सध्या जगभरात iPhone 15 चा बोलबाला आहे. आयफोनप्रेमींनी तर हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी स्टोअर्समध्ये लांबच लांब रांगा लावल्या होत्या. काही ग्राहकांनी तर दोन महिने आधीच आयफोन बुक करून ठेवलाय. मुंबईत आणि दिल्लीत आयफोनचे रिटेल स्टोअर खुले झाल्यामुळे ग्राहकांना आता थेट स्टोअर्समधून आयफोन खरेदी करता येत आहे. मुंबई आणि दिल्लीत तर बाहेर राज्यातील आयफोन प्रेमींनी 17-18 तास रांगेत उभे राहून iPhone 15 खरेदी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
तुम्ही तर iPhone 15 खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि बजेटमुळे खरेदीसाठी मागेपुढे बघत असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचे iPhone 15 खरेदी करण्याचे स्वप्न तर पूर्ण होईलच सोबत ही डील तुम्हांला स्वस्तात देखील पडेल. ॲपल कंपनीने iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max असे चार मॉडेल लाँच केले आहेत. iPhone 15 Pro जर तुम्हाला केवळ 41 हजारात खरेदी करता आला तर? होय हे शक्य आहे, परंतु त्यासाठी काही अटी देखील आहेत.
Lines at Apple Store, BKC, Mumbai in ?? India! Thankfully they let the ones who’ve pre-ordered the iPhone 15 series device for pickup in immediately. #iPhone15Pro #iPhone15 #iPhone15ProMax pic.twitter.com/cnDcG9Ot2u
— Ishan Agarwal (@ishanagarwal24) September 22, 2023
iPhone 15 Pro साठी डील
ॲपलच्या iPhone 15 Pro या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 35 हजार रुपये इतकी आहे. हा स्मार्ट फोन तुम्हाला अमेझॉनवर देखील खरेदी करता येणार आहे. जर हा स्मार्ट फोन खरेदी करताना तुम्ही HDFC बँकेचे क्रेडीट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुम्हांला इंस्टंट 4,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. कॅशबॅक मिळाल्यानंतर या मोबाईलची किंमत झाली 1 लाख 31 हजार रुपये.
जर तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुमच्याकडे जीएसटी नंबर असेल तर तुम्ही GST ची 18% रक्कम, म्हणजेच 19,984 रुपये रिटर्न क्लेम करू शकता. म्हणजेच आता हा मोबाईल तुम्हांला 1,11,016 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
तब्बल 70 हजारांपर्यंत सूट
आता आणखी पैसे वाचवायचे असेल तर तुम्ही स्मार्ट फोन एक्सेंजचा पर्याय निवडू शकता. ॲपलने दिलेल्या माहितीनुसार जर ग्राहकाकडे iPhone 14 Pro हा स्मार्ट फोन असेल आणि तो एक्स्चेंज ऑफरमध्ये दिला जात असेल तर ग्राहकाला जास्तीत जस्त 61 हजारांपर्यंतची सूट आणि 9 हजार रूपे बोनस रक्कम दिली जाईल. याचाच अर्थ असा की सुस्थितीत असलेला iPhone 14 Pro तुम्ही एक्स्चेंज करत असाल तर तुम्हांला तब्बल 70 हजारांपर्यंत सूट मिळेल आणि तुम्ही हा स्मार्ट फोन केवळ 41 हजारात खरेदी करू शकता.
काय मग, आहे की नाही सुपर सेविंग डील? iPhone 15 Pro 41 हजारात खरेदी करण्यासाठी तुम्हांला वरील कंडीशन फॉलो कराव्या लागतील, मगच तुम्हांला ही डील क्रॅक करता येणार आहे.