Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? What is Reverse Repo Rate?

rbi repo rate   reverse repo rate

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करत असते. त्या साधनांमध्ये रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर (Repo Rate & Reverse Repo Rate) यांचा समावेश होतो.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das, RBI Governor) यांनी देशाच्या आर्थिक विकास धोरणा संदर्भात आणि वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी मांडलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्याने बोलताना रेपो दर (Repo Rate), रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) यासारख्या शब्दांचा वापर केलेला तुम्ही ऐकला असेल. पण बऱ्याचवेळा अशा शब्दांचे अर्थ सर्वसामान्यांना कळत. तर आज आपण रिव्हर्स रेपो दर म्हणजे नेमकं काय (What is Reverse Repo Rate?) हे समजून घेणार आहोत.

वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेपो दरात वाढ (Increased Repo Rate) केली. हे आपण बातम्यांमधून ऐकलं आहे; आणि यामुळे बॅंकेची सर्व प्रकारची कर्ज (Loan) महाग झाली. हा यातील साधासोपा अर्थ होता. पण मग आरबीआयने रेपो दरात वाढ केली म्हणजे नेमकं काय केले? किंवा रिव्हर्स रेपो दरात वाढ झाली म्हणजे काय होतं? हे आपण तपशीलाने पाहणार आहोत.

अगदी सोप्या शब्दांत रेपो दर म्हणजे काय? (What is Repo Rate?) हे सांगायचं झालं तर, ज्या व्याजदराने रिझर्व्ह बॅंक देशातील इतर बॅंकांना अल्पमुदतीसाठी ज्या व्याजदराने कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर असे म्हणतात. आरबीआयने रेपो दरात वाढ केली की, देशातील सर्व बॅंकांचे कर्जावरील व्याजदर वाढते. रेपो दराप्रमाणेच आरबीआय रिव्हर्स रेपो दर ही जाहीर करते. त्याचाही अर्थ आपण जाणून घेणार आहोत.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय? What is Reverse Repo Rate?

रिव्हर्स रेपो दर हा रेपो दराच्या अगदी विरूद्ध आहे. ज्या पद्धतीने बॅंका अल्प मुदतीने आरबीआयकडून कर्ज घेतात. तसेच बॅंका आरबीआयकडे अल्प मुदतीसाठी ठेवी ठेवतात. त्या ठेवींवर रिझर्व्ह बँक ज्या दराने व्याज देते; त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) म्हणतात. रिव्हर्स रेपो दराचा वापर बाजारातील रोख रकमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. बाजारात जेव्हा भरपूर चलन येते, तेव्हा RBI रिव्हर्स रेपो दर वाढवते. रिव्हर्स रेपो दर वाढवल्याने बँका जास्त व्याज मिळवण्याच्या उद्देशाने अधिकाधिक रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करतील, अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा असते.

महागाई आणि रेपो दर यांचा संबंध काय?

वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ झाली की, त्याला महागाई म्हणतात. महागाई वाढली की जास्त पैसा खर्च करूनही कमी वस्तू आणि सेवा मिळतात. तर महागाई कमी झाली की, वस्तू आणि सेवांसाठी कमी पैसे खर्च करावे लागतात. लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाला की वस्तू आणि सेवांची मागणी वाढते. परिणामी बाजारात अधिकचा पैसा येऊ लागल्याने महागाई वाढण्यास मदत होते. ही वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय विविध धोरणांपैकी रेपो दर या साधानाचा उपयोग करते. आरबीआयने रेपो दरात वाढ केली की, देशातील बॅंका त्यांच्या कर्जावरील व्याजदर वाढवतात. त्यामुळे कर्ज महाग होतात आणि बाजारातील चलन कमी होऊन महागाई आटोक्यात येण्यास मदत होते.

Image Source - https://bit.ly/3bB8vA5