कर्ज काढून वाहन विकत घेतल्यास दरमहा EMI (Equated Monthly Installment) म्हणून ठराविक रक्कम भरावी लागते. काही कारणास्तव तुम्ही या कर्जाची परतफेड केली नाही तर बँक तुमच्यावर कठोर कारवाई करते. कर्ज काढतांना कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि कर्जाच्या अटी व शर्ती स्वीकारण्यापूर्वी सर्व लिहिलेले मुद्दे काळजीपूर्वक तपासणे महत्वाचे आहे. एकदा बँकेने कर्ज दिल्यानंतर तुम्हाला दरमहा EMI स्वरूपात रक्कम परत करणे आवश्यक आहे. तुम्ही EMI भरण्यास उशीर केला तर तुम्हाला पुढील अडचणींना सामोरे जावे लागेल.
Table of contents [Show]
क्रेडिट स्कोअरवर परिणाम
तुम्ही वाहन कर्जाचे EMI पेमेंट चुकवल्यास, उशिरा पेमेंट केल्याबद्दल अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. कार लोनचा ईएमआय चुकवल्यास याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. कारण भविष्यातील कर्जासाठी तुमची क्रेडिट हिस्ट्री हा महत्त्वाचा घटक आहे.
वाढीव व्याज
EMI पेमेंट वेळेत न जमा केल्यामुळे व्याजदर वाढतो. तुम्हाला कर्जाच्या परतफेडीपर्यंत जास्त व्याज द्यावे लागेल. तुम्ही एखादा EMI चुकवल्यास, तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. ज्यामुळे कर्जाची किंमत लक्षणीयरीत्या वाढू शकते.
कायदेशीर कारवाई
काही प्रकरणांमध्ये, जर जास्त कालावधीसाठी ईएमआय पेमेंट चुकवले गेल तर कर्जदार थकित रक्कम वसूल करण्यासाठी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. थकवलेला EMI भविष्यातील कर्जासाठी अडचणीचा ठरू शकतो.
वाहन जप्ती
तुमचे एकापेक्षा जास्त EMI थकले असतील आणि तुम्ही बँकेचे कर्ज फेडण्यास अयशस्वी झाल्यास, बँक तुमची कार ताब्यात घेऊ शकते. ईएमआय पेमेंट वेळेत न मिळाल्याने कर्जदार किंवा लोन एजन्सीकडून सातत्याने पैशांचा तगादा मागे लागू शकतो.
कर्जाचा ईएमआय थकित असेल तर कर्जदाराचे बँके सोबतचे संबंध बिघडू शकतात. वेळेत कर्ज न फेडल्यास बँकेसोबत वाईटपणा पत्करावा लागू शकतो. तसेच या संदर्भात बँकेशी बोलणी करणे देखील कठीण होते. यामुळे कर्जदारावर आर्थिक ताण येऊ शकते. परिणामी कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम होऊ शकतो.