Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

VPF Vs PPF: दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्हीपीएफ की पीपीएफ योग्य; कशावर व्याज अधिक मिळतं?

VPF Vs PPF

VPF Vs PPF: व्हीपीएफ योजना ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचा एक भाग आहे. प्रोव्हिडंट फंडमध्ये कर्मचारी आपल्या पगारातील 12 टक्के योगदान देतो. तर कंपनीही तेवढेच योगदान देते. पण व्हीपीएफमध्ये कर्मचारी त्यापेक्षा जास्त योगदान देऊ शकतो.

VPF Vs PPF: वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड हा पगारदार व्यक्तींसाठी पीएफप्रमाणे सक्तीने करण्याची गुंतवणूक योजना नाही. पण याचा फायदा मात्र नक्कीच आहे. कारण या योजनेला सरकारचे पाठबळ असून, यामध्ये जोखीम कमी आणि परतावा अधिक आहे. व्हीपीएफचे पूर्ण नाव तुम्हाला आतापर्यंत कळले असेलच, वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (Voluntary Provident Fund).

Voluntary Provident Fund

वॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड हा एक रिटायरमेंट फंड असून यासाठी लागणारा निधी हा कर्मचाऱ्याच्या पगारातूनच स्वीकारला जातो. म्हणजे कर्मचाऱ्या पगारातून ज्याप्रमाणे प्रोव्हिडंट फंडसाठी काही रक्कम कापली जाते. त्यातील काही रक्कम ही वॉलेंटरी फंडसाठी वळवता येते. कर्मचारी आणि कंपनी दोघांनाही व्हीपीएफसाठी गुंतवणूक करणे सक्तीचे नाही. ही एक ऐच्छिक गुंतवणूक योजना आहे.

Public Provident Fund

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे; जी आकर्षक व्याजदर आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा देते. या योजनेंतर्गत मिळालेले व्याज (Interest) आणि परतावा (Returns) इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत करमुक्त आहे. कलम 80C अंतर्गत PPF मध्ये 1.5 लाखापर्यंतची कर सवलत मिळते. तसेच ही रक्कम 15 वर्षापर्यंत लॉक असते.

PPF Vs VPF

VPF की PPF कोणता पर्याय चांगला

नोकरी करणाऱ्या पगारदार व्यक्तींना व्हीपीएफ आणि पीपीएफ असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. यातील एका पर्यायामध्ये कर्मचारी आणि कंपनी या दोघांचे समान योगदान असते. पण व्हीपीएफद्वारे मिळणाऱ्या सेवांचा विचार करता पीपीएफपेक्षा व्हीपीएफमधील गुंतवणूक योग्य ठरू शकते. याची वेगवेगळी कारणे आहेत. सर्वप्रथम व्हीपीएफ सध्या 8.15 टक्के व्याजदर मिळत आहे. तर पीपीएफवर 7.10 टक्के व्याज दिले जात आहे. पीपीएफमध्ये कर्मचारी जास्तीतजास्त 1.50 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतात. तर व्हीपीएफमध्ये याची मर्यादा जास्त आहे. व्हीपीएफमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्यावर गुंतवणूकदाराला चांगल्या व्याजदरासह टॅक्समध्ये सवलतदेखील मिळते.

पीपीएफ खाते कोणीही सुरू करू शकतं. पण व्हीपीएफ खाते फक्त पगारदार व्यक्ती काढू शकतात. व्हीपीएफ खाते कंपनीच्या एचआर किंवा अकाउंट विभागाद्वारे काढले जाते. तर पीपीएफ अकाउंट कोणीही काढू शकतो. व्हीपीएफमध्ये निवृत्तीपर्यंत गंतवणूक करू शकतो. पण यामध्ये 5 वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो. म्हणजे व्हीपीएफ खाते सुरू केल्यानंतर 5 वर्षापर्यंत ते ट्रान्सफर किंवा बंद करता येत नाही.

एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनी बदलली तर त्याचे व्हीपीएफ खाते नवीन कंपनीत ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच व्हीपीएफमधून लग्न, आजारपण किंवा घर खरेदी करण्यासाठी त्यातून काही रक्कम काढता येते. पण पीपीएफमधून 15 वर्षांनंतरच पैसे काढता येतात किंवा पीपीएफ खात्याला 6 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यातून काही रक्कम काढता येते.