जगभरातील करोडो ट्विटर युजर्ससाठी (Twitter Users) एक मोठी बातमी आली आहे. आता ते त्यांचे अकाउंट सस्पेंशन विरोधात आवाज उठवू शकणार आहेत. कंपनीने शुक्रवारी सांगितले की ट्विटर वापरकर्ते 1 फेब्रुवारीपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या (social media platform) पुन्हा सुरु करण्याच्या नवीन निकषांनुसार अकाउंट सस्पेंशनचे अपील आणि मूल्यांकन करु शकतात.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन नियमांनुसार केवळ गंभीर प्रकरणांमध्ये किंवा विद्यमान धोरणांचे वारंवार उल्लंघन झाल्यास ट्विटर अकाऊंट निलंबित केले जातील. सीरियस पॉलिसी वॉयलेशनमध्ये चुकीचा कंटेंन्ट किंवा अँक्टिव्हिटी, हिंसा किंवा भडकावणे किंवा धमकावणे आणि इतर वापरकर्त्यांचा लक्ष्यित छळ करणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो.
अकाउंट सस्पेंशनची कारवाई होणार नाही
ट्विटरने म्हटले आहे की नवीन धोरणांतर्गत, पुढे जाऊन, खाते निलंबनापेक्षा कमी कठोर कारवाई केली जाईल. जसे की धोरण आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास ट्विटची पोहोच मर्यादित करणे किंवा खाते वापरणे सुरू ठेवण्यापूर्वी वापरकर्त्यांना ट्विट काढून टाकण्यास सांगितले जाईल. डिसेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी काही पत्रकारांचे ट्विटर अकाउंट त्यांच्या विमानाविषयी सार्वजनिक डेटा प्रकाशित केल्याबद्दल निलंबित केले होते. मात्र, नंतर वाद वाढत गेल्याने पत्रकारांचे अकाउंट पूर्ववत करण्यात आले.
एलॉन मस्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने
ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वकिली केली होती. मस्कच्या मते, वापरकर्त्यांना भाषण स्वातंत्र्य मिळायला हवे. खरे तर जॅक डोर्सीच्या कार्यकाळात अनेक ट्विटर युजर्सची खाती सस्पेंड करण्यात आली होती. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश होता. मात्र, ट्विटरवरील सस्पेंडेड अकाउंट पुन्हा सुरु करण्यासाठी, एलोन मस्कने 'सामान्य माफी' जाहीर केली आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर हँडल पुन्हा सुरु केले.
काय म्हणाले ट्रम्प?
फेसबुकच्या या घोषणेनंतर ट्रम्प 'ट्रुथ सोशल' वर म्हणाले, "तुमच्या लाडक्या राष्ट्राध्यक्षांचे खाते हटवल्यापासून अब्जावधींचे नुकसान झालेल्या फेसबुकने नुकतेच माझे खाते परत करत असल्याची घोषणा केली आहे." सध्याचे राष्ट्रपती किंवा दुसरे कोणीही ज्यांच्याशी असे केले जाऊ नये अशा कोणाशीही असे पुन्हा घडू नये.” विशेष म्हणजे 3 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही आणि निवडणुकीत फसवणुकीचे आरोप केले. ट्रम्प यांच्या या आरोपांदरम्यान, त्यांच्या कथित समर्थकांनी 6 जानेवारी रोजी संसद भवन संकुलात हिंसाचार केला होता.