Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shankar Mishra: शंकर मिश्रा काम करत असलेल्या Wells Fargo बँकेवर असलेले इतर आरोप

Wells Fargo

Image Source : www.reuters.com

अमेरिकेतील ‘वेल्स फर्गो’ या नामांकित बँकेचा शंकर मिश्रा भारतातील उपाध्यक्ष होता. या बँकेचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आहे. वेल्स फर्गो बँकेने एक निवेदन जाहीर करत शंकर मिश्रा याला कामावरून बडतर्फ करत असल्याचे जाहीर केले.

एयर इंडिया विमानामध्ये एका महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा (Shankar Misra)  या व्यक्तीला तो काम करत असलेल्या बँकेने कामावरून बडतर्फ केले आहे. अमेरिकेतील ‘वेल्स फर्गो’ (Wells Fargo) या बँकेचा भारतातील तो उपाध्यक्ष होता. या बँकेचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) येथे आहे. वेल्स फर्गो बँकेने एक निवेदन जाहीर करत शंकर मिश्रा याला कामावरून बडतर्फ करत असल्याचे जाहीर केले.

वेल्स फर्गो अमेरिकेतील आघाडीची बँक 

वेल्स फर्गो बँक ही अमेरिकेतील एक महत्वाची बँक असून अमेरिकेतील चार सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे.कमी व्याजदरात गृहकर्ज देणारी ही ग्राहकांच्या पसंतीची बँक आहे.  बँक देशभरात 64 दशलक्षाहून अधिक ग्राहकांना सेवा देते आणि 250,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. 4 जानेवारी 2023 पर्यंत बँकेचे बाजार भांडवल $158.97 अब्ज होते. वेल्स फार्गोने 2021 आर्थिक वर्षासाठी $21.5 अब्ज कमाईचे निव्वळ उत्पन्न नोंदवले आहे. असे असले तरीही कोणत्या न कोणत्या कारणाने ही बँक अमेरिकेत चर्चेत राहिली आहे. शंकर मिश्राच्या निमित्ताने भारतात देखील या बँकेबद्दल चर्चा रंगली आहे.

बनावट खाती बनवल्याचा आरोप आणि दंड 

डिसेंबर 2013 मध्ये, एलए टाईम्सने एका बातमीद्वारे बँकेच्या व्यवहारावर प्रश्न उपस्थित केले. बँक कर्मचाऱ्यांनी त्यांचा विक्री कोटा पूर्ण करण्यासाठी बँकेची बनावट खाती बनवली आणि क्रेडिट कार्ड प्रदान केले असा आरोप केला अगेला.या बातमीनंतर, बँकेने सर्व दावे नाकारले होते. आरोपानंतर 3 वर्षांनंतर 2016 मध्ये कंपनीने 3.5 दशलक्षाहून अधिक बनावट खाती उघडल्याचे कबूल केले. बँकेने दिलेले टार्गेट पूर्ण करून बोनस मिळवण्याच्या प्रयत्नात  वेल्स फार्गोच्या कर्मचार्‍यांनी हा गुन्हा केला होता. यासाठी त्यांनी काल्पनिक व्यक्तींचे नाव वापरले, त्याच्या नावाने बनवत इमेल आयडी तयार केले आणि त्यांना क्रेडीट कार्ड देखील प्रदान केले. 
एवढेच नाही तर खाते खरे भासावे म्हणून त्यावर पैसे देखील पाठवले गेले. या बनावट खाते प्रकरणात दोषी आढळलेल्या 5,300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले गेले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) देखील पायउतार झाले.

बँकेचे गैरव्यवहार कमी झाले नाहीत 

एप्रिल 2018 मध्ये,  कंझ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरो (CFPB) आणि  चलन नियंत्रक कार्यालयाने  हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर वेल्स फार्गोला $1 अब्ज दंड ठोठावला. एका दशकापूर्वी निवासी तारण कर्जाच्या गुणवत्तेची चुकीची माहिती दिल्याबद्दल कंपनीने ऑगस्ट 2018 मध्ये $2 अब्ज दंड ठोठावला होता.