• 26 Sep, 2023 23:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: रिटायरमेंटचे प्लॅनिंग करायचे आहे? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

Retirement Planning: रिटायरमेंटचे प्लॅनिंग करायचे आहे? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

काही गोष्टी वेळेतच पूर्ण केलेल्या चांगल्या नाहीतर पुढे त्रास होऊ शकतो. जसे की, तुम्ही म्हणत असाल रिटायरमेंटला वेळ आहे, पाहू-करू तर तुम्हाला रिटायरमेंटनंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून तुम्ही आत्ताच रिटायरमेंटचे प्लॅनिंग करू शकता. ती प्लॅनिंग कशी करायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

म्हातारपणात बऱ्याच खर्चाच्या गोष्टी अचानक येऊन धडकतात. त्यामध्ये आजारपणही येते. याचबरोबर लग्न किंवा मुलांचे शिक्षण आणि नवीन घर या गोष्टीही उभ्या राहतात. याशिवाय पण, रिटायरमेंटनंतरचे आयुष्य कसे काढायचे हा प्रश्न उभा राहतो.  त्यामुळे आत्तापासूनच बाकीच्या अनावश्यक खर्चाच्या गोष्टी सोडून रिटायरमेंट प्लॅनिंग केल्यास, निवृत्तीनंतरचा बराच ताण कमी होऊ शकतो. 

तुम्ही आधीच रिटायरमेंटसाठी सेव्हिंग केल्यास, भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आर्थिक संकटाला तोंड देऊ शकता. सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर इतरांप्रमाणे म्हणावे तितके टेन्शन राहत नाही, कारण त्यांना पेन्शन मिळणार असते. पण, सर्व जण सरकारी कर्मचारी नसतात, यामुळे बरेच जण या गोष्टीकडे दूर्लक्ष करतात आणि त्यांनतर त्यांना अडचणींना सामोर जावे लागते. त्यामुळेच थोडी का असेणा गुंतवणूक करणे महत्वाचे आहे.

फक्त रिटायरमेंटसाठी पैसे गुंतवत आहोत. येवढ्या गोष्टीने भागत नाहीत. त्यासाठी योग्य प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात कोणावर अवलंबून न राहता, स्वत:चा  खर्च स्वत:  उचलता येतो. त्याचबरोबर काही अनपेक्षित घडणाऱ्या घटनांसाठी तयार राहता येते. आपले कुटुंब आपल्यावरच निर्भर असल्यामुळे त्यांच्या गरजांसाठी देखील हा गुंतवलेला पैसा कामी येऊ शकतो. यासाठी रिटायरमेंटचे प्लॅनिंग गरजेचे आहे.

प्लॅनिंगसाठी कोणती वेळ चांगली?

रिटायरमेंटच्या प्लनिंगचा सर्वात महत्वाच भाग म्हणजे ती कधीपासून सुरू करायची हे ठरवणे आहे. यात खास गोष्टी अशी आहे की जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल, तेवढा चांगला रिटर्न तुम्हाला मिळू शकतो. अनेक तज्ज्ञ लवकर गुंतवणूक करण्याला प्रोत्साहन देतात. कारण, रिटायरमेंटनंतर त्या पैशांचा योग्यरित्या लाभ घेता येतो. तेच जर उशीरा गुंतवणूक सुरू केली तर रिटर्न चांगला मिळणार नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींसाठी आपल्याजवळ पाहिजे, तेवढे पैसे राहणार नाही.

गुंतवणूक कुठे करावी?

रिटायरमेंटच्या प्लॅनिंगमधली ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. गुंतवणुकीचा चांगला प्लॅन निवडून त्यात पैसे टाकत राहिल्यास, रिटायरमेंटनंतर एक ठोक रक्कम जमा व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना, त्याची रिस्क आणि फायदे पाहणे गरजेचे आहे. तसेच, त्याविषयी माहिती घेणे ही गरजेचे आहे. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक केल्यास, नुकसान होऊ शकते.

रिटायरमेंटचे बनवा बजेट

तुम्हाला भविष्यात कोणकोणत्या गोष्टींसाठी पैसे लागणार आहे, त्याची यादी बनवा. त्यानुसार अंदाजे रक्कमही टाका. यामुळे तुम्हाला भविष्यात किती पैसे लागणार आहेत, याची माहिती मिळू शकते. पण, हा बजेट तुमच्या कमाईनुसार बनवा. म्हणजे त्यानुसार तुम्हाला कुठे किती पैसे गुंतवावे लागले, हे लक्षात येईल.

आर्थिक उद्दिष्टांसाठी वेगळी गुंतवणूक!

रिटायरमेंटची गुंतवणूक फक्त स्वत: पुरतीच नसून इतरही गोष्टींना त्यात स्थान द्यावे लागते. जसे की, मुलांचे लग्न, शैक्षणिक खर्च किंवा घर खरेदी करणे. त्यामुळे या गोष्टींना ध्यानात घेऊन, तुम्ही त्याप्रमाणे सेव्हिंग्ज आणि गुंतवणूक करु शकता.