Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ayushman Golden Card साठी तुमची पात्रता तपासायची आहे? जाणून घ्या सविस्तर

Ayushman Golden Card

Ayushman Bharat Card: या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत दिला जातो. तसेच एका कुटुंबासाठी एक ‘आयुष्मान गोल्डन कार्ड’ दिले जाते. या कार्डवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी केली जाते आणि त्यांच्या आरोग्यविषयक अपडेट्स देखील या कार्डवर बघता येतात. या कार्डच्या मदतीने सरकारी व निमसरकारी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

कोविडमध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्य व्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे अनुभवले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात अजूनही म्हणाव्या तशा आरोग्य सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीयेत. याचाच विचार करून 2018 साली केंद्र सरकारने देशातील गरीब आणि वंचित घटकांना चांगल्या आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. यालाच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना देखील म्हटले जाते.

2019 साली जगभरात कोविडने धुमाकूळ घातल्यानंतर या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील ग्रामीण भागात अधिकाधिक नागरिकांना यात सामील करून घेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

आरोग्यसुविधा मोफत 

ज्या समाजघटकांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, त्यांच्यासाठी ही योजना महत्वाची ठरते आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत दिला जातो. तसेच एका कुटुंबासाठी एक ‘आयुष्मान गोल्डन कार्ड’ दिले जाते. या कार्डवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी केली जाते आणि त्यांच्या आरोग्यविषयक अपडेट्स देखील या कार्डवर बघता येतात. या कार्डच्या मदतीने सरकारी व निमसरकारी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे. मात्र यासाठी सदर योजनेत कोणकोणती रुग्णालये सूचीबद्ध आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

दुर्धर आजारावर उपचार 

आयुष्यमान गोल्डन कार्ड असलेल्या कुटुंबाला आता महागड्या आजारावर देखील उपचार घेता येणार आहे. हृदयरोगावरील शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार, गुडघे-सांधेदुखी आदी रोगांवरील उपचार देखील नागरिकांना या योजनेत मोफत घेता येणार आहेत.

योजनेचे लाभार्थी कोण?

आधीच सांगितल्याप्रमाणे जे नागरिक वंचित घटकातून येतात त्यांच्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. 
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेचा प्रामुख्याने लाभ घेता येणार आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि भूमिहीन वर्गातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेसाठी पात्रता कशी तपासाल?

तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे किंवा नाही हे तुम्हांला घरबसल्या चेक करता येणार आहे. यासाठी तुम्हांला खालील स्टेप्सचे अनुकरण करावे लागेल.

  • या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर  pmjay.gov.in/ वर जा.
  • त्यानंतर 'Am I Eligible' वर क्लिक करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा टाका.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर पाठवलेला OTP टाका.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • रेशन कार्ड किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही पात्रता चेक करू शकता.
  • तुम्ही आयुष्मान गोल्डन कार्डसाठी पात्र आहात की नाही, ते स्क्रीनवर दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही याची माहिती तुम्हांला घेता येणार आहे.