सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी फायदेशीर योजना ठरली आहे. या योजने अंतर्गत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. SSY मध्ये वर्षाला किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवता येऊ शकतात. सरकारने सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर आता 8 टक्के व्याज मिळत आहे. यामुळे मुलींच्या भविष्याचे आर्थिक नियोजन सुलभ होत आहे. पण काही कारणास्तव खातेधारकाला स्थलांतर करावे लागले तर त्याला या योजनेतील खाते ट्रान्सफर करावे लागते. चला तर मग जाणून घ्या सुकन्या समृद्धी खाते कसे ट्रान्सफर करायचे? त्याची प्रक्रिया काय आहे? हे समजून घेणार आहोत.
असे करता येईल खाते ट्रान्सफर?
- पोस्टाच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर
- बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर
- बँकेतून पोस्टाच्या शाखेत ट्रान्सफर
खाते हस्तांतरण करण्याची पद्धत समजून घ्या
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ऑनलाईन उघडण्याची किंवा खाते ट्रान्सफर करण्याची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही. यासाठी खातेधारकाला कागदपत्रे सबमीट करून KYC करणे गरजेचे आहे.
दुसऱ्या ठिकाणी खाते उघडल्यानंतर त्या खात्यात पैसे ऑनलाईन जमा करता येतात.
बँक किंवा पोस्टात खाते असेल तर खातेधारकाला ते ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावा लागतो. यासाठी ट्रान्सफरचा फॉर्म भरावा लागेल.
फॉर्ममध्ये नवीन ठिकाणचा पत्ता देऊन तो बॅंकेत किंवा पोस्टामध्ये सबमिट करावा लागेल. सबमिट केलेला अर्ज जुन्या शाखेत तपासणीसाठी पाठवला जाईल.
जुन्या शाखेने अर्जाला मान्यता दिल्यानंतर नवीन शाखेत खातेधारकाच्या कागदपत्रांची पडताळणी करून नवीन खाते उघडले जाईल.
www.zeebiz.com