ATM Card Indicate: तुम्ही खरेदीला जाता किंवा हॉटेलमध्ये जेवण करायला जाता, तेव्हा तुम्ही एटीएम कार्ड स्वाइप करुन बिल भरता. एटीएम कार्डमुळे तुम्हाला सदैव तुमच्या जवळ कॅश बाळगण्याचे टेन्शन राहात नाही. अनेकवेळा एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्याने कॅशची समस्या तुमच्यापुढे उभी राहाते. तेव्हा तुम्ही एटीएम कार्डचा वापर करता. त्यावर 16 अंकी क्रमांक छापलेला असतो. तुम्ही क्रमांक अनेक वेळा ऑनलाईन पेमेंटसाठी किंवा UPI साठी वापरता. या क्रमांकामध्ये अशी काय माहिती असते. जी खूप खास असते. चला जाणून घेऊया या क्रमांकाचा अर्थ काय?
Table of contents [Show]
16 अंकांचा अर्थ काय?
तुम्ही नेहमीच डेबिट कार्डचा वापर करत असाल, त्यावर 16 अंकी क्रमांक लिहिलेला असतो. एवढेच नव्हे तर व्यवहार करतांना अनेक वेळा तो 16 अंकी क्रमांक तुम्ही भरला देखील असेल, परंतु हा 16 अंकी नंबरच कार्डवर का लिहिला जातो? याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
प्रथम सहा क्रमांक काय सांगतात
हा क्रमांक थेट तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे. तुमच्या कार्डची पडताळणी, सुरक्षितता आणि ओळख यासाठी हा क्रमांक आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करता, तेव्हा या कार्डवरील पहील्या 6 क्रमांकामार्फत पेमेंट सिस्टमला कळते की हे कार्ड कोणत्या कंपनीने जारी केले आहे. याला 'इश्युअर आयडेंटिफिकेशन नंबर' असे म्हणतात.
7 ते 15 नंबरचे क्रमांक
7 ते 15 पर्यंतचे उर्वरित अंक तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आहेत. हा क्रमांक तुमचा बँक खाते क्रमांक नाही. हा नंबर फक्त तुमच्या खात्याशी जोडलेला (लिंक) असतो.
16 व्या नंबरचा क्रमांक
कार्डवरील 16 व्या क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्या कार्डची वैधता दर्शवतो. त्या नंबरद्वारे तुमचे कार्ड कोणत्या वर्षापर्यंत वैध आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता. या क्रमांकाला 'चेकसम अंक' देखील म्हणतात.
तसेच ऑनलाइन पेमेंट करतांना तुमचा CVV क्रमांक देखील विचारला जातो. परंतु, हा नंबर कधीही कुठल्याही पेमेंट सिस्टममध्ये सेव्ह केला जात नाही.