर्वी केवळ जमीन, सोने-चांदी आणि बँक-पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्येच गुंतवणूक केली जात असे. मात्र, वेळेप्रमाणे आता गुंतवणूक करताना त्यात देखील विविध पाहायला मिळते. विशेष म्हणजे, जोखीम कमी व परतावा जास्त अशा गुंतवणुकीच्या मार्गाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. अशावेळी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय समोर येतो.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे हजारो-लाखो रुपये असण्याची देखील गरज नाही. तुम्ही अवघ्या 500-1000 रुपये दरमहिना भरून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.           

तुम्ही गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहात व तुमच्या पगारातून शिल्लक राहणारी बचत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्याचा विचार करताय. त्यामुळे सर्वात प्रथम म्युच्युअल फंडबाबत सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून, तुमच्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची स्ट्रेटजी नक्की काय असू शकते व याचा कसा फायदा होईल? हे समजून घेण्यास मदत होईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.            

म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय?            

म्युच्युअल फंडमध्ये असंख्य गुंतवणुकदारांकडून स्टॉक, सरकारी बाँड्स व इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे गोळा केले जातात. विशेष म्हणजे तुम्ही दिलेल्या पैशांच्या गुंतवणुकीचे नियोजन हे तज्ञांद्वारे केले जाते.      

जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता त्यावेळी एकप्रकारे फंडचे शेअर्स खरेदी करत असता.           

थोडक्यात, समजा तुम्ही दरमहिना 5000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहात. तुमच्याप्रमाणेच, इतरही लोकं त्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात. या सर्व लोकांच्या गुंतवणुकीची हाताळणी ही एएमसीद्वारे (अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी) केली जाते. एएमसी तुमची ही रक्कम स्टॉक, बाँड्स व इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवते. तुमची रक्कम ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवलेली असल्याने नुकसान होण्याचा धोका देखील कमी असतो. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवलेल्या रक्कमेवर भांडवली वाढ होण्यासोबतच लाभांश व व्याज अशा दोन्ही स्वरुपात परतावा मिळतो.

तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणुकीचा निर्णय घेतला असल्याने म्युच्युअल फंड हा एक नक्कीच चांगला मार्ग आहे.           

कोणतीही व्यक्ती नुकसान न होता जास्तीत जास्त परतावा मिळावा या दृष्टीने गुंतवणूक करत असते व म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही हे साध्य करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही दरमहिना फक्त 500 रुपये एसआयपी भरून ही गुंतवणूक सुरू करू शकता.              

म्युच्युअल फंड कसे काम करते?

brainstorming-techniques-17.png

एएमसी (Asset Management Company)  काय आहे?            

तुमच्या लक्षात आले असेल की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेल्या रक्कमेचे योग्य व्यवस्थापन करण्याचे काम हे एएमसीद्वारे केले जाते. एखादी व्यक्ती जर तुमची गुंतवणूक हाताळत असेल तर त्याविषयी सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे.              

एएमएसी हे एकप्रकारे म्युच्युअल फंडचे गुंतवणूक मॅनेजर असते. याची नेमणूक ही सेबीच्या परवानगीनेच केली जाते. असेट मॅनेजमेंट कंपनी स्टॉक्स, बाँड्स, रिअल इस्टेट अशा विविध गोष्टीत गुंतवणूक करते.              

समजा, तुम्ही एखाद्या कंपनीचे 10 हजार रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. काही दिवसानंतर त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत अचानक कमी झाली. अशावेळी तुम्हाला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे म्युच्युअल फंडमध्ये एएमसीद्वारे सविस्तर अभ्यास करून हीच रक्कम विविध गोष्टींमध्ये गुंतवली जाते. यापैकी एकाही गुंतवणुकीमध्ये नुकसान झाले तरीही इतर गुंतवणुकीतून हे नुकसान भरून येण्यास मदत होते. अशाप्रकारे म्युच्युअल फंडमधील नुकसानीचा धोका हा काही प्रमाणात कमी होतो.

