Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wi-Fi डेबिट व क्रेडिट कार्ड म्हणजे काय? या कार्डचे फायदे व खबरदारी कशी घ्यायची हे जाणून घ्या

Wi Fi Debit and Credit Cards

Image Source : http://www.indiatvnews.com/

सध्या Wi-Fi डेबिट व क्रेडिट कार्डची क्रेझ निघाली आहे. ग्राहक शक्यतो हे कार्ड वापरताना दिसत आहे. हे कार्ड वापरण्यास जितके सोईस्कर आहे, तितकेच धोकादायक आहे. त्यामुळे हे Wi-Fi डेबिट व क्रेडिट कार्ड वापरताना नक्की काय खबरदारी घ्यायची आहे? हे जाणून घेवुयात.

Wi-Fi Debit Card and Credit Card: Wi Fi डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डला ‘कॉन्टॅक्टलेस कार्ड’ (Contactless card)असेदेखील म्हणतात. हे कार्ड वापरणे अधिक सोपे व सोईस्कर असल्यामुळे ग्राहक हया कार्डला अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.पण हे Wi-Fi डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड म्हणजे काय? हे कार्ड वापरताना काय खबरदारी घेतली पाहिजे? या सर्व गोष्टी पाहूयात.  

Wi Fi डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

 Wi Fi डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डला कॉन्टॅक्टलेस कार्ड म्हणूनदेखील ओळखले जाते. या कार्डने पैशांचा व्यवहार करणे अधिक सोपे जाते. जसे की, मशीनमध्ये कार्ड स्वॅप करावे लागत नाही म्हणजेच पिन नंबर न टाकता ही पेमेंटची प्रोसेस पूर्ण करता येते. या प्रोसेसाठी अत्यंत कमी वेळ लागतो. तसेच पिन नंबर बरोबर टाकला की चूक ही समस्यादेखील समोर येत नाही. 

 हे कार्ड कसे ओळखायचे?

तुमच्याजवळ असलेले डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड हातात घ्या. त्या कार्डवर Wi-Fi सारखे चिन्ह आहे का, हे तपासून घ्या. जर तुमच्या कार्डवर हे चिन्ह असेल तर समजा तुमचे डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड हे वाय-फाय इनेबल्ड कार्ड नावाचे आहे. म्हणजेच तुमच्याकडे कॉन्टॅक्टलेस कार्ड आहे. 

 हे कार्ड कसे काम करते? 

 या कार्डच्या नावात Wi-Fi असल्याने, हे डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड वाय-फायच्या साहाय्याने काम करते, असे बिलकूल नाही. हे कार्ड एनएफसी अर्थात नियर फील्ड कम्यूनिकेश व आरएफआयडी या तंत्रज्ञानावर काम करतात. या कार्डने विना पिनशिवाय मशीनव्दारे 5000 रूपयांपर्यंतचा आर्थिक व्यवहार करू शकता. 

या कार्डचे फायदे

  • पेमेंट करण्यास बिलकूल वेळ लागत नाही.
  •  कार्ड स्वाइप न करता पेमेंट करणे सोपे जाते.
  •  हे कार्ड कोणाच्याही हातात देण्याची आवश्यकता नाही. 
  • छोटया-छोटया व्यवहारांसाठी सातत्याने पंच-इन करावे लागणार नाही.

 खबरदारी घेणे महत्वाचे 

  • अर्ज करताना कोणत्या कार्डची मागणी करत आहोत, हे पाहणे
  •  खरेदी केली, तर बिल घेण्यास विसरू नका. 
  • कॅशियरने पेमेंट रक्कम भरली का, ते चेक करा
  • अधिक कार्ड असेल, तर कोणते कार्ड वापरायचे ते ठरवा
  •  हाॅटेल व दुकानात पेमेंट करताना, हे कार्ड त्यांच्या हातात देऊ नका
  • तुमच्यासमोरच कार्डचा वापर करा व व्यवहारानंतर आलेला मॅसेज चेक करा.