Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Options: Multi Asset Allocation Fund म्हणजे काय? यात गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?

Mutual Fund

Image Source : https://www.freepik.com/

Multi Asset Allocation Fund मध्ये गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदा मिळू शकता. यातील गुंतवणूक ही कमी जोखमीचे असते व परतावा देखील जास्त मिळतो.

तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असणे कधीही चांगले असते. समजा, तुम्ही एकाच मालमत्तेत अथवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली व त्यात तोटा झाला तर? त्यामुळेच आर्थिक नुकसान टाळायचे असल्यास गुंतवणुकीमध्ये विविधता असणे कधीही चांगले. 

सध्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचे ट्रेंड वाढला आहे. मात्र, अनेकजण अपुऱ्या माहितीमुळे  ठराविक म्युच्युअल फंडमध्येच गुंतवणूक करतात. तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना नुकसान टाळायचे असल्यास Multi Asset Allocation Fund चा विचार करू शकता. मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड म्हणजे काय व यामुळे गुंतवणुकीतील जोखीम कशाप्रकारे कमी होऊ शकते, ते समजून घेऊयात.

Multi Asset Allocation Fund म्हणजे काय?

मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड हा हायब्रिड म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे. या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून स्टॉक्स, बाँड्स, रिअल इस्टेट, कमोडिटिजसह प्रायव्हेट इक्विटी आणि हेज फंड सारख्या विविधत अ‍ॅसेट्समध्ये गुंतवणूक केली जाते.

थोडक्यात, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लावलेला पैसा हा फंड मॅनेजरद्वारे विविधत मालमत्तेमध्ये गुंतवला जातो. या फंडमध्ये सर्वसाधारपणने एकूण गुंतवणुकीच्या प्रत्येकी 10 टक्के रक्कम ही तीन वेगवेगळ्या अ‍ॅसेट्समध्ये गुंतवली जाते. म्हणजेच, पोर्टफोलियोमध्ये विविधता आणण्याचे काम या फंडद्वारे केले जाते. फंड मॅनेजर हा बाजारातील चढ-उतारानुसार गुंतवणुकीत बदल केला जातो. ज्यामुळे नुकसान होण्याचा धोका कमी होतो. 

Multi Asset Allocation Fund मध्ये गुंतवणुकीचे फायदे

विविधताMulti Asset Allocation Fund मधील गुंतवणुकीचे वेगवेगळ्या मालत्तेत वर्गीकरण केले जाते. यामुळे एका मालमत्तेतील गुंतवणुकीत नुकसान झाले तरीही इतर गुंतवणुकीवर याचा फारसा मोठा परिणाम होत नाही. 
जोखीम कमीया फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा  मुख्य उद्देशच जोखीम कमी करणे हा असतो. बाजारातील चढ-उतार व उद्दिष्टानुसार यातील गुंतवणूक केली जाते. गुंतवणुकीत विविधता असल्याने नुकसान होण्याची देखील शक्यता कमी असते. बाजारातील स्थितीनुसार गुंतवुकीत बदल देखील करता येतो.
रिटर्न्सMulti Asset Allocation Fund मध्ये इतर गुंतवणुकीच्या तुलनेत कमी जोखीम असते, मात्र परतावा जास्त मिळतो. जे दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक करत आहेत, त्यांच्यासाठी हा म्युच्युअल फंड नक्कीच चांगला पर्याय आहे. यातून दरवर्षी 8 ते 12 टक्के परतावा मिळू शकतो. 5 वर्षांसाठीच्या दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केल्यास नक्कीच फायदा होईल.

थोडक्यात, तुम्हाला जर गुंतवणुकीत विविधता आणायची असेल व जोखीम कमी करायची असल्यास Multi Asset Allocation Fund चा नक्कीच विचार करू शकता.