Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Scheme: सरकारी/शासकीय योजना म्हणजे काय? सरकारी योजना का गरजेच्या आहेत?

Government Scheme: सरकारी/शासकीय योजना म्हणजे काय? सरकारी योजना का गरजेच्या आहेत?

Image Source : www.thecivilindia.com

Government Scheme: समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, तसेच प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावा यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते.

Government Scheme: सरकारी / शासकीय योजना या देशातील प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणासाठी सरकारद्वारे राबविल्या जातात. समाजाला भेडसावणाऱ्या अनेक सामाजिक-आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यात या योजना महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे केंद्र सरकार / राज्य सरकार वेळेवेळी वेळोवेळी समाजातील विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना जाहीर करत असते. या योजना ढोबळमनाने दोन प्रकारांमध्ये विभागल्या जातात. जसे की, केंद्र सरकार पुरस्कृत आणि राज्य सरकार पृरस्कृत योजना. याशिवाय स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका वेगवेगळ्या योजना राबवत असतात.

सरकारच्या या योजना, पात्र लाभार्थी, लाभांचे प्रकार, योजनेचे तपशील आणि विविध पैलू लक्षात घेऊन नागरिकांकरीता राबवल्या जातात. त्यानुसार लाभार्थी सरकारच्या योजनांचा लाभ घेतात. काही योजना हा केंद्र सरकारद्वारे भारतभर राबविल्या जातात. या योजनांसाठी लागणारा फंड हा पूर्णपणे केंद्र सरकारतर्फे पुरवला जातो. तर काही केंद्राच्या योजनांमध्ये राज्य सरकारला आर्थिक वाटा उचलावा लागतो.

सरकारी योजनांचे उद्दिष्ट काय आहे? | Objective of Government Schemes?

सरकारी योजनांचे प्रमुख उद्दिष्ट हे सर्वसामान्य लोकांना मुख्य प्रवाहात आणणे हाच आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळायला पाहिजे. तसेच समाजातील जो घटक आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास आहे अशा घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारी योजनांची मदत होते. सरकारच्या विविध खात्यांतर्गत वेगवेगळी विभाग येतात. या विभागांना अनुसरून सरकार योजना राबवत असते. 

सरकारी योजना | Government Scheme

  • निवृत्तीवेतन, विमा, मातृत्व लाभ, गृहनिर्माण इत्यादी सामाजिक सुरक्षेचे उपाय पुरविणे 
  • नागरिकांची जीवनशैली उंचावण्यासाठी मदत करणे
  • ग्रामीण व मागास भागाचा विकास करणे
  • समाजातील विविध घटकांमधील आर्थिक विषमता कमी करणे
  • रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
  • समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण व प्रशिक्षण देणे
  • समाजातील असुरक्षित घटकांना आर्थिक सुरक्षा देणे
  • महिला आणि समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत देणे

अशाप्रकारे, स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास घडवून आणण्यासाठी सरकारद्वारे पुरवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे.