Vistara Anniversary Sale: तुम्ही नवीन वर्षात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी किंवा पिकनिकसाठी विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण विमानाचा प्रवास म्हटला की, हा प्रवास परवडेल का? असा पहिला प्रश्न मनात येतो. पण याबाबत खूप विचार करण्याची गरज नाही. कारण टाटा ग्रुपमधील विस्तारा एअरलाईन्सने (Vistara Airlines) आपल्या आठव्या वर्धापन दिनानिमित्ताने विमान प्रवाशांसाठी एक स्पेशल फ्लाईट तिकिट ऑफर (Flight Ticket Offer) आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही स्वस्तात विमानाची तिकिटे बुक करून हवाई प्रवासाचा आनंद घेऊ शकता. कंपनीने दिलेल्या ऑफर्समधून तुम्हाला 1899 रुपयांपासून तिकिटे बुक करता येणार आहेत.
विस्तारा एअरलाईन्सने रविवारपासून (दि. 8 जानेवारी) या Anniversary Sale ची सुरूवात केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला स्वस्तात तिकिटे बुक करण्यासाठी 4 दिवसांचा अवधी मिळणार आहे. ही ऑफर 12 जानेवारीला संपणार आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहिती अनुसार, या सेलमध्ये 23 जानेवारी, 2023 पासून 30 सप्टेंबर, 2023 पर्यंतचा हवाई प्रवास करता येणार आहे.
विस्ताराने ऑफरमध्ये (Vistara Sale) नमूद केल्याप्रमाणे सर्व ऑफर्स देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवासावर लागू आहेत. या ऑफरद्वारे देशांतर्गत प्रवासासाठी विमानाचा किमान तिकिट दर 1,899 रुपये असणार आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी किमान 13,299 रुपयांपासून तिकिट दर सुरू आहेत. या सेल ऑफर अंतर्गत तुम्ही जर अॅडव्हान्स सीट किंवा अॅक्सेस बॅगेजचे सुविधा घेत असाल तर त्यावरही 23 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. या सेल आणि ऑफर बाबत अधिक माहिती कंपनीच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.
टाटाची विस्तारामध्ये 51 टक्के भागीदारी
टाटा ग्रुपची विस्तारा एअरलाईन्समध्ये 51 टक्के भागीदारी आहे; तर उर्वरित 49 टक्के भागीदारी सिंगापूर एअरलाइन्सची (SIA) आहे. सिंगापूर एअरलाईन्सने विस्ताराचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. या करारांतर्गत 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली जाणार आहे.