आयकर कलम 80 C नुसार एनएससी (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट) योजना ही टॅक्स बचत करण्याची मुभा देते. एनएससी (National Saving Certificate) अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर करसवलतीचा चांगला लाभ मिळतो. देशातील लोकप्रिय गुंतवणूक योजनांपैकी एक असलेल्या एनएससीला दुसर्याच्या नावाने ट्रान्सफर करण्याची देखील सोय आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये दीड लाखांपर्यंतच्या बचतीवर टॅक्स सवलतीचा लाभ मिळतो. म्हणजेच ही रक्कम टॅक्स पात्र उत्पन्नातून वगळली जाते. एनएससीवर वार्षिक व्याज मिळते. परंतु त्याचे पेमेंट केवळ एनएससी मॅच्युअर झाल्यावरच होतेे. सध्या एनएससीवर 6.8 टक्के व्याज आहे. एनएससी-8 चा मॅच्योरिटीचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटला संपूर्ण कालावधीत एकदाच ट्रान्सफर करता येते. अर्थात यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते.
नियम आणि अटी
- सर्टिफिकेट जारी झाल्याच्या तारखेपासून वर्षानंतर एकदाच एनएससीला ट्रान्सफर करता येते. परंतु एनएससीला जवळच्या नातेवाईकांच्या नावे, गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस किंवा न्यायालयाच्या आदेशानंतर ट्रान्सफर करायचे असेल तर हा नियम लागू होत नाही. संयुक्त नावाच्या बाबतीत दोहोंपैकी एकाचा मृत्यू झाल्यास हयात असलेल्या गुंतवणूकदारास सर्टिफिकेट ट्रान्सफर करताना हा नियम गैरलागू ठरतो.
- एखाद्या अन्य व्यक्तीला एनएससी ट्रान्सफर करायचे असेल तर त्यासाठी फॉर्म एनसी 34 जमा करण्याची गरज आहे.
- सर्टिफिकेट ट्रान्सफर करण्याचे नाव, लाभार्थ्यांचे नाव (ज्याच्या नावावर ट्रान्सफर करायचे आहे), सर्टिफिकेटचा सीरियल नंबर, डिनॉमिनेशन, जारी करण्याची तारीख याचा उल्लेख अर्जात केला जातो. अल्पवयीन प्रकरणात पालकांना अर्जात स्वाक्षरी करावी लागते.
- ज्या व्यक्तीच्या नावे एनएससी ट्रान्सफर करावे लागते, त्यास ठरलेल्या चौकटीतील डिक्लेरेशनवर स्वाक्षरी करावी लागते. यानुसार ते एनएससीशी निगडीत अटी आणि नियम मान्य करतात. लाभार्थ्याला केवायसीचे कागदपत्रे देखील द्यावे लागते. यात फोटो, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र याचा समावेश आहे. तसेच केवायसी फॉर्मला देखील जमा करावा लागतो.
ट्रान्सफर कसे होते?
ट्रान्सफर प्रक्रियेत जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपविली जात नाही. याउलट जुन्या नावाच्या ऐवजी नवीन नाव जोडले जाते. त्यावर अधिकृत पोस्टमास्टरचे सांक्षाकन होते. तारखेसह पोस्टमास्टरचा शिक्का मारला जातो. आणखी एक गोष्ट म्हणजे सर्टिफिकेटच्या प्रत्येक सीरिजसाठी वेगळा अर्ज देण्याची आवश्यकता असते.
शुल्क आकारणी
ट्रान्सफर रिक्वेस्टची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोस्ट ऑफिसकडून नियमानुसार शुल्क वसूल केले जाते.
image source - https://bit.ly/3vIXN1V