Maruti Suzuki Insurance Broking: मारुती सुझुकीच्या कारचा भारतीय बाजारपेठेतील वाटा 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच दर 100 पैकी सुमारे 40 गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. पर्सनल व्हेइकल सेगमेंटमध्ये लिडर असल्यामुळे मारुती सुझुकीने इन्शुन्स ब्रोकिंग व्यवसायातही पाय रोवले आहेत. मात्र, याबाबत अनेकांना माहिती नाही. आघाडीच्या विमा कपन्यांच्या इन्शुरन्स पॉलिसी घेता येतील.
कोणत्या कंपन्यांसोबत मारुती सुझुकीचे टायअप?
बजाज अलिआन्झ, फ्युचर जनराली, एचडीएफसी एर्गो, लिबर्टी इन्शुरन्स, युनाइटेड इंडिया अॅश्युरन्स, न्यू इंडिया अॅश्युरन्स, ओरिएंटल इन्शुरिन्स, टाटा एआयजी, नॅशनल इन्शुरन्स यासह अनेक खासगी आणि सरकारी विमा कंपन्यांसोबत मारुती सुझुकीने टायअप केले आहे. आघाडीच्या कंपन्यांकडून मारुती सुझुकीच्या गाडीसाठी विमा घेता येईल.
मारुती सुझुकी ब्रोकिंगकडून कोणत्या सुविधा पुरवल्या जातात?
तुमच्या गाडीची विमा पॉलिसी खरेदी करण्यापासून ते क्लेम सेटल करण्यापर्यंत मदत मारुती सुझुकी ब्रोकिंगकडून करण्यात येते. त्यासाठी तुम्हाला कंपनीशी संपर्क साधावा लागेल. जर विमा पॉलिसी संपुष्टात आली असेल तर रिन्यू करता येईल. मारुती सुझुकी कारचा विमा घेण्यासाठी ही खास सुविधा कंपनीने सुरू केली आहे.
तुमच्या गरजेनुसार योग्य ती पॉलिसी तुम्हाला सुचवण्यात येईल. (Maruti Suzuki Insurance Broking facility) भविष्यात काही अपघात झाला किंवा इतर काही आणीबाणी आल्यास क्लेम साठी थेट तुम्ही मारुती सुझुकी ब्रोकिंग कंपनीला फोन करू शकता. क्लेम मंजूर करण्यासाठी वेगळी टीम असून त्याद्वारे तुम्हाला मदत केली जाईल.
पॉलिसी खरेदी/ रिन्यू करणे.
कार विमा पॉलिसी डाउनलोड करता येईल.
गाडी विकल्यास किंवा गाडीमध्ये सीएनजी/एलपीजी, अँटी थेफ्ट डिव्हाईस यासह इतर बदल केल्यास विमा कंपनीला याची माहिती द्यावी लागते. त्यासाठी Endorsement Certificate विमा कंपनीकडून मिळते. असे सर्टिफिकेट तुम्हाला मारुती ब्रोकिंग कंपनीद्वारे मिळेल.
तुमच्या कारसाठी किती इन्शुरन्स लागू शकतो, ते ऑनलाइन कॅलक्युलेट करता येईल.
तसेच पॉलिसी टर्म्स आणि कंडिशन पाहता येतील.
मारुती सुझुकी ब्रोकिंगवरुन क्लेमची प्रक्रिया कशी आहे?
सर्वप्रथम कार मालकाला विम्याच्या दाव्याची माहिती कंपनीला द्यावी लागेल. वर्कशॉपकडून गाडीच्या दुरूस्तीचा अंदाजित खर्च काढला जाईल. डिलरद्वारे गाडी टोईंगकरून वर्कशॉपला नेण्याची सुविधा गरजेनुसार दिली जाईल.
मारुती ब्रोकिंग कंपनीच्या प्रतिनिधीकडून गाडीचे नुकसान किती झाले ते पाहण्यात येईल. (Maruti Suzuki Broking claim process) त्यानुसार दुरूस्तीस मंजूरी दिली जाईल. ही माहिती कार मालकालाही दिली जाईल. तसेच मालकाची परवानगी घेण्यात येईल.
कारची दुरूस्ती केली जाईल. दुरूस्ती केलेल्या कारची कंपनीच्या प्रतिनिधीकडून पुन्हा पाहणी करण्यात येईल.
कार विम्यातून कव्हर नसलेली रक्कम (वजावट) गाडी मालकाला भरावी लागू शकते. त्यानंतर वाहन मालकाला डिलिव्हरी मिळेल. उर्वरित बिलाची रक्कम विमा कंपनी थेट वर्कशॉपला ट्रान्सफर करेल.
पॉलिसी रिन्यू करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
80 लाखांपेक्षा जास्त पॉलिसींची विक्री
मारुती सुझुकी इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनीने आत्तापर्यंत 80 लाखांपेक्षा जास्त विमा पॉलिसी वितरीत केल्या आहेत. तर 18 लाखांपेक्षा जास्त दावे मंजूर केले आहेत. (Maruti Suzuki Insurance Broking workshop) 100 टक्क्यांपर्यंत क्लेम मंजूर केल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. (011/022/033/044) 3377 4477 या अधिकृत क्रमांकावर फोन करुन क्लेम बुक करता येईल.
मारुती सुझुकी डिलरशीप किंवा अधिकृत वर्कशॉपशी संपर्क साधून क्लेम करता येईल. हजारो डिलर आणि वर्कशॉप मारुती सुझुकीच्या नेटवर्कमध्ये असल्याने क्लेमची वेळ आल्यास तत्काळ मदत मिळेल.