गुंतवणूक करण्यासाठीचे कोणतेही ‘योग्य’ असे वय नसते.             

कमी वयात गुंतवणूक करणे नक्कीच चांगली स्ट्रेटजी              

तुम्ही कमी वयात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. वयाच्या विशीत गुंतवणूक करणाऱ्यांकडे भविष्यात अधिक चांगल्या संधी असतात असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 20 ते 30 वय असताना गुंतवणूक करणे नक्कीच फायद्याचे आहे.              

समजा, तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी दरमहिना 10 हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. दरवर्षी सरासरी 10 टक्के परतावा मिळाल्यास वयाच्या 55व्या वर्षी ही रक्कम 2,27,93,253 रुपये होते. मात्र, याच रक्कमेसह तुम्ही वयाच्या 35व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास वयाच्या 55व्या वर्षी तुम्हाला फक्त 76,56,969 रुपये मिळतील. त्यामुळे कमी वयात गुंतवणूक सुरु करणे हे कधीही चांगले.            

गुंतवणुकीला सुरुवात केली ते वय           

दरमहिना गुंतवणूक (Rs.)           

गुंतवणुकीचा कालावधी (Years)           

सरासरी वार्षिक परतावा (%)           

मुदतीनंतर मिळणारी रक्कम (Rs.)             

25                         

10,000                         

30                         

10%                         

2,27,93,253                         

30                         

10,000                         

25                         

10%                         

1,33,78,903                         

35                         

10,000                         

20                         

10%                         

76,56,969                         

योग्य म्युच्युअल फंडची कशी कराल निवड?

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सर्वात पहिला प्रश्न समोर येतो तो म्हणजे  नक्की रक्कम कशात गुंतवावी ? जवळपास 1 हजार फंड्स आणि योजना, 50 एएमसी असताना योग्य निवड करणे अवघड ठरते.

मात्र, योग्य म्युच्युअल फंडची निवड करताना तुमचे  गोल्स, जोखीम स्विकारण्याची क्षमता, गुंतवणुकीची क्षमता अशा विविध गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.          

गुंतवणुकीचा उद्देश

गुंतवणूक करताना तुमचा त्यामागे नक्की उद्देश काय आहे? हे माहित असणे गरजेचे आहे. तुम्ही निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी, शिक्षणासाठी की इतर कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करत आहात, ते आधी ठरवा.

जोखीम

तुम्ही जोखीम किती स्विकारू शकता यावर देखील कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची ते ठरते. समजा, एका फंडमधून 10 टक्के परतावा मिळत आहे व त्याची व्होलिटिलिटी 25 टक्के आहे. तर दुसरीकडे एका फंडमधून 15 टक्के परतावा मिळत आहे. मात्र, व्होलिटिलिटी 40 टक्के आहे. अशावेळी तुम्ही 10 टक्के परतावा देणाऱ्या फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. कारण, त्या फंडमध्ये काही प्रमाणात कमी परतावा मिळत असला तरीही नुकसान होण्याची शक्यता देखील कमी असते.

म्युच्युअल फंडचे प्रकार आणि पार्श्वभूमी पाहा – म्युच्युअल फंड्स हे असंख्य आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.  इक्विटी फंड्स, डेब्ट फंड्स, मनी मार्केट फंड्स, इनकम फंड्स, टॅक्स-सेव्हिंग फंड्स असे विविध म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. तसेच, तुम्ही लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप फंड्समध्ये गुंतवणूक करत असाल तर अशा फंड्सद्वारे गुंतवणुकदारांना गेली 1 ते 3 वर्षात किती परतावा मिळाला आहे, हे देखील पाहा.     

