Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Scheme: कोट्याधीश व्हायचं आहे? या सरकारी योजनेत अशी करा गुंतवणूक, जाणून घ्या सविस्तर

Government Scheme

Government Scheme: पैशांचे योग्य नियोजन आणि बचत करुन चांगली रक्कम उभारता येऊ शकते. पण, त्यासाठी गुंतवणुकदारांजवळ संयम असणे गरजेचे आहे. तुम्हाला ही गुंतवणूक करुन कोट्याधीश व्हायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी सरकारी योजना घेऊन आलो आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

PPF Scheme: तुम्हाला दीर्घ काळाच्या गुंतवणुकीतून पैसे कमवायचे असल्यास तुम्ही सरकारच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये (PPF) गुंतवणूक करु शकता. ही सरकारची योजना असल्यामुळे विश्वसनीय व सुरक्षित आहे. तसेच, या योजनेत 7.1 टक्के व्याजदर दिला जात आहे. गुंतवणुकदार कोणत्याही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडू शकतात. 

या योजनेत गुंतवणुकदार कमीतकमी 500 रुपये आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत  गुंतवणूक करु शकतो. याशिवाय  PPF खाते मॅच्युअर व्हायला 15 वर्ष लागतात. तर याच गोष्टीचा फायदा घेऊन गुंतवणुकदाराने गुंतवणूक केल्यास तो त्याचे कोट्याधीश व्हायचे स्वप्न पूर्ण करु शकतो. तेही विना टेन्शन.

कोट्याधीश व्हायचा मंत्र

तुम्ही जर काही ठरावीक ठिकाणीच गुंतवणूक करत राहिल्यास कोट्याधीश होणे अवघड आहे. पण, पर्सनल फायनान्स तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केल्यास ते शक्य होऊ शकते. कारण, ते तुम्ही कंपाउंडींगच्या सहाय्याने पूर्ण करु शकता. समजा, एखाद्या कमावणाऱ्या व्यक्तीने PPF खात्यात दोनवेळा म्हणजे 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास तो हा आकडा पार करु शकतो. 

जर गुंतवणुकदाराने त्याच्या खात्यात दरवर्षी 1.50 लाख रुपये टाकले. म्हणजेच तो महिन्याला  8333.3 रुपये गुंतवणूक करेल. तर हीच रक्कम 25 वर्षांनंतर 1.03 कोटी होईल. हा आकडा कसा आला तर आपण तो पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार बघितला. कारण, पीपीएफ व्याजदर 7.10 टक्के वार्षिक गृहीत धरला आहे. समजा तुम्ही 37,50,000 गुंतवलेले आणि त्यावर मिळणारे व्याज 65,58,015 रुपये आहे. त्यामुळे तुम्ही सहज कोटीचा आकडा 25 वर्षात पूर्ण करु शकता.

टॅक्स सवलतीचा ही मिळेल लाभ

तुमचे PPF खाते EEE कॅटेगरीत मोडते, यामुळे तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक डिपाॅझिटवर कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिटचा दावा करु शकता. याशिवाय PPF मॅच्युरिटीची मिळणारी रक्कमही करमुक्त आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेत पैसा गुंतवूण मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच, तुम्ही दरवर्षी योग्यरितीने गुंतवणूक केल्यास, तुमचे कोट्याधीश व्हायचे स्वप्न पूर्ण व्हायला मदतच होणार आहे. त्यामुळे PPF मध्ये गुंतवणूक करायला विसरु नका.