Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment Missed : SIP चा हप्ता चुकल्यास, चार्ज द्यावा लागतो का? काय आहे नियम वाचा सविस्तर

SIP Investment Missed

Image Source : www.kotakmf.com

पैसे एकठोक जमा होणे थोडे मुश्कीलच असते. त्यामुळे मग ते कुठे डिपाॅझिट करायचा प्रश्नच राहत नाही. मात्र, SIP मुळे आपल्याला सोयीनुसार गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. कारण, आपल्याला आपल्या बजेटनुसार महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवण्याची मुभा असते. पण, एखाद्यावेळेस हप्ता चुकला तर काय होते? तसेच, ते टाळण्यासाठी काय करता येईल? हे आपण जाणून घेणार आहोत.

SIP Investment Missed : म्युच्युअल फंडाद्वारे SIP मध्ये गुंतवणूक करण सहज झाले असले तरी बऱ्याच जणांना मासिक हप्ता चुकल्यास काय हा प्रश्न पडतो. तसेच, वेळेवर हप्ता भरण्यासाठी कोणता सोपा पर्याय आहे. याविषयी देखील कल्पना नसते. मात्र, तुम्ही ज्या अ‍ॅपद्वारे  म्युच्युअल फंडात SIP मध्ये गुंतवणूक करता. त्यावरुनच तुम्ही हप्ता ही सेट करु शकता. त्यामुळे एकदा तुम्ही सेट केल्यावर पैसे आपोआप तुमच्या खात्यातून कट होतात. त्यामुळे SIP वेळेत भरल्या जाते.

SIP मुळे नियमित हप्ते भरायची सवय लागत असली तरी एखाद्यावेळी काही कारणांमुळे SIP चुकू शकते. त्यामुळे सामान्यत: हप्ता चुकल्यास चार्ज आकारला जाण्याची शक्यता असते. मात्र, बहुतांश म्युच्युअल फंड SIP च्या बाबतीत तसे होत नाही. म्हणजेच तुमच्याकडून SIP चा हप्ता चुकल्यास, तुमच्याकडून कोणताही चार्ज आकारल्या जात नाही.

SIP वेळेत भरली नाही?

बऱ्याचदा हप्ता चुकतो, त्यामुळे गुंतवणुकदारांना प्रश्न पडतो की त्यावर दंड भरावा लागतो की नाही. मात्र, यावर अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) कोणताही दंड आकारत नाही. पण, तुम्ही जर तुमचे खाते बॅंकेला सेटअप केले असल्यास AMC बॅंकेला पेमेंट करण्यासाठी सूचित करते. 

जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास बॅंक खात्यात रक्कम न ठेवल्यामुळे दंड आकारू शकते. त्याचबरोबर, जर गुंतवणुकदार हप्ते नियमित भरत नसल्यास आणि सलग तीन हप्ते चुकवल्यास योजना आपोआप रद्द केल्या जाते.

SIP रद्द होऊ नये म्हणून 'हे' करा

तुम्हाला काही कारणांमुळे SIP भरणे जमत नसल्यास तुम्ही एका विशिष्ट अवधीसाठी ते भरणे थांबवू शकता. त्यांनतर जेव्हा तुमच्याजवळ पैसे येईल आणि तुम्ही SIP भरण्याच्या योग्य असाल, तेव्हा पुन्हा तुम्ही SIP भरणे सुरू करु शकता. 

तसेच, चुकलेल्या SIP तुम्ही सुधारणा सुविधेचा (Modification Facility) वापर करुन रक्कम रिव्हाईज (Revise) करु शकता. तसेच, बॅंकेशी कनेक्ट असल्यास, खात्यात बॅलन्स आहे की नाही. हेही चेक करु शकता. याशिवाय, खात्यात SIP च्या रकमेपेक्षा अधिक रक्कम ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.