योग्य म्युच्युअल फंडची करा निवड

मुदत        

अल्प मुदत (3 वर्षापर्यंत)           

मध्यम मुदत (3 ते 5 वर्ष)         

दीर्घ मुदत (5 वर्षांपेक्षा जास्त)         

कमी जोखीम         

ओव्हरनाईट फंड्स, लिक्विड फंड्स    

शॉर्ट ड्यूरेशन फंड्स, गिल्ट फंड्स    

लार्ज कॅप फंड्स    

मध्यम जोखीम         

कमी कालावधीचे फंड्स, अल्ट्रा-शॉर्ट ड्यूरेशन फंड्स    

बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंड्स      

मल्टी-कॅप फंड्स    

जास्त जोखीम         

क्रेडिट रिस्क फंड्स, हायब्रिड फंड्स    

मल्टी कॅप फंड्स    

मिड-कॅप फंड्स, स्मॉल कॅप फंड्स    

सोर्स - groww.in    

Large Cap vs Mid Cap vs Small Cap – गुंतवणुकीची योग्य स्ट्रेटजी कोणती?

योग्य म्युच्युअल फंड पोर्टफोलियो तयार करणे अनेकदा अडचणीचे ठरते. जोखीम कमी व अधिक परतावा मिळेल, याचा विचार करून म्युच्युअल फंड पोर्टफोलियो डिझाइन करायला हवा. लार्ज कॅप फंड्समधील गुंतवणूक ही कमी जोखमीची मानली जाते. त्या तुलनेत स्मॉल कॅप फंड्समधील गुंतवणूक जोखमीची असते. तर मिड-कॅपमधील गुंतवणूक तुमच्या पोर्टफोलियोला संतुलन देते.                

तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलियोमध्ये संतुलन साधण्यासाठी तुम्ही एकूण रक्कमेच्या  70 टक्के लार्ज कॅप, 15 टक्के मिड कॅप्स आणि 15 टक्के स्मॉल कॅपमध्ये  गुंतवणूक करू शकता. मात्र, तुम्ही सोयीनुार यात बदल करू शकता व लार्ज कॅपमधील गुंतवणूक कमी करून इतर फंड्समध्ये गुंतवणूक करणे देखील फायद्याचे ठरेल. सर्व फंड्समध्ये समान गुंतवणूक करणे देखील अनेकदा धोकादायक ठरू शकते.                

लार्ज कॅप फंड्स

स्टॉक मार्केटमधील प्रमुख 100 कंपन्या या लार्ज कॅपमध्ये येतात. यांच्या फंड्समधून परतावा हा चांगला असतो व यातील जोखीम देखील कमी मानली जाते. या फंड्समध्ये त्वरित होणारे चढ-उतार हे खूप कमी पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोमधील मोठी गुंतवणूक लार्ज कॅप फंड्समध्ये करणे कधीही फायद्याचे ठरते. तुम्ही पोर्टफोलियोतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक यात करणे योग्य ठरेल.

मागील वर्षभरात सर्वोत्तम परतावा देणारे लार्ज कॅप फंड्स

लार्ज कॅप फंड         

रेग्यूलर प्लॅन         

डायरेक्ट प्लॅन         

HDFC Top 100 Fund         

16.79%   17.27%   

Nippon India Large Cap Fund         

21.77%   22.45%   

Edelweiss Large Cap Fund         

15.14%   16.36%   

ICICI Prudential Bluechip Fund         

14.03%   14.48%   

JM Large Cap Fund         

15.32%   15.90%   

सोर्स- मनीकंट्रोल         

मिड कॅप फंड्स  

शेअर मार्केटमधील सर्वोत्तम मोठ्या 101 ते 250 मधील कंपन्या मिड कॅप म्हटले जाते. अशा कंपन्यांच्या फंड्समधील गुंतवणूक फायद्याची ठरते. कारण, भविष्यात यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असते व  यातील गुंतवणूक स्थिर समजली जाते. तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोमधील जवळपास 20 ते 30 टक्के गुंतवणूक यात करू शकता.    

