Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

Ecofriendly cryptocurrency

मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करणाऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीना पर्याय म्हणून इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीकडे (Eco Friendly Cryptocurrency) पहिले जात आहे. इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीमुळे निसर्गावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

बिटकॉईन (Bitcoin), इथेरियम (Ethereum),डॉजकॉइन (Dogecoin)यासारख्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीज् तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर केला जातो. यामुळे पर्यावरणावर ताण निर्माण होत आहे. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले एक आभासी चलन आहे. या चलनाचे भौतिक रूप नाही. पण,आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरता येऊ शकते. क्रिप्टोकरन्सींचा व्यवहार करण्यासाठी उच्च-शक्तीच्या (High Power) संगणकाची आणि पॉवर (इलेक्ट्रीसीटी) अल्गोरिदमसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते. 

बिटकॉईनच्या (BTC) उत्पादनातून एका वर्षात अंदाजे 22 ते 23 दशलक्ष मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. केंब्रिज बिटकॉइन इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इंडेक्सनुसार (Cambridge Bitcoin Electricity Consumption Index - CBECI) असे दिसून आले आहे की, बिटकॉईन (BTC) एका वर्षाला सुमारे 131.5 टेरावॉट-तास (TWh) वीज वापरते. हा आकडा नॉर्वे देश एका वर्षासाठी जेवढी वीज (124.3 TWh) वापरतो, त्यापेक्षा ही अधिक आहे. यामुळे पर्यावरणावर ताण येत आहे.

इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सी (Eco Friendly Cryptocurrency)

मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करणाऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीना पर्याय म्हणून इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीकडे पहिले जात आहे. इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीमुळे निसर्गावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. इक्रोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सी म्हणजे सध्याच्या क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत कमीतकमी वीज आणि ऊर्जेचा वापर करणाऱ्या क्रिप्टो चलनाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या क्रिप्टोकरन्सीमुळे पर्यावरणावरील ताण कमी होत असल्याने त्यांना इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सी म्हटले जाते.

इक्रोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीसाठी पुढाकार म्हणजे, क्रिप्टोकरन्सीची निर्मित करताना विजेची बचत आणि कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे अपेक्षित आहे. पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या ह्या 6 क्रिप्टोकरन्सीबद्दल तुम्हाला माहित आहेत का?

1. चिआ (Chia) 

चिआ ही क्रिप्टोकरन्सी ऊर्जेच्या कमी वापरात तयार केली गेली आहे. चिआ क्रिप्टोकरन्सी तयार करण्याची पद्धत ही बिटकॉईनपेक्षा वेगळी आहे. त्याला फार्मिंग प्रोसेस (Farming Process)म्हणतात. 

2. आयोटा (IOTA)

आयोटा क्रिप्टोकरन्सी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाला टॅंगल (Tangle)म्हटले जाते. आयोटासाठी लागणारी साधने कमी ऊर्जेचा वापर करतात. 

3. कार्डोना (Cardona) 

कार्डोना क्रिप्टोकरन्सी प्रूफ-ऑफ-स्टेक (Proof-of-Stake)पद्धतीचा वापर करते. यामध्ये वापरकर्त्यांना कॉईन विकत घेण्यासाठी टोकन्स खरेदी करावे लागतात. ज्यामुळे ऊर्जेची बचत मोठ्या प्रमाणात होते. कार्डोना क्रिप्टोकरन्सी चार्ल्स हॉस्किनसन्ब (Charles Hoskinsonb)यांनी तयार केली. चार्ल्स हे इथेरियमचे (Etherium)सहसंस्थापक आहेत.

4. नॅनो (Nano)

अनेक क्रिप्टोकरन्सी प्रूफ-ऑफ-वर्क (Proof-of-Work) पध्दतीचा वापर करतात, परंतु नॅनो क्रिप्टोकरन्सीमध्ये ओपन रेप्रेसेंटेटिव्ह वोटिंग प्रोटोकॉलचा (Open Representative Voting Protocol)वापर करतात. यामुळे ऊर्जेचा वापर कमी होतो.

5. सोलारकॉईन (Solarcoin)

सोलारकॉईन क्रिप्टोकरन्सी सौर-ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सौर-ऊर्जेद्वारे तयार केलेल्या प्रत्येक 1 मेगावॉट ऊर्जेच्या बदल्यात सोलारकॉईन हे बक्षीस म्हणून दिले जाते.

6. बिट्ग्रीन (Bitgreen)

बीटग्रीन क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनला पर्याय म्हणून तयार करण्यात आली आहे.

Image source - https://bit.ly/3xNBoRc