ज्यांना जलदगतीने किंवा एका ठराविक कालावधीत मोठी संपत्ती निर्माण करायची आहे; त्यांच्यासाठी शेअर मार्केट (Share Market) हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी, शेअर मार्केट कसे चालते, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची, त्याची सुरूवात कशापासून केली पाहिजे, त्यानंतर पुढच्या टप्प्यात शेअर मार्केटमधून तुमचा नफा वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत, याची माहिती टप्प्याटप्प्याने समजून घेतली पाहिजे. यासाठी आम्ही तुमच्यासाठी अशा काही युट्यूबर्सची माहिती घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही शेअरमार्केटबद्दलची माहिती मिळवू शकता.
शेअर मार्केटबद्दलची इत्यंभूत माहिती सध्या YouTube वरील वेगवेगळ्या चॅनेल्सवर उपलब्ध आहे. जे तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग कसे करायचे? यासाठी मदत करू शकतात आणि या YouTubers ना फॉलो करून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाला सुरूवात करू शकता. YouTube वरील असेच काही उत्तम चांगले चॅनेल्स आणि ट्रेडर्स आम्ही तुमच्यासाठी शोधले आहेत. जे तुमचा ट्रेडिंगचा प्रवास नक्कीच सोपा करू शकतील. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील टॉप 10 मधील पहिले 3 बेस्ट ट्रेडिंग चॅनेल्स.
कॉवे बाय फिनोवेशनज् (Covey by Finnovationz)
Covey by Finnovationz हे प्रसाद लेंडवे याचे YouTube चॅनेल आहे आणि भारतातील शेअर मार्केट (Indian Share Market) जाणून घेण्यासाठी भारतीय YouTube चॅनेलच्या यादीत हे पहिल्या क्रमांकावर आहे. या चॅनेलवर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते. कोणतीही गुंतवणूक करताना आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे, याचे व्हिडिओ पोस्ट केले जातात. FinnovationZ च्या चॅनेलवर 320 हून अधिक व्हिडिओ पोस्ट केले गेले आहेत. या चॅनेलवरील व्हिडिओची भाषा हिंदी आहे. पण ते फॉलो करणेदेखील सोपे आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी हे युट्यूब चॅनेल तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
ट्रेड ब्रेन (Trade Brain)
ट्रेड ब्रेन (Trade Brain) हे शेअर मार्केट शिकण्यासाठी अनेक चॅनेलपैकी एक चांगले चॅनेल आहे. ऑनलाईन स्टॉक मार्केट शिकण्यासाठी भारतातील एक प्रसिद्ध असं आर्थिक शिक्षण मंच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. ट्रेड ब्रेनच्या यूट्यूब चॅनेलवर स्टॉक मार्केट ट्रेडिंग आणि गुंतवणुकीवर 250 हून अधिक व्हिडिओ आहेत. त्यांच्याकडे टेक्निकल अनालिसिसपासून स्टॉक ट्रेडिंग, सिग्नल आणि बरेच काही समाविष्ट करणारे विविध व्हिडीओ आणि वेबिनार देखील आहेत. नवशिक्या, मध्यवर्ती किंवा अगदी तज्ज्ञ ट्रेडर्ससाठी या चॅनेलवर व्हिडीओ आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून सुमारे 1.25 मिलियन लोक शेअर मार्केटचे ज्ञान घेत आहेत.
प्रांजल कामरा (Pranjal Kamra)
प्रांजल कामरा (Pranjal Kamra) हा एक फेमस असा YouTuber आहे; ज्याच्या युट्यूब चॅनेलवर गुंतवणुकीची रणनीती, स्टॉक मार्केट शिकणे, पर्सनल फायनान्स, करिअर सल्ला आणि अशा अनेक विषयांवरील व्हिडिओ उपलब्ध आहेत. या चॅनेलचे सुमारे 1.25 मिलियनहून अधिक सब्स्क्राईबर आहेत. जे विविध विषयांवरील स्पष्टीकरणात्मक व्हिडिओ पाहतात. प्रांजल कामरा याने या त्याच्या फॉलोवर्स परिवाराला “काम्राज फिनोलॉजी” हे नाव दिले आहे. त्याचे व्हिडिओ लोकांना सहज समजतील अशा भाषेत मांडलेले असतात. शेअर मार्केटमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या शिकाऊ उमेदवारांना मार्केटमधील वेगवेगळ्या संकल्पना, स्ट्रॅटेजी समजून घेण्यासाठी या चॅनेलवरील व्हिडिओचा फायदा होतो. तसेच बचत आणि गुंतवणुकीचे महत्त्व काय आहे? शेअर मार्केटमध्ये चांगले ट्रेडिंग कसे करावे, एक चांगला ट्रेडर कसा असतो. याच्या सूचना किंवा माहिती प्रांजल कामरा देत असतो. त्यामुळे प्रांजल कामराचा युट्यूब चॅनेल भारतातील शेअर मार्केटसाठी सर्वोत्तम युट्यूब चॅनेल मानला जातो.