मागील वर्षभरात सर्वोत्तम परतावा देणारे मिड कॅप फंड्स

मिड कॅप फंड    

रेग्यूलर प्लॅन    

डायरेक्ट प्लॅन    

HDFC Mid-Cap Opportunities Fund    

30.94%  31.57%  

Motilal Oswal Midcap Fund    

28.99%  29.99%  

Taurus Discovery (Midcap) Fund    

30.43%  30.74%  

Kotak Emerging Equity Fund    

22.85%  23.86%  

Mahindra Manulife Mid Cap Fund    

33.01%  34.48%  

सोर्स- मनीकंट्रोल

स्मॉल कॅप फंड्स     

शेअर मार्केटमधील 251 क्रमांकाच्या पुढील सर्व मोठ्या कंपन्यांना स्मॉल कॅप म्हटले जाते. या कंपन्यांच्या फंड्समध्ये गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. यातील परतावा जास्त असला तरीही, जोखीम देखील जास्त असते. तुम्ही तुमच्या पोर्टफोलियोमधील 15 ते 20 टक्के रक्कम यामध्ये गुंतवू शकता.   

मागील वर्षभरात सर्वोत्तम परतावा देणारे स्मॉल कॅप फंड्स

स्मॉल कॅप फंड   

रेग्यूलर प्लॅन   

डायरेक्ट प्लॅन   

Nippon India Small Cap Fund36.04% 36.84% 
Quant Small Cap Fund30.21% 31.31% 
Franklin India Smaller Companies Fund35.32% 36.17% 
ICICI Prudential Smallcap Fund28.99% 29.99% 
HDFC Small Cap Fund28.99% 34.56% 

सोर्स - मनीकंट्रोल

बाय अँड होल्ड स्ट्रेटजी

बाय अँड होल्ड ही गुंतवणुकीतील सर्वात लोकप्रिय स्ट्रेटजी आहे. म्युच्युअल फंड पोर्टफोलियोसाठी देखील ही स्ट्रेटजी खूपच कामी येते. या स्ट्रेटजीमध्ये तुम्हाला एकदा केलेली गुंतवणूक बाजारात  तेजी असो अथवा मंदी, तशीच राखून ठेवावी लागते. दीर्घकाळ गुंतवणूक तशीच ठेवल्याने कालांतराने तुम्हाला फायदाच होतो. खासकरून, कर्मचारी वर्गासाठी ही स्ट्रेटजी फायद्याची ठरते.

या स्ट्रेटजीमध्ये तुम्हाला दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. तसेच, वारंवार म्युच्युअल फंड यूनिट्सची खरेदी अथवा त्यात बदल करण्याचीही गरज नाही. तुम्ही या स्ट्रेटजीद्वारे तुमच्या पोर्टफोलियोमध्ये विविधता आणू शकता.

एकरकमी गुंतवणूक vs एसआयपी – कोणती स्ट्रेटजी बेस्ट?                    

एकरकमी गुंतवणूक

तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवू शकता. तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त रक्कम उपलब्ध असेल व भविष्यात बाजारात तेजी येणार असल्याचा अंदाज असल्यास हा चांगला मार्ग आहे.अनेकजण बाजारातील तेजीचा फायदा घेऊन मोठी रक्कम गुंतवून, कमी कालावधीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याचवेळी बाजारात मंदी असल्यास नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे तुम्ही एकरकमी गुंतवणुकीला नंतर एसआयपीमध्ये देखील बदलू शकता.

एसआयपी

तुम्ही एसआयपीच्या (Systematic Investment Plan) माध्यमातून  दरमहिना ठराविक रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. ही रक्कम 500 रुपयांपासून पुढे कितीही असू शकता. तुमची एकदम जास्त रक्कम भरण्याची क्षमता नसल्यास गुंतवणुकीचा हा चांगला मार्ग ठरतो व जोखीम देखील कमी असते.

