मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही देशातली एक आघाडीची ऑटो मॅन्युफॅक्चरिंग (Auto Manufacturing) कंपनी आहे. मात्र सध्या इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरतेमुळे कंपनीच्या उत्पादनावर परिणाम होताना दिसतोय. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादनात कपात होणार आहे. तर जुलै-सप्टेंबर या कालावधीत उत्पादन पातळीवर थोडासा दिलासा मिळू शकतो. सध्या इलेक्ट्रॉनिक घटकांच्या कमतरता जाणवतेय. त्यामुळे कंपनीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होताना दिसतोय. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासंदर्भातली माहिती दिली. मारुती सुझुकीला चिपच्या कमतरतेमुळे पुरवठ्यात अडचणी येत असल्याचं सांगण्यात आलंय.
Table of contents [Show]
मागणीपेक्षा पुरवठा अधिक
मारुती सुझुकीचे सेल्स आणि मार्केटिंग डिपार्टमेंटचे सिनिअर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शशांक श्रीवास्तव म्हणाले, की मागच्या आर्थिक वर्षात कंपनीचं 1.7 लाख युनिट्सचं नुकसान झालंय. मागच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पादनात 45,000 युनिट्सची कमतरता होती. त्याचप्रमाणे चौथ्या तिमाहीत 38,000 युनिट्सचं उत्पादन होऊ शकलं नाही, असं त्यांनी सांगितलं. पुढं ते असंही म्हणाले, की मागणीपेक्षा पुरवठा वाढला. त्यामुळे ऑटो मेजरकडे 4 लाखांहून अधिक युनिट्स प्रलंबित स्तरावर आहेत. यात अर्टिगा (Ertiga) 1 लाखांच्या बुकिंगसह टॉपवर आहे. सध्याच्या पुरवठ्याची परिस्थिती अशी आहे. त्यामुळे कंपनीला उत्पादन तोटा सहन करावा लागलाय. मे आणि जूनमध्येदेखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं.
बुकिंग पेंडिंग
मे महिन्यात उत्पादनात तोटा झालाय. तर जूनमध्ये तोटा होण्याची शक्यता आहे. या तिमाहीतदेखील कंपनीला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. अर्टिगाव्यतिरिक्त, कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझामध्येही (Brezza) 60,000 युनिट्सचा बॅकलॉग आहे. याशिवाय मारुती जिमनी (Maruti Jimny) आणि मारुती फ्रॉन्क्स (Maruti Fronx) या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी 30,000 बुकिंग मिळालेत. दरम्यान, पुढच्या काही दिवसांत चिप पुरवठ्याच्या स्थितीत काही सुधारणा होईल अशी अपेक्षा असल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलंय.
जुलैत सुधारणा होणार?
जुलै महिन्यात या परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. चीपची व्हिजिबिलिटी मर्यादित होणार आहे. कंपनी आपल्या प्रकल्पामध्ये बदल करत राहील. दुसऱ्या तिमाहीत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये कंपनीनं 1,44,097 प्रवासी वाहनांचं उत्पादन केलं. मागच्या वर्षी याच कालावधीत ते 1,52,954 इतकं होतं. म्हणजेच एकूण 6 टक्क्यांची घसरण दिसून आलीय. इलेक्ट्रॉनिक घटकांच्या तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम झालाय. 2022-23मध्ये कंपनीनं 19.22 लाख युनिट्सचं उत्पादन केलं होतं. मात्र, कंपनीला मागच्या आर्थिक वर्षातलं एकूण उत्पादन म्हणजेच 20 लाख युनिट्स पूर्ण करता आलेलं नाही.
सेमीकंडक्टरची कमतरता
सेमीकंडक्टर हा सिलिकॉन चिपचा एक प्रकार आहे. ऑटोमोबाइल्स, कॉम्प्युटर्स आणि मोबाइलसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये नियंत्रण आणि मेमरी कार्ये करण्यासाठी प्रामुख्यानं वापरलं जातं. सेमीकंडक्टरचा वापर अलीकडच्या काळात वाहन उद्योगात वाढल्याचं दिसतं. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ड्रायव्हर असिस्ट, नेव्हिगेशन आणि हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टम यासारख्या अधिकाधिक इलेक्ट्रॉनिक फीचर्सचा नव्या मॉडेलमध्ये याचा मोठा वापर केला जातो.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            