रोजच्या बचतीची सवय असली आणि योग्य धोरण आखून गुंतवणुकीची सांगड घातल्यास, काही दिवसातच आपल्याजवळ चांगली संपत्ती जमा होऊ शकते. यासाठी नियमित बॅंक खात्यांपेक्षा अधिक रिटर्न देणाऱ्या फायदेशीर ठिकाणी गुंतवणूक केल्यास, कमी अवधीत जास्त पैसा जमा व्हायला मदत होऊ शकते. यासाठी दिवसाला 100 रुपयांच्या सेव्हिंग्जचे (बचत) गणित समजून घेणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
फक्त 100 रुपये सेव्ह करा
जर तुम्ही रोज 100 रुपयांची बचत केली तर वर्षाला तुम्ही 36,500 रुपयांची बचत करु शकाल. हेच पैसे तुम्ही बचत खात्यात जमा केले तर तुम्हाला त्यावरही व्याज मिळते. त्यामुळे बचतीसह तुम्हाला व्याज मिळून एकूण बचत वाढायला मदत होऊ शकते.
आकर्षक व्याजदर शोधा
बॅंकेचा 6.5 टक्के व्याजदर लक्षात घेता फक्त बचतीच्या माध्यमातून दहा लाख जमा करायला तुम्हाला 274 वर्ष लागू शकतात. जर तुम्ही चांगल्या आणि अधिक आकर्षक गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर तुम्ही काही अवधीतच तुमच्या ठरवलेल्या ध्येयांपर्यत पोहचू शकता. म्हणजे, तुम्ही योग्य ठिकाणी आणि चांगला व्याजदर मिळेल अशाच ठिकाणी गुंतवणूक केल्यास, ध्येयापर्यंत पोहचायला तुम्हाला कमी वेळ लागेल.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा पैसा
तुम्ही नियमितरित्या बचत केली आणि तो पैसा म्युच्युअल फंड किंवा इक्विटीसारख्या ठिकाणी गुंतवला तर तुम्हाला त्यातून चांगला रिटर्न मिळू शकतो. या ठिकाणी गुंतवणूक केल्यास, ते बॅंकेपेक्षा चांगला रिटर्न मिळवून देतात. कारण, ही इन्स्ट्रूमेंट कंपाउंड पावरचा वापर करतात, त्यामुळ पैसा वेगाने वाढायला मदत होते.
आर्थिक ध्येय सेट करा
तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोट्यधीश बनायचे असेल किंवा तुम्ही काही आर्थिक ध्येय सेट केले असेल तर धोरण ठरवून नियमित बचत करणे फायद्याचे ठरु शकते. यासाठी तुम्ही 100 रुपयांची बचत करुन शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेवला तर तुम्हाला ती सवय लागू शकते.
तसेच, कालांतराने त्यात वाढ होऊन तुम्ही चांगली रक्कम जमा करु शकता. याशिवाय तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल, त्या ठिकाणी जमा केलेली रक्कम गुंतवू शकता. याचबरोबर, 100 ऐवजी तुमच्या परिस्थितीनुसारही तुम्ही आकडा निवडू शकता. फक्त गुंतवणूक कशी आणि कुठे करायची हे तुम्हालाच ठरवणे गरजेचे आहे.
(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)