Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Volvo Electric SUV Car: व्होल्वोची इलेक्ट्रीक एसयूवी गाडी लाँच, सप्टेंबर महिन्यापासून डिलिव्हरी दिल्या जाणार

Bron Electric SUV C40 Recharge Launched

Image Source : www.fortuneindia.com

Bron Electric SUV C40 Recharge Launched: ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या देशात वेगाने इलेक्ट्रीक कार आणत आहेत. यामध्ये आता व्होल्वो कार इंडिया (Volvo car India) कंपनी देखील सहभागी झाली आहे. व्होल्वो कार इंडियाने भारतात बॉर्न इलेक्ट्रिक SUV C40 (Bron Electric SUV C40 Recharge) रिचार्ज कार लाँच केली.

Volvo car India: व्होल्वो कार इंडियाने आपली पहिली इलेक्ट्रिक कार XC40 रिचार्ज गेल्या वर्षी मार्केटमध्ये लाँच केली होती. या आठवड्यात व्होल्वो कार इंडियाने भारतात बॉर्न इलेक्ट्रिक SUV C40 (Bron Electric SUV C40 Recharge) रिचार्ज कार लाँच केली. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या देशात वेगाने इलेक्ट्रीक कार आणत आहेत. यामध्ये आता व्होल्वो कार इंडिया (Volvo car India) कंपनी देखील सहभागी झाली आहे.

लेदर फ्री इंटीरियर डिझाइन

कंपनीची इलेक्ट्रिक SUV C40 रिचार्ज कार एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 530 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.  Bron Electric SUV C40 Recharge कारच्या इंटीरियरबद्दल आणि डिझाइनबद्दल सांगायचे झाल्यास, 
कंपनीने या मॉडेलमध्ये 100 % लेदर फ्री इंटीरियर डिझाइन केले आहे. हे कॉम्पॅक्ट मॉड्यूलर आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर तयार केले आहे. तसेच,या एसयूव्हीला स्टायलिश क्रॉसओवर डिझाइन देण्यात आले आहे.

अद्याप किंमत जाहीर नाही

व्होल्वो कार इंडियामधील C40 रिचार्ज इलेक्ट्रिक SUV ची किंमत किती असेल? हे अद्याप जाहिर केलेले नाही. डिलिव्हरीबद्दल बोलायचे झाले तर असे सांगितले जात आहे की, कंपनी येत्या सप्टेंबरपासून कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

स्पर्धा वाढेल

व्हॉल्वो कार इंडिया कंपनीने, आपल्या व्होल्वो C40 रिचार्जद्वारे लक्झरी इलेक्ट्रिक कार सेगमेंटच्या बाजारपेठेतील इतर कंपन्यांशी स्पर्धा वाढवली असल्याचे मानले जाते. कंपनीकडे आधीच XC40 रिचार्ज सारखी इलेक्ट्रिक कार आहे. अशा प्रकारे, व्होल्वो कार इंडियाकडे दोन लक्झरी इलेक्ट्रिक कारचे सर्वोत्तम मॉडेल सर्वत्र उपलब्ध आहे.

व्होल्वोची मार्केटमध्ये पकड

SUV C40 Recharge ही दुसरी इलेक्ट्रिक कार लाँच केल्याने, व्होल्वो कार इंडियाला भारताच्या इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करण्यास मदत होईल. खरेतर,पहिल्या इलेक्ट्रिक मॉडेल XC40 रिचार्जच्या यशानंतर, कंपनीने दुसरे मॉडेल लॉन्च केले आहे, ज्यामुळे मार्केटमध्ये व्होल्वोची हिस्सेदारी वाढविण्यास मदत होणार आहे.

2023 मधील इलेक्ट्रीक कार

टाटा अल्ट्रॉझ ईव्ही, महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही ४०० ईव्ही आणि ई-केयूव्ही १००, Hyundai ची IONIQ 5, MG Air EV, Citroen ëC3, टाटा पंच ईव्ही यासारख्या कंपन्यांनी 2023 मध्ये इलेक्ट्रीक कारर्स लाँच केल्याने स्पर्धा वाढली आहे.