Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing : झिरो रिटर्न फाईल करण्याचे हे आहेत 5 फायदे

ITR Filing : झिरो रिटर्न फाईल करण्याचे हे आहेत 5 फायदे

Image Source : www.economictimes.indiatimes.com

जर तुमचे वार्षिक आर्थिक उत्पन्न नवीन कर प्रणाली नुसार 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ITR दाखल करणे अनिवार्य आहे. मात्र, जर तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागू होत नाही. म्हणजे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न हे झिरो रिटर्न (NIL Return) समजले जाते. अशावेळी तुम्ही NIL Return फाईल करू शकता. NIL ITR का फाईल करायचे फायदे काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊयात

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. मोजकेच दिवस शिल्लक राहिलेत. मात्र, अशा परिस्थितीत कर सवलतींच्या मर्यादेबाबत अनेकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. जर तुमचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 3 पेक्षा जास्त (नवीन कर प्रणाली नुसार) असल्यास तुम्हाला ITR दाखल करणे अनिवार्य आहे. मात्र, जर तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागू होत नाही. म्हणजे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न हे झिरो रिटर्न (NIL Return) समजले जाते. अशावेळी तुम्ही NIL Return फाईल करू शकता. NIL ITR का फाईल करायचे, त्याचे फायदे काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊयात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा व्यवसायाला कोणतेही करपात्र उत्पन्न नसते किंवा त्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेच्या खाली येते तेव्हा एनआयएल आयकर रिटर्न( NIL ITR) भरण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ येतो. कोणतेही कर दायित्व नसले तरीही NIL ITR दाखल केल्याने कर नियमांचे पालन सुनिश्चित होते. यामुळे तुम्हाला याचे पुढील लाभ मिळतात.

1)नुकसानीची तूट समायोजित करणे

काही प्रकरणांमध्ये, व्यक्ती किंवा व्यवसायांना एखाद्या आर्थिक वर्षात नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्ही NIL ITR दाखल करून हा तोटा भविष्यात पुढे नेऊ शकता. हे नुकसान भविष्यातील करपात्र उत्पन्नामध्ये समायोजित केले जाऊ शकते, ज्यामुळे पुढील वर्षांमध्ये उत्पन्न निर्माण झाल्यावर तुमची कर दायित्व कमी होते.

2) कर परताव्यासाठी दावा

जर तुम्ही आर्थिक वर्षात कोणताही कर किंवा वजावट भरली असेल. परंतु तुमचे एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही NIL ITR दाखल करून, तुम्ही भरलेल्या करांच्या परताव्याची मागणी करू शकता. NIL ITR दाखल केल्याने तुम्हाला योग्य परतावा रक्कम मिळेल आणि कोणतेही अनावश्यक आर्थिक नुकसान टाळले जाईल.

3) कर्ज प्राप्तीसाठी उत्पन्नाचा पुरावा

आयकर परतावा भारत सरकारकडून मिळकतीच्या पुराव्याचा एक प्रमाणीकृत दस्तऐवज म्हणून काम करतो. याव्यतिरिक्त, कर्ज देणाऱ्या बँका आणि संस्थांना ITR सबमिट केल्याने कर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकते. जेव्हा कोणी कर्जासाठी अर्ज करते तेव्हा कर्ज देणारी संस्था अर्जदाराची पत तपासते आणि त्यानंतर त्या आधारे कर्जाची रक्कम मंजूर करते. तुमच्याकडे आयटीआर सारखे कायदेशीर उत्पन्नाचा पुरावा दस्तऐवज असल्यास, तुमच्या कर्जाच्या प्रकरणासठी उपयोगी ठरते.

4)व्हिसा मिळवण्यासाठी  

परदेशात प्रवास करण्यासाठी, व्हिसा अधिकाऱ्यांना साधारणपणे गेल्या काही वर्षांपासून ITR आवश्यक आहे. याचे कारण असे की, एखाद्याला  परदेशात  प्रवास करायचा आहे, त्याने व्हिसा देण्यापूर्वी त्याच्या उत्पन्नाची मर्यादा तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे, व्हिसा अर्जाच्या वेळी बँक स्टेटमेंटसह ITR आणि इतर आर्थिक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

5)आर्थिक विश्वासर्हता प्रस्थापित करणे

तुमचे कोणतेही करपात्र उत्पन्न नसले तरीही, उत्पन्नातील पारदर्शकता दाखवण्यासाठी आणि कर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी रिटर्न भरण्याचे तुमचे दायित्व पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. NIL ITR दाखल केल्याने तुमची आर्थिक विश्वासर्हता प्रस्थापित होण्यास मदत होते. तुम्ही NIL आयटीआर फाईल केल्याने हे स्पष्ट होते की तुम्ही अचूक आर्थिक नोंदी ठेवल्या आहेत.