समजा, तुम्ही 5 वर्षांसाठी एकाचवेळी 6 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवले. तर 5 वर्षांनी तुम्हाला 12 टक्के सरासरी व्याजदाराने 10,57,405 रुपये मिळतील. मात्र, तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून दरमहिना 10 हजार रुपये भरल्यास 6 लाख रुपये जमा होण्यास 5 वर्षांचा कालावधी लागतो. अशाप्रकारे, 12 टक्के सरासरी व्याजदाराने तुम्हाला 5 वर्षाने 8,24,864 रुपये मिळतील. याचाच अर्थ एकरकमी गुंतवणुकीद्वारे मिळणारा परतावा हा खूपच जास्त आहे. मात्र, यासोबतच तुमची गुंतवणूक व जोखीम स्विकारण्याची क्षमता देखील लक्षात घेणे गरजेचे आहे.   

गुंतवणुकीची पद्धत      

सुरुवातीची रक्कम (Rs.)      

मासिक गुंतवणूक (Rs.)      

गुंतवणुकीचा कालावधी (Years)      

सरासरी वार्षिक (%)      

एकूण गुंतवणूक (Rs.)      

मुदतीनंतर मिळणारी रक्कम (Rs.)      

SIP      

-      

10,000      

5      

12%      

6,00,000      

8,24,864      

Lump Sum      

6,00,000      

-      

5      

12%      

6,00,000      

10,57,405      

भविष्यातील आर्थिक उद्देशांसाठी एसआयपीची रक्कम कशी ठरवाल?      

म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून दरमहिना किती रक्कम गुंतवावी हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही कोणत्या उद्देशाने व किती कालावधीपर्यंत गुंतवणूक करत आहात व त्यातून किती परतावा अपेक्षित आहे, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.                  

तुमचे सध्याचे उत्पन्न

एसआयपीची रक्कम किती असायला हवी हे तुमच्या उत्पन्नावर देखील अवलंबून आहे. तुम्हाला दरमहिन्याला पगारातून मिळणारे उत्पन्न हे 25 हजार रुपये आहे. यातून इतर गोष्टींसाठी खर्च होणारी रक्कम ही 20 हजार रुपये आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही दरमहिना 1 हजार ते 2 हजार रुपये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवू शकता. समजा, तुम्ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी दरमहिना 1 हजार रुपये गुंतवल्यास एकूण रक्कम 60 हजार रुपये होते. तर 5 वर्षांनी  सरासरी 12 टक्के व्याज दराने या रक्कमेवर तुम्हाला 22,486 रुपये परतावा मिळेल. हीच रक्कम दरमहिना 2 हजार रुपये केल्यास 5 वर्षांनी तुम्हाला दुप्पट परतावा मिळेल.        

कालावधी व उद्देश

तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात, यावर देखील एसआयपीची रक्कम ठरते.      

तसेच, तुमचा गुंतवणुकीचा उद्देश काय आहे? यावरून रक्कम ठरवू शकता. समजा, तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी दरमहिना 5 हजार रुपये गुंतवणूक करत आहात व यावर दरवर्षी सरासरी 12 टक्के परतावा मिळतोय. यानुसार, पुढील 30 वर्षात तुम्ही 18 लाख रुपये गुंतवणूक केलेली असेल व यातून मिळणारा परतावा हा तब्बल 1,58,49,569 रुपये असेल. अशाप्रकारे, तुमच्याकडे निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी वयाच्या 55व्या वर्षी 1,76,49,569 रुपये असतील.                  

तुम्ही जर शिक्षणासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल तर 5 वर्षांचा कालावधी योग्य ठरतो. समजा, तुम्ही 5 वर्षांसाठी दरमहिना 5000 हजार रुपये एसआयपी भरल्यास मुदतीनंतर 12 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 4,12,432 रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चानुसार कमी-जास्त वाढ करू शकता. थोडक्यात, एसआयपीची रक्कम ही तुमच्या भविष्यातील योजनांनुसार ठरत असते.