Tax Saving Ideas: 2022-23 आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरदार असाल आणि अजून तुम्ही टॅक्स सेव्हिंगचा विचार केला नाही. तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नावर टॅक्स लागत असेल आणि तुम्हाला तो अधिकृतरीत्या बचत करायचा असेल, तर तुम्ही जो टॅक्स स्लॅब निवडणार आहात. त्यावर बरेच काही अवलंबून आहे.
तुम्ही जर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जुनी कर प्रणाली (Old Tax Regime) निवडली तर तुमचा टॅक्स सेव्हिंगचा पर्याय ओपन असणार आहे. जुन्या कर प्रणालीनुसार पगारदार व्यक्तीला 80C, 80D, 80CCD, 80TTA आणि HRA, LTA द्वारे टॅक्स बचत करता येऊ शकतो. पण तु्म्ही जर नवीन कर प्रणाली (New Tax Regime) निवडली असेल तर तुम्हाला वर नमूद केलेल्या कलमांचा आधार घेऊन टॅक्स बचतीचा दावा करता येणार नाही.
Table of contents [Show]
जुन्या कर प्रणालीनुसार उपलब्ध असलेले टॅक्स सेव्हिंगचे पर्याय
किमान वजावट
नोकरी करणाऱ्या आणि पगारदार व्यक्तीला त्याच्या उत्पन्नातून 50 हजार रुपयांची कर वजावट मिळते. यासाठी त्याला कोणत्याही कागदी पुराव्यांची गरज लागत नाही. त्याच्या पगाराच्या उत्पन्नातून त्याला ही थेट वजावट मिळते.
कलम 80 C
कोणतीही व्यक्ती गुंतवणूक किंवा खर्च करून जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत टॅक्स सेव्हिंग करू शकते. कलम 80C अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PPF), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवी, ईएलएसएस (ELSS) यामध्ये गुंतवणूक करून एकूण 46,800 रुपयांची कर बचत करता येते. या व्यतिरिक्त मुलांची शिक्षणाची फी, विमा पॉलिसीचा प्रीमिअम, होमलोनवरील व्याज आदी खर्च दाखवून कर सवलतीचा दावा करता येतो.
कलम 80CCD
नॅशनल पेन्शन सिस्टिम (National Pension System-NPS) स्कीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही थेट 50,000 रुपयांपर्यंत कर सवलत घेऊ शकता. ही सवलत कलम 80C व्यतिरिक्त आहे. अशाप्रकारे एक वैयक्तिक करदाता कलम 80C आणि कलम 80CCD मधून किमान 2 लाखांपर्यंत कर बचतीचा दावा करू शकतो.
अशाप्रकारे एखाद्या करदात्याने एनपीएस, ईपीएफ आणि पीएफमध्ये गुंतवणूक करूनही त्याचे उत्पन्न एका आर्थिक वर्षात 7.5 लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यावर त्याला टॅक्स भरावा लागतो.
कलम 80D
हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीसाठी जो प्रीमिअम भरला जातो. तो इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत टॅक्स सवलतीसाठी ग्राह्य धरला जातो. या कलमांतर्गत मिळणारी सवलत ही वयानुसार मिळते. जर एखादी व्यक्ती 60 वर्षांखालील असेल तर त्याला जास्तीत जास्त 25 हजार रुपयांचा लाभ घेता येतो. तर ज्येष्ठ नागरिकांना या कलमांतर्गत 50 हजारापर्यंत लाभ घेता येतो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या पॉलिसीमध्ये त्याचे स्वत:चे नाव, सोबत पत्नी, मुले आणि आई-वडिलांचे नाव असेल तर ती व्यक्ती 50 हजार ते 1 लाखांपर्यंतचा लाभ घेऊ शकते.
घरभाडे भत्ता
जर तुम्हाला तुमच्या पगारात घरभाडे भत्ता मिळत असेल तर आणि तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही टॅक्स सेव्हिंगचा त्याचा वापर करू शकता.
होम लोनवरील व्याज
तुमच्या नावावर होम लोन आहे. तर तुम्ही कलम 24 अंतर्गत होमलोनवरील व्याजावर कर सवलत घेऊ शकता. या कलमांतर्गत एखादी व्यक्ती 2 लाखापर्यंत कर सवलत घेऊ शकते.