Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंडाचे तोटे समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा

म्युच्युअल फंडाचे तोटे समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा

Image Source : www.cafemutual.com

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे जसे फायदे आहेत; तसेच त्याचे काही तोटे ही आहेत. त्याबद्दल आपण अधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंडाचे तोटे काय आहेत? मागील लेखांमधून आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या सर्व फायद्यांबद्दलची माहिती दिली होती. जसे की, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे दुप्पट कसे करू शकता आणि गुंतवलेल्या रकमेवर चांगला परतावा कसा मिळवू शकता. आता आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या दुसऱ्या बाजूबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही सर्व गोष्टी समजून घेऊन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही जोखमीचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग या जाणून घेऊयात, म्युच्युअल फंडाचे खरोखरच काही तोटे आहेत की नाही?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे तोटे

ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडाचेही तोटे आहेत जे खालीलप्रमाणे आहेत.

फंडात गुंतवणूक करण्याचे 2-1

1. परतीची हमी नाही
बाजारात असे अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्हाला निश्चित परतावा देतात. पण म्युच्युअल फंडमध्ये असे नाही. म्युच्युअल फंडातील नफ्याचा थेट संबंध हा शेअर बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो. शेअर बाजारात नेहमीच धोका असतो. यामुळे म्युच्युअल फंडाच्या फायद्यातही चढ-उतार होत राहतात.

जर तुम्हाला असे वाटत असेल की म्युच्युअल फंडातून तुम्ही कमीतकमी कालावधीत मोठा नफा मिळवू शकाल, तर तुमची गफलत होत आहे. कारण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कमी वेळेत नफा मिळवूच शकत नाही. यासाठी तुम्हाला तुमची गुंतवणूक दीर्घकाळ गुंतवावी लागेल, तरच तुम्हाला मोठा नफा मिळू शकेल.

2. गुंतवणुकीवरील खर्च
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही फंड हाताळण्यासाठी फंड हाऊसला दिली जाते. जर तुम्ही कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली तर हा खर्च तुम्हाला कमी लागेल, परंतु जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता तेव्हा ती खूप जास्त होते. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना, अगोदर म्युच्युअल फंडाच्या खर्चाशी संबंधित सर्व माहिती मिळवा.

3. मुदतपूर्व रकमेवर एक्झिट लोड
म्युच्युअल फंडमध्ये केलेली गुंतवणूक 1 वर्षाच्या आत काढली तर त्यावर 1 टक्का एक्झिट लोड भरावा लागतो; हा म्युच्युअल फंडच्या एनएव्ही (Net Asset Valaue)चा एक छोटा भाग असू शकतो. गुंतवणूकदारांनी योजनेतून लगेच बाहेर पडू नये, हा एक्झिट लोड लागू करण्याचा उद्देश आहे. कारण बरेच लोक गुंतवणूक करतात आणि लगेच बाहेर पडतात. ज्यांना म्युच्युअल फंडातून पैसे लवकर काढायचे आहेत त्यांच्यासाठी हा पर्याय कामाचा नाही.

4. लॉक-इन कालावधी
लॉक-इन पीरियड म्हणजे, गुंतवलेले पैसे ठराविक काळासाठी जमा होतात आणि त्यादरम्यान ते पैसे काढू शकत नाही. जर लॉक-इन पीरियडमध्ये पैसे काढले तर त्यावर अधिकची फी लागून तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

5. म्युच्युअल फंड रिटर्नवरील टॅक्स
म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवरही टॅक्स भरावा लागतो. ज्यामुळे तुमच्या नफ्यातील काही टक्के घट होते. तुम्ही 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास, तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणून 15 टक्के कर लागू शकतो. जर तुम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केली तर दीर्घकालीन भांडवली नफा म्हणून 10 टक्के कर भरावा लागतो.

6. नियंत्रणाचा अभाव
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेल्या पैशावर गुंतवणूकदाराचे कोणतेही नियंत्रण नसते. त्यावर फंड मॅनेजरचे नियंत्रण असते. त्याच्या इच्छेनुसार किंवा अभ्यासानुसार तो ही गुंतवणूक शेअर बाजार किंवा इतर ठिकाणी गुंतवतो.

7. थेट गुंतवणुकीतून तोटा
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे गुंतवणूकदाराला बाजारातील परिस्थितीची माहिती असणे आणि म्युच्युअल फंड कसे काम करते हे माहित असणे आवश्यक आहे. अन्यता थेट गुंतवणूक करताना चुका होण्याची शक्यता असते. उच्च परतावा मिळविण्यासाठी थेट गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे. पण समजून न घेता गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते.

8. स्कीम निवडण्यात चूक
भारतातील विविध म्युच्युअल फंड हाऊसेस अनेक योजना ऑफर करतात. गुंतवणूकदारांसाठी योग्य योजना निवडणे ही सोपी गोष्ट नाही. बहुतेक गुंतवणूकदार भूतकाळातील कामगिरी पाहून आणि भविष्यातील कामगिरी लक्षात न घेता योजना निवडतात.